महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,76,423

औरंगजेब आणि हिंदू देवळे : अफवा आणि वास्तव

By Discover Maharashtra Views: 1330 10 Min Read

औरंगजेब आणि हिंदू देवळे : अफवा आणि वास्तव –

अलीकडे ‘ सर्वधर्म समभाव ‘ या रोगाची लागण झालेले बरेच लोक आपला मुद्दा भोळ्या भाबड्या हिंदूंच्या गळी उतरवण्यासाठी, हिंदू लोकांचा कट्टर शत्रू असलेला मुघल बादशहा औरंगजेब  हा कसा सहिष्णू होता आणि त्याचे हिंदूंच्या प्रथा परंपरांवर कसे प्रेम होते हे दाखवण्यासाठी जिवाचे रान करताना दिसतात. त्यांचा हा  ‘ सर्वधर्म समभाव ‘ नावाचा रोग आता जीवघेण्या कॅन्सर प्रमाणे ‘लास्ट स्टेज ‘ ला पोहोचला आहे आणि त्याच प्रभावामुळे ते ‘औरंगजेबाने हिंदू देवळांना इनामे दिली होती किंवा त्याने हिंदूंना देवळे बांधून दिली होती ‘ असे बरळू लागले आहेत. त्यांची ही विधाने इतकी हास्यास्पद आहेत की ती खुल्दाबादला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्या गेलेल्या औरंगजेबाच्या कानावर पडली , तर त्याला आश्चर्याचा धक्का बसून तो आपल्या कबरीत उठून बसेल !

सर्वप्रथम  औरंगजेबाचे हिंदूंच्या देवळांबद्दलचे विचार काय होते हे जाणून घेऊ . यासाठी औरंगजेबाच्या दरबारचा  १३ ऑक्टोबर १६६६ या तारखेचा अखबार आपण पाहू. कसला अखबार आहे हा? तर तो आहे मथुरेतील केशवरायाच्या देवळाविषयीचा. हे देऊळ औरंगजेबाने  १६७० रोजी पाडले आणि तिथे मशीद बांधली (संदर्भ :- मआसिर ए आलमगिरी ) पण हा अखबार त्याच्या चार वर्षे आधीचा आहे. अखबारातील हिंदूंच्या  देवळा बद्दलचा फारसी मजकूर पुढील प्रमाणे आहे :-

” ब अर्ज  हजरत रसीद के  दर मतहरा ( मथुरा ) जौ दर बुतखाने दर किशवराय जौ एक कठराह संगे बेशुकोह नमूदे अस्त. हजरत शुनिदे फर्मुदन्द के दर मजहब मुसलमाने बुत खाने रा दीदन हम खूब निस्त व इन बेशुकोह दर इन कठरा रास्त कुनानयंद इन सुखन मुसलमानान रा खूब निस्त ”

याचा मराठी अर्थ पुढील प्रमाणे :-

“बादशहाकडे (औरंगजेब)  अर्ज  आला. मथुरेत केशवरायाच्या देवळांत दाराशुकोह याने एक दगडी  कठडा बांधला आहे. बादशहाने ते ऐकून हुकूम दिला  की , मुसलमानी धर्मात देऊळ बघणेसुद्धा निषिद्ध मानले आहे व या दाराशुकोहने तेथे कठडा उभा केला आहे. ही गोष्ट मुसलमानास योग्य नाही.”

हा संपूर्ण अखबार ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ६ मध्ये इतिहासकार श्री ग.ह.खरे यांनी पान नंबर २० वर छापला आहे ( अखबार क्रमांक ३१ ) तो सोबत जोडत आहे.

जो मनुष्य इस्लाम धर्माचा एवढा कट्टर अनुयायी आहे आणि जो , “मुसलमान धर्मात देवळाकडे (केवळ) पाहणे देखील निषिद्ध मानले गेले आहे ” असे म्हणतो तो हिंदूंच्या कोणत्याही देवळाला स्वप्नात तरी इनाम देईल का ? याचा विचार वाचकांनी करावा.

चित्रकूट येथील बालाजी मंदिराबाबतचे बनावट फर्मान

औरंगजेबाच्या सहिष्णुतेचे प्रतीक म्हणून काही मोठे इतिहासकार चित्रकूट येथील बालाजी मंदिराला औरंगजेबाने दिलेल्या एका फारसी फर्मानाचा दाखला देतात. परंतु हे फर्मान बनावट आहे हे ज्येष्ठ इतिहासकार श्री गजानन भास्कर मेहेंदळे यांनी भरपूर पुराव्यानिशी त्यांच्या आगामी पुस्तकात दाखवून दिले आहे. तूर्तास श्री मेहेंदळे यांनी या फर्मानाचा  बनावट पणा सिद्ध करणाऱ्या ज्या खुणा सांगितल्या आहेत, त्यापैकी सर्वात महत्वाची अशी एकच  खूण  येथे सांगतो:-

१) या फर्मानात ‘चित्रकूट’ असा जो शब्द लिहिला आहे त्यामध्ये ‘ट’ हे अक्षर ( ٹ – हे अक्षर ) उर्दू मधील छोटी तोय वापरून लिहिले आहे. फारसी भाषेत ‘ट’ हे अक्षरच नाही. त्यामुळे चित्रकूट असे लिहायचे झाल्यास ते ‘चित्रकूत’ असे ‘ते’ ( ت ) या अक्षराचा वापर करून लिहिले जाते. आधुनिक फारसी मध्ये ‘ट’ हे अक्षर असलेला शब्द लिहायचा झाल्यास उर्दूतील ‘टे’  ( ٹ ) हे अक्षर वापरले जाते , परंतु औरंगजेबाच्या काळात ते वापरले जात नसे.        औरंगजेबाच्या काळात हे अक्षरच ज्ञात नव्हते ! हे अक्षर एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला इंग्रजांनी छपाईच्या सोयी साठी फोर्ट विल्यम कलकत्ता येथे शोधून काढले आहे. ही माहिती , अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी चे उर्दू भाषेचे तज्ज्ञ प्रोफेसर मिर्झा खलील बेग यांनी आपल्या ‘उर्दू की लीसानी तशकील’ या पुस्तकात दिली आहे. औरंगजेबाचे बनावट फर्मान ज्याने तयार केले , त्याला हे बारकावे माहिती नसल्याने, त्याची ही बदमाशी  येथे पकडली गेली आहे ! या खेरीज हे फर्मान बनावट आहे हे सिद्ध करणारे अजूनही मुद्दे आहेत, ते श्री मेहेंदळे यांच्या आगामी पुस्तकात लवकरच वाचायला मिळतील.

बनारस येथील जुन्या देवळांसंबंधीची सनद : औरंगजेबाची सहिष्णुता ? छे हे तर त्याचे नक्राश्रू !

‘हिंदूंची जुनी देवळे पाडू नयेत आणि त्यांना नवीन बांधू देऊ नयेत’ असा मजकूर असलेली औरंगजेबाची एक सनद उपलब्ध आहे आणि ती खरी आहे. ही सनद  Journal and proceedings of the asiatic society of bengal, new series , vol 7 year  1911 मध्ये पान  नंबर ६८७-६९० वर छापलेली आहे. या मूळ सनदेचा फोटो या लेखासोबत जोडत आहे. कसली सनद आहे ही ? आणि त्यावरून औरंगजेब हिंदूंच्या बाबतीत खरच सहिष्णू होता हे सिद्ध होते का ? पाहुया:-

एखादा राज्यकर्ता कितीही धर्मवेडा असला तरी त्याची ताकद ज्यावेळी त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कमी असते , किंवा तो एका  विशिष्ट राजकीय परिस्थितीमधून जात असतो , तेव्हा आपला फायदा व्हावा याकरिता त्याला आपला मूळ स्वभाव झाकून, आपण तसे नाही आहोत असा आभास निर्माण करावा लागतो. दोन उदाहरणे देतो:-

इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर हे सुरवातीच्या काळात मक्का येथे आपल्या धर्माचा ( इस्लामचा ) प्रचार करीत असत, त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या प्रचाराला मक्का येथील लोकांचा विरोध होता. त्यावेळी त्यांच्या पाठीशी मक्केतले शंभर लोक सुद्धा नव्हते. या वेळी मुहम्मद पैगंबर यांना स्फुरलेले  कुराणातील आयत हे सौम्य आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांबद्दल वैरभाव न दाखवणारे आहेत. उदाहरणार्थ पुढील आयत पहा

अ.) ” तुमच्या विरोधकांचे म्हणणे शांतपणे आणि शांतपणे ऐकून घ्या आणि तुमच्या विरोधकांची रजा घेताना मैत्रीपूर्ण वातावरण ठेवा” ( कुराण ७३:१०)

ब.) ” तू जरी  तुझा हात मला ठार मारण्यासाठी पुढे केलास तरी देखील मी तुला मारण्यासाठी तुझ्यावर हात उगारणार नाही, कारण मी या जगावर आणि त्यातील प्रत्येक वस्तूवर प्रेम करणाऱ्या अल्लाह ला घाबरतो” ( कुराण ९:१२३)

क.) “सर्वांशी गोड बोला ” (कुराण २:८३)

ड.) “मुर्तीपुजकांची विचारधारा काय आहे हे आपल्याला माहिती आहे, परंतु ती तुम्हाला पटली नाही तरीही त्यांच्यावर जबरदस्ती करू नका. ( कुराण ५०:४५ )

इ.) ” तुम्हाला ( मुर्तीपुजकांना किंवा काफरांना ) तुमचा धर्म लखलाभ असो, आणि मला माझा (इस्लाम) ” (कुराण १०९:६)

मक्केमध्ये आपली डाळ शिजत नाही आणि आपल्याला फारच विरोध होत आहे हे पाहून हजरत मुहम्मद पैगंबर आपल्या अनुयायांसह मदिनेला निघून गेले. यालाच ‘हिजरात’ असे म्हणतात आणि येथूनच ‘हिजरी’ या कालगणनेची सुरवात झाली. मदिनेला गेल्यानंतर काही काळात  हजरत मुहम्मद पैगंबर आणि त्यांचे अनुयायी सशक्त झाले आणि बद्रच्या लढाईत त्यांना मोठा विजय प्राप्त झाला. या काळात मुहम्मद पैगंबर यांना स्फुरलेल्या कुराणातील काही आयत पहा :-

अ.) “तुमचे विरोधक तुम्हाला जिथे भेटतील तिथे त्यांना तात्काळ ठार मारा आणि त्यांनी पूर्वी तुम्हाला जिथून घालवून दिले, तिथून तुम्ही त्यांना घालवून द्या” (कुराण २:१९१)

ब.)  “इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या ! इस्लाम धर्माला न मानणाऱ्याचा तू खून कर ! तुझ्यातला कठोरपणा त्यांना दिसूदेत” ( कुराण ९:१२३)

क.) “मूर्तिपूजक जिथे भेटतील तिथे त्यांना ठार मारा” (कुराण ९:५)

ड.) “काफरांशी (इस्लाम न मानणाऱ्यांशी) लढा.  अल्लाह तुम्हाला त्यांचा पराभव करायला आणि इस्लामच्या अनुयायांना समाधान द्यायला तुमची मदत करेल !” ( कुराण ९:१४)

इ.) ” इस्लाम पेक्षा अन्य धर्म मानणारे लोक आम्हाला मान्य नाहीत. अशा लोकांची (इस्लाम न मानणाऱ्यांची ) गणना परलोकात पराजितांमध्ये केली जाईल ” (कुराण ३:८५)

असे अनेक आयात आहेत, परंतु विस्तारभयास्तव येथे फक्त पाच दिले आहेत. हजरत मुहम्मद यांना स्फुरलेल्या कुराणमधील  वरील आयतांमधील कमालीची विसंगती पाहून वाचकांना नवल वाटेल, परंतु यात नवल वाटण्यासारखे काहीही नाही. मक्केत असताना हजरत मुहम्मद आणि त्यांच्या अनुयायांकडे पुरेसे पाठबळ नव्हते, त्यामुळे ते आपण सहिष्णू आहोत हे दाखवत होते. परंतु ते त्यांचं खरं रूप नव्हतं ! मदिनेत आल्यानंतर त्यांना जेव्हा पुरेसे अनुयायी मिळाले, तेव्हा त्यांची मूळ विचारधारा जगासमोर आली एवढाच त्याचा अर्थ आहे !

दुसरं उदाहरण दिल्ली सल्तनतीचा सुलतान शमशुद्दीन इल्तुतमिश याचे आहे. ही हकीकत  तेराव्या शतकातील इतिहासकार झियाउद्दीन बर्नी याने ‘सना-इ-मुहम्मदी’ या त्याच्या पुस्तकात लिहून ठेवली आहे. ती अशी :-

सुलतान इल्तुतमिश याच्या राज्यातले काही उलेमा त्याच्या कडे आले आणि त्याला म्हणाले , “हिंदूंकडून जिझिया घेत बसण्यापेक्षा तुम्ही सर्व हिंदूंना एकदाच ठार मारून हा प्रश्न संपवत का नाही ?” त्याच्यावर सुलतान इल्तुतमिशने दिलेले उत्तर विचार करण्यासारखे आहे. इल्तुतमिश म्हणतो :-

“या वेळी या देशात (हिंदुस्थानात) आपली (मुसलमानांची) संख्या फार थोडी आहे. आपण ताटातील मिठा एवढे आहोत. आपण आताच जर हिंदूंविरुद्ध असे काही केले, तर हिंदू एकजूट होतील आणि आपल्याला घालवून देतील. परंतु कालांतराने शहरांमधून आणि छोट्या गावांमधून मुसलमानांची संख्या वाढली आणि ते स्थिरस्थावर झाले की आपण हिंदूंसमोर  इस्लाम किंवा  मृत्यू हे दोनच पर्याय ठेवू ! ”

आता पुन्हा एकदा वर उल्लेख केलेल्या औरंगजेबाच्या देवळांबद्दलच्या सनदे कडे वळू, भाग २ मध्ये.

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संदर्भ :-

१) ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ६ संपादक श्री ग.ह.खरे
२)  Journal and proceedings of the asiatic society of bengal, new series , vol 7 year  1911(https://www.biodiversitylibrary.org/…/mobot317530021838…)
३) मआसिर ए आलमगिरी , साकी मुस्तैदखान
४) मोगल दरबारची बातमीपत्रे , सेतू माधवराव पगडी
५) Muslim slave system in medieval India, K.S Lal
६) The Contradictory teachings of the Quran, Ali Sina (https://myislam.dk/…/sina%20the-contradictory-teachings…)

चित्रे :-

१) केशवरायाच्या देवळा संबंधीचा  अखबार
२) १६ जमादी-उस-सानी, १०६९ हिजरी म्हणजेच २८ फेब्रुवारी १६५९ रोजी दिलेले मूळ बनारस फर्मान/सनद
३) मुघल बादशहा औरंगजेब

लेखक :- सत्येन सुभाष वेलणकर

Leave a comment