महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,76,034

स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ

By Discover Maharashtra Views: 4071 7 Min Read

स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधानमंडळ –

शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेक जेष्ठ शुक्ल त्रयोदशी अर्थात ६ जून १६७४ रोजी रायगडावर पूरोहित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शनाने वैदीक पद्धतीने संपन्न झाला. शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि महाराज्यांनी स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात अनुक्रमे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज , छत्रपती थोरले शाहू महाराज, छत्रपती रामराजे , छत्रपती धाकटे शाहू महाराज, छत्रपती प्रतापसिंह महाराज व छत्रपती शहाजि महाराज स्वराज्याचे छत्रपती म्हणून विराजमान झाले. स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक स्वत: छत्रपती करत असत. अष्टप्रधान मंडळात कालांतराने काही बदल घडून नवी पदे उदयास आली. छत्रपतिंच्या स्वराज्याची राजधानी प्रथम रायगड नंतर जिंजी व सातारा अश्या प्रकारे काळाप्रमाणे बदलत राहिली . इ. स. १८४९ साली इंग्रज्यांनी सातार्‍याचे राज्य खालसा केले व मराठा साम्राज्याचा अस्त झाला. या लेखात आपण स्वराज्याचे छत्रपती आणि त्यांचे अष्टप्रधानमंडळ यांची थोडक्यात माहिती करून घेऊ.

“प्रधान अमात्य सचीव मंत्री,
सुमंत न्यायाधिश दिव्यशास्त्री,
सेनापती त्यात असे शहाणा,
अष्टप्रधानी नृप मुख्य राणा” ।।

अष्टप्रधानमंडळातील मंत्र्यांचे दरबारातील स्थान हे महाराज्यांनी निश्चित करून दिले होते . त्यानुसार सिंहासनाच्या उजवीकडे प्रंतप्रधान , पंत आमात्य , पंत सचिव , मंत्री यांनी असावे सिंहासनाच्या डावीकडे सेनापति , सुमंत , न्यायाधीश , पंडितराव यांनी असावे असे संकेत होते.

छत्रपती शिवाजी महाराज :-

राज्याभिषेक :- इ.स. १६७४ , राजधानी :- रायगड.
मुद्रा :- “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”

अष्टप्रधानमंडळ :-

मुख्यप्रधान ( पंतप्रधान ) :- मोरोपंत त्रिंबक पिंगळे ( पेशवे )
पंतसचिव ( सुरनिस ) :- अण्णाजी दत्तो
पंत अमात्य ( मुजूमदार ) :- रामचंद्र नीळकंठ
मंत्री ( वाकनीस ) :- दत्ताजी त्रिंबक
सेनापति ( सरनोबत ) :- हंबीरराव मोहिते
सुमंत ( डबीर ) :- रामचंद्र त्रंबक
न्यायाधीश :- निराजी रावजी
पंडितराव दानाध्यक्ष :- मोरेश्वर पंडित

खालील पद हे अष्टप्रधानमंडlळात येत नाही परंतु महाराज्यांचे खाजगी सचिव असलेले हे पद

चिटणिस :- बाळाजी आवजी चित्रे.

छत्रपती संभाजी महाराज :-

राज्याभिषेक :- इ.स. १६८१ , राजधानी :- रायगड
मुद्रा :- “श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते ” यदंकसेविनी लेखा वतर्ते कस्य नीपरि“

अष्टप्रधानमंडळ :-

मुख्यप्रधान :- निळोपंत मोरोपंत पिंगळे
पंतसचिव :- आबाजी सोनदेव
पंत अमात्य :- अण्णाजी दत्तो / रघुनाथ नारायण हणमंते / नारोपंत रघुनाथ
मंत्री :- दत्ताजी त्रिमल
सेनापति :- हंबीरराव मोहिते / महादजी सोमाजी पाणसंबळ / म्हाळोजी बाबा घोरपडेे
सुमंत :- रामचंद्र त्रंबक
न्यायाधीश :- प्रल्हाद निराजी
पंडितराव दानाध्यक्ष :- मोरेश्वर रघुनाथ
खालील पदे अष्टप्रधानमंडlळात येत नाही
चिटणिस :- बाळाजी आवजी / खंडो बल्लाळ
छंदो गामात्य :- कवि कलश

छत्रपती राजाराम महाराज :-

राज्यारोहण :-इ.स. १६८९ , राजधानी :- जिंजी
मुद्रा :- “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शिवसुनोरियंमुद्रा राजरामस्य राजते”
“श्री धर्मप्रद्योतितांशेषवर्णा दाशरथेरिव ‘ राजारामस्य मुद्रेयं विश्ववंद्या विराराजते”

अष्टप्रधानमंडळ :-

मुख्यप्रधान :- निळोपंत मोरश्वर पिंगळे
पंतसचिव :- शंकराजी मल्हार
पंत अमात्य :- जनार्दनपंत हणमंते
मंत्री :- रामचंद्र त्रंबक पुंडे
सेनापति :- संताजी घोरपडे / धनाजी जाधव
सुमंत :- महादजी गदाधर
न्यायाधीश :- निराजी रावजी
पंडितराव :- श्रीकराचार्य
प्रतींनिधी :- प्रल्हाद निराजी
हुकुमतपनाह :- रामचंद्रपंत नीळकंठ

छत्रपती थोरले शाहू महाराज :-

राज्याभिषेक :- इ.स. १७०८ , राजधानी :- सातारा
मुद्रा :- श्री वर्धिष्णुर्विक्रमे विष्णोः सा मूर्तिरिव वामनी । ‘ शंभुसूनो रिव मुद्रा शिवराजस्य राजते ।।

अष्टप्रधानमंडळ :-

पंतप्रतिनिधी :- गदाधर प्रल्हाद , परशुरामपंत त्रंबक
पंतप्रधान :- बाळाजी विश्वनाथ भट / थोरले बाजीराव / नानासाहेब पेशवे
पंतसचिव :- नारोपंत शंकराजी
पंत अमात्य :- अंबराव बापूराव हणमंते / महादजी गदाधर
मंत्री :- नारोराम शेणवी
सेनापति :- धनाजी जाधव / मानसिंग मोरे / खंडेराव दाभाडे
सुमंत :- महादजी गदाधर / आनंदराव रघुनाथ
न्यायाधीश :- शेनाजी अनंत
पंडितराव :- मुद्दगलभट्ट उपाध्ये

छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी पंत सचिव पद नारोपंत शंकराजी यांना वंशपरंपरागत दिले तसेच प्रंतप्रधान ( पेशवे ) हे पद वंशपरंपरागत भट घराण्याल्या दिले व राज्याचा कारभार सर्वोतोपरी पेशव्यांकडे सोपवला त्यामुळे पुढील काळात छत्रपतींच्या मंत्रीमंडळात तीन ते चारच नेमणुका होत असत.

छत्रपती रामराजे महाराज :-

राज्याभिषेक :- इ.स. १७४९ , राजधानी :- सातारा

प्रधानमंडळ :-

पंतप्रधान :- बाळाजी बाजीराव ( नानासाहेब ) / थोरले माधवराव पेशवे / नारायनराव पेशवे / रघुनाथराव पेशवे / सवाई माधवराव पेशवे
प्रतिनिधी :- जगजीवन परशुराम , श्रीनिवास गंगाधर / परशुराम पंडित
सचिव :- चिमणाजी नारायण / सदाशिव चिमणाज
सेनापति :- मुरारराव घोरपडे.

छत्रपती धाकटे शाहूमहाराज :-

राज्याभिषेक :- इ.स. १७७७ , राजधानी :- सातारा
मुद्रा :- श्री शंभो: पाद्कमल सेवाभिरुदयावहा । ‘ मुद्रेषा शाहूराजस्य रामसूनो विराजते ।।

प्रधानमंडळ :-

पंतप्रधान :- सवाई माधवराव पेशवे / बाजीराव रघुनाथ पेशवे ( दुसरे बाजीराव )
प्रतिनिधी :- परशुराम श्रीनिवास
सचिव :- सदाशिव चिमणाजी / रघुनाथ चिमणाजी / शंकर रघुनाथ

छत्रपती प्रतापसिंह महाराज :-

राज्याभिषेक :- इ.स. १८०८ , राजधानी :- सातारा
मुद्रा :- श्री गौरीनाथ प्राप्ता शाहूराजात्मजन्मन: / ‘ मुद्रा प्रतापसिंहस्य भद्रा सर्वत राजते //

अष्टप्रधानमंडळ :-

पंतप्रतिनिधी :- परशुराम श्रीनिवास
पंतप्रधान :- बाजीराव रघुनाथ पेशवे ( दुसरे बाजीराव ) ( १८१८ साली इंग्रज्यानपूढे शरणागती ) त्यानंतर पंतप्रधान पदायेवजी दिवाण हे पद चालवण्यात आले.
दिवाण :- विठ्ठल बल्हाळ महाजनी
पंतसचिव :- चिमणाजी रघुनाथ
पंत अमात्य :- बापूराव कान्हो फडणीस
मंत्री :- रघुनाथराव जयंतराव
सेनापति :- बळवंतराव भोसले
सुमंत :- बळवंत मल्हार चिटणीस
न्यायाधीश :- चिंतामणराव चिटको
पंडितराव :- रघुनाथराव / रामचंद्र्पंत रघुनाथराव

छत्रपती शहाजी महाराज :-

राज्यारोहण :-इ.स. १८३९ , राजधानी :- सातारा

अष्टप्रधानमंडळ :-

पंतप्रतिनिधी :- परशुराम श्रीनिवास
दिवाण :- नरहर रघुनाथ पराडक
पंतसचिव :- चिमणाजी रघुनाथ
पंत अमात्य :- सखाराम बापूराव फडणीस
मंत्री :- रघुनाथराव जयंतराव
सेनापति :- बळवंतराव भोसले
सुमंत :- रामचंद्र गोपाळ
न्यायाधीश :- ज्योति त्रिंबक फौजदार
पंडितराव :- रामचंद्र्पंत रघुनाथराव.

संदर्भ :- स्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधान :- अविनाश सोवनी.

श्री नागेश सावंत.

Leave a comment