महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

प्राचीन मंदिरे, वांबोरी, ता. राहुरी

By Discover Maharashtra Views: 1392 1 Min Read

प्राचीन मंदिरे, वांबोरी, ता. राहुरी –

अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी हे शेतीप्रधान गाव, वांबोरी येथे वाल्मिकींनी वाम तीर्थावर रामायण लिहिल्याची आख्यायिका आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगातून मांजरसुंबा आणि रामेश्वर यांच्या बरोबर मधून वांबोरी घाटातून खाली उतरले की वांबोरी गावात जाऊन पोहोचतो, अहमदनगर शहरापासून गावाचे अंतर २५ किमी असून गावात गेल्यानंतर निजामशाही राजवटीच्या पाऊलखुणा जपणारा ‘मांजरसुंबागड’ आपले लक्ष वेधून घेतो.प्राचीन मंदिरे वांबोरी.

याच वांबोरी गावात अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले वाल्मीकि तीर्थक्षेत्र आणि यादवकालीन पुरातन पडझड झालेले काही मंदिरांचे अवशेष दिसून येतात, मंदिरांच्या बांधणीवरून मंदिरे साधारण बाराव्या तेराव्या शतकात बांधली असावीत असे वाटते. मंदिर परिसरात एक भव्य बारव असून आजूबाजूला काही अज्ञात महापुरुषांच्या समाध्या आहेत. परिसरात काही विरगळींचे अवशेष देखील आपल्याला नजरेस पडतात. परिसर शांत व सुंदर असून आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.

Rohan Gadekar

Leave a comment