महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,74,767

प्राचीन मंदिर बारव, ब्राम्हणी

By Discover Maharashtra Views: 1341 1 Min Read

प्राचीन मंदिर बारव, ब्राम्हणी, ता. राहुरी –

नगर शहरापासून डोंगरगण – वांबोरी घाटमार्गे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले ब्राम्हणी हे सुंदर गाव. अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वरांनी लिहिला तो या ब्राम्हणी गावात. जसा पैस खांब नेवासे येथे आहे तसा एक अमृतानुभव स्तंभ या गावातील बल्लाळी देवीच्या मंदिरासमोर आहे. याच गावाच्या आत मध्ये पुरातत्व खात्याच्या ताब्यात असणारी सुंदर मंदिर वजा बारव असून, या बारवेचा जुन्या काळात पाणी पुरवठ्यासाठी वापर होत असे.

भारतीय पुरातत्व विभागाने ताब्यात असलेल्या या मध्ययुगीन काळातील मंदिर वजा बारवेचा जीर्णोद्धार केला आहे. या बारवेचे चिरे ढासळले होते. हे संरक्षित स्मारक असल्याने पुरातत्त्व विभागाने दगड नीट रचून हे सुस्थितीत आणले आहे.

सुमारे शंभर फूट लांब-रुंद असलेल्या या बारवेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे बारव व शुष्कसांधी प्रकारातील मंदिर एकत्रच आहे. अश्या प्रकारची रचना कमी ठिकाणी पहायला मिळते. मंदिराचे खांब वैशिष्ट्यपूर्ण असून ते चांगल्या अवस्थेत आहे. मंदिरात शिवलिंग असून आतील बाजूस काही मूर्त्या आपल्याला पहायला मिळतात.

Rohan Gadekar

Leave a comment