महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,71,463

पानिपतच्या युद्धाचे अस्सल चित्र!

By Discover Maharashtra Views: 1844 3 Min Read

पानिपतच्या युद्धाचे अस्सल चित्र!

अफगाणांच्या विरोधात मराठ्यांनी दाखवलेल्या शौर्याला तोड नाही. या पानिपतच्या तिसऱ्या लढाईशी संबंधित अनेक चित्रे आज उपलब्ध आहेत. सदरचे चित्र हे समकालीन मानले जाते. मराठे व अफगाण सरदार तसेच प्रत्यक्ष युद्धात झालेल्या परिस्थितीचे योग्य चित्रण आपल्याला यामधून पाहायला मिळते. चित्र लहान आहे. पण काही मुख्य व्यक्तींच्या चित्राच्या बाजूस (जागा मिळेल तिथे) फारसी भाषेत नाव लिहिण्यात आल्यामुळे आपल्याला तो व्यक्ती ओळखणे सोपे जाते. मराठ्यांच्या सैन्यातील सदाशिवराव भाऊ सोडले तर इतर कुणाचेही नाव नाही. परंतू, अफगाण सैन्यातील सात ते आठ जणांचे नाव चित्रावर लिहिण्यात आले आहे. अहमदशाह अब्दाली सोडला तर इतर कुणाच्याही अंगावर रंग दिसून येत नाही. या दोन गोष्टींवरून कदाचित सदर चित्राचा निर्माता हा अफगाण फौजेतील असावा, असा केवळ अंदाज आपण बांधू शकतो.पानिपतच्या युद्धाचे अस्सल चित्र!

या चित्रामधील काही व्यक्ती व काही विशेष गोष्टी आपण पाहूया.

१. मराठे आणि अफगाण यांच्यात झालेले युद्ध. लाल चौकटीत मराठे आणि त्यांच्या व्यूहरचनेमुळे सर्व बाजूने गिलच्यांनी घातलेला वेढा

२. अहमदशाह दुर्रानी. अफगाणचा राजा. हा ‘दूर-ए-दुर्र’ असा किताब लावत असे. म्हणजे ‘मोत्यांमधील सर्वश्रेष्ठ मोती’..

३. अहमद शाह बंगश. चित्रामध्ये हा अगदी वरच्या बाजूस, डाव्या कोपऱ्यात रेखाटण्यात आला आहे.

४. नजीबखान रोहिला. पानिपतचे युद्ध घडण्यास कारणीभूत असणारा अतिशय पाताळयंत्री माणूस. मराठ्यांच्या संबंध एका पिढीच्या विनाशास कारणीभूत.. याच नजीबाच्या डोक्यावर उंटांची एक रांग आपल्याला दिसून येते. अब्दालीने आपल्यासोबत आणलेल्या झंबुरकांचा अचूक मारा याच उंटांवरून केला आणि त्यामुळे युद्धाचे पारडे पालटले.

५. शुजा उद दौला. पानिपतच्या युद्धाचे पारडे फिरवणारा नवाब. याच्या हातात दाखवलेली तलवार ‘समशेर’ प्रकारातील आहे.

६. जहाँ खान. मराठ्यांच्या शक्तिशाली तोफखान्याला भेदून आतमध्ये घुसणारा अफगाण सरदार. त्याच्यासोबत आपल्याला बंदूकधारी सैनिकांची तुकडी दिसते.

७. अहमदशाह अब्दालीचा वकील ‘शाहवलीखान’. हा पूर्णपणे मराठ्यांच्या गोटात घुसल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या हातातील बंदुका मराठ्यांवर आग ओकत होत्या. शाहवलीखान च्या समोर अफगाण सैन्याची तुकडी मराठ्यांची शिरे कापून भाल्यावर नाचवतानाचे भयान दृश्य इथे स्पष्टपणे चितारले आहे.

८. मराठ्यांचे नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ. त्यांच्या छातीत लागलेली गोळी आणि त्यामुळे येणारे रक्त आपण पाहू शकतो.

९. मराठे व गिलचे यांच्यात सुरू असलेला तोफांचा मारा. तोफांच्या आजूबाजूला आणि मधल्या भागात पडलेला मृतदेहाचा खच आपण पाहू शकतो.

१०. मराठ्यांचे संपूर्ण सैन्य, इब्राहिमखान गारदी याचा तोफखाना आणि मराठ्यांच्या गोटात घुसलेले अफगाण सैन्य.

११. अफगाण व मराठ्यांचे तोपची. तसेच, तोफांचे आकार, छोट्या तोफा आणि पायदळ व तोपची यांच्या डोक्यावरील वैशिष्ट्यपूर्ण टोपी..

सदर चित्र मालोजीरावांनी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचे शतशः आभार.

पानिपतच्या युद्धात शौर्य गाजवलेल्या आणि धारातीर्थी पडलेल्या सर्व मराठ्यांना विनम्र अभिवादन..!!

केतन पुरी.

1 Comment