विठ्ठल मंदिर, जा‍वळे

विठ्ठल मंदिर, जा‍वळे

विठ्ठल मंदिर, जा‍वळे, ता. पारनेर –

अहो भाग्य आमचें सकळ। सापडला तो हा एक विठ्ठल॥
उघडोनी नेत्र पाहे जंव पुढें । तंव दृष्टी पडे पांडुरंग ॥

सोमवंशी जाहागिरदार यांच्या जावळे येथील जहागिरीतील आठराव्या शतकाच्या पुर्वाधात बांधलेले विठ्ठल मंदिर. पालखेडच्या लढाईत धारकरी असलेले सोमवंशी घराणे हे वारकरी संप्रदयाचा पण वसा  त्यांच‍्या घराण्यात आहे. या मंदिराच्या परिसारात कै.ह भ प बाबुरावबुवा सोमवंशी जाहागिरदार यांच्या स्मरर्णाथ वृंदावन व घुमटी पाहायला मिळते.

मंदिराला चारही बाजूने तटबंदी असून घडीव दगडांनी मंदिराचे बांधकाम आहे. प्रवेशद्वारावर शुभचिन्हे आहेत. विठ्ठल मंदिरा सोबत आतमध्ये भैरवनाथाच सुंदर मंदिर आहे. तटबंदिच्या आतल्याच बाजूने कोनाडे केले असून आत मध्ये दिवे व पणती लावायच सोय केली आहे.

त्रिपुरी पोर्णिमेला येथे उत्सव होत असणार. मंदिर बंद असल्याने आतील फोटो काढता आले नाही.

संतोष मु चंदने. चिंचवड, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here