पायदळ निदर्शक वीरगळ, सिंगापूर

पायदळ निदर्शक वीरगळ, सिंगापूर

पायदळ निदर्शक वीरगळ, सिंगापूर –

वाटेत दिसणारा सिंगापूर बोर्ड बघून थांबावं, बाजूला असलेल्या गोसावी बुवांच्या समाधी बघायला म्हणून गाडी पार्क करावी, आणि मग मारुती मंदिरासमोर ठेवलेला हा ऐतिहासिक ठेवा नजरेस पडावा, पायदळ निदर्शक वीरगळ, सिंगापूर.

पायदळ निदर्शक वीरगळ –

खालून पहिल्या कप्यात  विराला वीरमरण आले म्हणून विर आडवा पडलेला दाखवलेला आहे.. दुसऱ्या कप्यात पायदळाचे युद्ध दाखवलेल आहे. विराच्या हातात ढाल व तलवार आहे, समोर शत्रू असून त्यांनी विरावर आक्रमण केले आहे. पायदळा च्या युद्धात विराचा मृत्यू झालेला आहे.  तिसऱ्या कप्यात स्वर्गारोहण दाखवलेलं आहे त्यात तीन अप्सरा विराला घेऊन जाताना दाखवलेलं आहे.  चौथ्या कप्यात वीराला स्वर्ग प्राप्ती झालेलं दाखवलेले आहे . वीर नमस्कार मुद्रेत हात जोडून मांडी घालून बसलेला आहे. मध्ये शिवपिंडी व नंदी आहे दुसऱ्या बाजूला स्वर्गाचा प्रतिनिधी पुरोहित हातामध्ये घंटा व बिल्व पत्र घेऊन शंकराच्या पिंडीवर अभिषेक करीत आहे.

युद्धात वीरमरण प्राप्त झालेला वीराला मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती झाल्याची ही निशाणी आहे. त्याचा वरती कळश आहे. तो मोक्षप्राप्तीचा संकेत असतो.

विरगळी शेजारीच अजून एक विरगळीचा भग्न भाग ठेवलेला आहे.

– श्रद्धा हांडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here