महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,71,445

मा. विलासराव देशमुखांच्या मामांची गढी!

By Discover Maharashtra Views: 4200 2 Min Read

मा. विलासराव देशमुखांच्या मामांची गढी…

मौजे भाळवणी ता. आष्टी जि.बीड येथे साहेबांचे आजोबा भाऊसाहेब आणि आजी गुणाबाई यांना नानासाहेब, साहेबराव आणि भैय्यासाहेब ही तीन मुले आणि गजराबाई (आण्णासाहेब देशमुख जहागीरदार निलंगा ) कलावतीबाई ( हणमंतराव माने देशमुख अकलूज)व सोजरबाई उर्फ सुशीलाबाई या तीन मुली झाल्या..पैकी सुशीलाबाईंचा विवाह मौजे बाभळगाव ता.जि. लातूर येथील मा. दगडोजीराव देशमुखांशी झाला. त्यांच्याच पोटी मा. विलासराव व मा. दिलीपराव ही दोन मुले झाली.

आई सुशीलाबाई सोबत विलासराव लहानपणी भाळवणीला नेहमी यायचे. मामा नानासाहेबासोबत त्यांचे पोहणे फिरणे घोड्यावर दौड मारणे व्हायचे. पुढील पिढीत व्याप आणि गॕप वाढला. तरी साहेब नाते जपणारे असल्याने मुख्यमंञी झाल्यानंतर आवर्जून मामाच्या गावाला लाल दिवा घेऊन आले..तेव्हा पहिला रोड तयार झाला.. खर्ड्याच्या लढाईत पराक्रम गाजवल्यानंतर भाळवणीची जहागीरी आप्पासाहेब निंबाळकरांना मिळाली. तीन एकरावरील किल्लेवजा भव्य गढी त्याला पाच बुरुज, पुढील बाजूस कचेरी आणि बाहेर तबेला तसेच पाण्यासाठी बारव आहे…गढीत जाण्यासाठी देवगिरी किल्ल्याप्रमाणे एकामागून एक तीन दरवाजे आहेत.

गढीमध्ये पाण्यासाठी विट बांधकामातील 50 फुट खोलीचा आड आहे. बुरजावरुन सहजपणे टेहाळणी करता येते तर गढीभोवती 40 एक फुट उंचीच्या तटबंदीला किल्ल्याप्रमाणे शञूवर लक्ष ठेवण्यासाठी झरोके आहेत.. सईबाईच्या वंशातील फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील व छञपती शाहूंचे सेनापती राहिलेल्या हणमंतरावांचे घराणे निजामाकडे गेल्यानंतर सुलतानजी नावाने ओळखले गेले..बीड, खर्डा त्यांची जहागीरीची ठिकाणे असून यांचाच एक पुरुष आप्पासाहेब 42 गावच्या जहागीरीवर भाळवणीला आले..भाळवणीचे वैशिष्ट्य म्हणजे गावात निंबाळकरांचे एकच मराठ्यांचे घर असुन बाकी 99% मुस्लीमांची वस्ती आहे. निंबाळकरांची परिस्थिती जेमतेम असलीतरी साहेबांचे मेहुणे अरुणरावसह सर्वजण माणुसकीने खुप श्रीमंत आहेत..अशी ऐतिहासिक घराणी त्यांच्या वास्तुसह जपली पाहिजेत…

भाळवणीच्या मातीने विलासरावांसारखा कर्तृत्वान पुरुष आपल्या अंगावर खेळवला..याची प्राकर्षाने आठवण येते…त्यांच्या नातलगांनीच नाहीतर इतिहासप्रेमींनी भाळवणीला अवश्य भेट द्यावी..



माहिती साभार – Dr. Satish Kadam

Leave a Comment