महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,260

गेले ऊमाजी कुणीकडे ???

By Discover Maharashtra Views: 3801 5 Min Read

🚩गेले ऊमाजी कुणीकडे ??? 🚩

सध्या रमण ( आण्णा ) खोमणे ह्यांच्या रुपात ऊमाजीची सातवी पिढी खोमणेमळा येथे रहात आहे !

आपणांस ऊमाजी समजला नाही कि तो आपण समजुन घ्यायचा प्रयत्नच करीत नाही, हेच समजायला मार्ग नाही .😕

जो ऊमाजी संबध देशासाठी लढला तो आजही केवळ रामोशी .. बेरड … धनगर … ह्यांचाच होऊन राहिला आहे .

दुदैर्व !!

त्यावेळी मॅकिनटाॅश होता म्हणून आपणांस खरा ऊमाजी समजला ??
परंतु आता ?.

प्रचंड साधने ऊपलब्ध असतांना आपण ऊमाजीकडे वळू नये ?

शिवरायांचा प्रचंड ऊदोऊदो करीता असताना , त्याच शिवरायांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या पुरंदरावर ज्या फक्कडाने स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले .. त्यास आपण भेटावया आपण आपली पाऊले खोमणेमळ्याकडेही वळवू नयेत ?

” स्वातंत्र्यासाठी बंड करताना ऊमाजीपुढे ईथल्या शिवाराजांचा आदर्श होता . त्यास ह्या देशीचा दुसरा शिवाजीच बनायचे होते . ” असे कॅप्टन मॅकिनटाॅश म्हणतोय !

अन !!
आपण आजही ऊमाजीबद्दल काय म्हणतोय ??

केवळ एक लुटमार करणारा रामोशी गडी ,
फौलादी ताकदीचा खंडेरायाचा भक्त ,
ईंग्रजावर हात ऊगारणारा व स्वातंत्र्याची स्वप्ने बाळगणारा मर्द !!

बस्स !

हिच ती काय ऊमाजीबद्दल आपली प्रतिमा .
हाच काय तो अभ्यास !

जेमतेम पाचेक पुस्तकांचा पांचुदा ! तोही शे दिडशे पानांचा !
त्यात काही पोवाडे , दंतकथा वा लोकनाट्ये !
बस्स एवढेच की काय त्याच्या वाट्यास आले !

ह्या देशीचा राॅबिन हुड बनून राहिलेला हा ऊमाजी अजुन किती शतके अंधारात राहणार आहे ??

ईतिहासप्रेमींना काही घेणंदेणं नाही . ईतिहास अभ्यासकांच्या हा आवडीचा विषय नाही . ऊमाजीचे वारसदार केवळ आवडीच्या पुढे छात नाहित . सरकार दरबाराकडुन काही हालचाल नाही की आर्थिक मदत नाही .

आज जी साधीसुधी समाधी आपण खोमणेमळा येथे पहात आहोत तीही वारसदारांनी स्वतः बांधली आहे .
ऊमाजीचे स्मारक भिवडीतील प्राथमिक शाळेजवळ डाबंरी रस्त्याच्या ऊजवीकडे ( सासवडकडुन पुरंदरला जाताना ) आहे .

09 ऑगस्ट 1981 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री बॅरीस्टर अंतुले ह्यांनी ह्या स्मारकाचे ऊद्घाटन केले . परंतु आजतागायत ती ईमारत तर पुर्ण झाली . परंतु तिच्या आत ऊमाजीचे स्मारक मात्र बनले नाही . आज तिथे अंगणवाडीची शाळा भरते .

गेल्या 37 वर्षांत जे महाराष्ट्र सरकार ऊमाजीचे साधे स्मारक बनवू शकले नाही त्या सरकारकडून आपण अजून काय अपेक्षा ठेवणार ?

बरे हि झाली सरकारची कथा !

ऊमाजीच्या वारसदारांचीही कथा काही वेगळी नाही .

सध्या ऊमाजीची सातवी पिढी खोमणेमळा येथे जीवन कंठत आहे .

कोण मोलमजुरी करतंय ! कोण दुस-याच्या शेतात तिस-या हिश्श्याने राबतंय ! तर कोण तिथुनच परप्रांती परागंदा झालंय ! सांगायला लाज वाटते की , ह्यांचे अनेक वारस आज दारू काढणे अन दारू विक्रीचे गुत्ते चालवतात !

होय !!
भिवडीमधील खोमणेमळ्याच्या सध्याच्या वशंजात ऊमाजी हे केवळ क्रांतीकारक ऊमाजी राहिले नसुन ते दैवी अवतारीपुरूष ऊमाजीबाबा झालेले आहेत .

ऊमाजीच्या नावावर तब्बल अर्धा शतकभर रामोशी धनगर संघठना आहेत. ह्या संघटनानी एक एक रूपया जरी वर्गणी गोळा केली तरी हे स्मारक तडीस जाईल .

परंतु हे करणार कोण ?

ऊमाजीची नावाखाली ईतर जातीपुढे केवळ दंड थोपटणे व काॅलर ताठ करणे ह्यापेक्षा ह्या संघठनानी काहीही केलेले नाही.

येथे ऊमाजीस ऊमाजीबाबा म्हटले जाते . मोठा दैवी चमत्कारीक पुरूष समजले जाते !
अशा श्रद्धेय ऐकिव पिढीकढुन नेमकी खात्रीलायक काय माहिती भेटणार …..??

ऊमाजींच्या स्मारकाचे ऊद्घाटन होऊन 37 वर्षे ऊलटली . हेही आपण सर्वांनी विसरता कामा नये ??

सरकारने ऊमाजीच्या जयंती वा मयंतीसमयी दिलेली शासकीय सुट्टी म्हणजे केवळ रामोशी समाजाची मते लुटण्याचा हा प्रकार होय .

ईथे नाव द्यायची गरज नाही परंतु मागील काही निवडणुकांमध्ये हेच स्मारकजिर्णोद्धाराचे गाजर तेथील आमदारसाहेब भिवडीवासियांना देत आहेत .

ईथे आपण सर्वच ऊमाजीचे गुन्हेगार आहोत ??

● ढोंगी व ईतिहासशुन्य असलेली सरकारी यंत्रणा !

● ठराविक जातीच्या मतांसाठी महापुरूष बाजूला ठेऊन केलेले मतांचे राजकारण !

● ऊमाजीबद्दल ईतिहाससंशोधक व अभ्यासकांकडून झालेले दुर्लक्ष !

● पराक्रमी ऊमाजीस ऊमाजीबाबा नावाचा दैवी अवतारी पुरूष करणारी त्यांची सध्याची सातवी पिढी !

● ऊमाजीवर कशाही प्रकारे संशोधन न करणारी रामोशी वा ईतर समाजातील नवतरुण अभ्यासू मंडळी !

● केवळ नाचतमाशे पोवाडे वगनाट्ये भाकडकथा अन दैवी श्रद्धाळु दंतकथा ह्यातच ऊमाजी पाहणारी आजची नवतरूणांची पिढी !!

होय !!

आपण ऊमाजीचे गुन्हेगार आहोत .

जिथे पराक्रम हा चमत्कारारच्या भिगांतुन बघितला जातो . तिथे पराक्रमी पुरूषांचा दैवी अवतारी पुरूष होण्यास वेळ कितीसा लागतो

● क-हामाईच्या कुशीत

छायाचित्र: नरवीर ऊमाजी नाईंकाचे भिवडीतील स्मारक. 09 ऑगस्ट 1981 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अंतुले ह्यांनी ह्या स्मारकाचे ऊद्गाटन केले . 37 वर्षांनंतरही ते स्मारक अर्धवटच आहे .

शब्दांकन : सतिश शिंदे सह्याद्रीवेडा .

Leave a comment