तोरणा किल्ला | Torna Fort Pune
पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच असा तोरणा किल्ला (Torna Fort) असून त्याच्या ताशीव अशा सरळसोट कातळ कड्यामुळे तो बेलाग झालेला आहे त्याच्या प्रचंड विस्तारामुळे या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंडगड असे नाव दिले होते…
महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय वाङ्मयात येते ऋग्वेद, मनुस्मृति, कौटिलीग अर्थशास्त्र, महाभारत (शांतिपर्व), पुराणे ह्यांसारख्या ग्रंथांतून दुर्ग त्यांचे प्रकार आणि महत्त्व ह्यांचे विवेचन आहेत
किल्ल्यांचे बांधकाम व उपयोग फार काळापासून सर्व जगभर होत आला आहे ज्या काळी अनपेक्षित परचक्राची भीती असे, त्या काळी घरे, मंदिरे, नगरे तटबंदी व कोट बांधून सुरक्षित ठेवण्याची प्रवृत्ती होती शत्रूचा हल्ला आल्यास रयतेला त्वरित संरक्षण मिळावे व शत्रूशी मुकाबला करण्यास सोयीचे होते…
तोरणा /प्रचंडगडा वरील वास्तूस्थापत्याचे दुर्गकिरणामुळे किल्ला अभेद्य रहावा, म्हणून त्या वेळच्या युद्धपद्धतीनुसार बुरूज, दरवाजे, तटबंदी, तटबंद माची, खंदक वगैरेंची रचना करीत एवढेच नव्हे, तर युद्धप्रसंगी शस्त्रास्त्रे सहजसुलभतेने हाताळता यावीत म्हणूनही काही खास योजना आखण्यात आलेत.
त्याच्या प्रचंड विस्तारामुळे या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंडगड असे नाव दिले होते विजापूरच्या अदिलशहाच्या ताब्यामध्ये तोरणा किल्ला होता शिवरायांनी तो आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याची मुहुर्तमेढ येथेच रोवली या किल्ल्याचा ताबा घेतल्यावर त्याची दुरुस्ती करीत असतांना मोहरांनी भरलेले हंडे शिवाजी महाराजांना मिळाले या धनाचा वापर त्यांनी तोरण्याची दुरुस्ती आणि राजगड किल्ल्याच्या उभारणीसाठी केला पुढे हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला औरंगजेब बादशहाला तोरणा किल्ला जिंकून घ्यावा लागला कुठल्याही भेदनितीला तोरणा बळी पडला नाही पुढे शाहू महाराजांच्या ताब्यात व नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला इंग्रजांनी हा किल्ला भोर संस्थानाच्या ताब्यात दिला…
बिनीचा दरवाजा : कातळ कड्यांमध्येच तोरण्याचा पहिला दरवाजा आपल्याला लागतो या दरवाजाला बिनीचा दरवाजा म्हणतात…
कोठी दरवाजा : कोठीच्या दरवाजातून प्रवेश केल्यावर आपल्याला तोरणाजाईचे मंदीर लागते येथेच महाराजांना मोहरांचे हंडे सापडल्याच्या नोंदी आहेत जवळच तोरण टाळे व खोकड टाके आहे या टाक्यापासून थोडे चढल्यावर आपण पोहोचतो ते बालेकिल्ल्यामध्ये येथे मेंगाईदेवीचे देऊळ आहे या मंदिराच्या परिसरामध्ये उध्वस्त झालेल्या वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात दिवाणघर आणि तोरणेश्वर महादेवाचे मंदिर पाहता येते.

