महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,71,354

सेनापती हंबीरराव मोहिते समाधीस्थान

By Discover Maharashtra Views: 1961 4 Min Read

सेनापती हंबीरराव मोहिते समाधीस्थान, तळबीड, जि. सातारा –

सरसेनापती म्हणून दोन राजाभिषेक समारंभात भाग घेण्याच भाग्य लाभलेले ते सदैव शत्रूवर विजय मिळवत रणांगणात वीरमरण स्विकारत ति ही लढाई जिंकायच  भाग्य लाभलेले स्वराज्याचे तिसरे सरसेनापती सेनाधीश हंबीरराव मोहिते. वसंतगडाच्या अंगाखांद्यावर वाढलेले मोहिते घराण्याच्या पिढ्यानपिढ्या या तळबीड मध्ये लष्करी परंपरा जपत पराक्रम करीत होती. सेनापती हंबीरराव मोहिते समाधीस्थान. हंबीररावांचे पणजोबा रतोजी  मोहिते हे निजामशाहीत असतांना त्यांना ‘बाजी’ हा किताब मिळाला.

हंबीररावांचे आजोबा तुकोजी मोहिते. यांनी तळबीडची पाटीलकी मिळवली. यांना तीन मुलं . संभाजी धारोजी व तुकाबाई ही कन्या. तुकाबाईंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.त्या शहाजीराजांच्या दुस-या पत्नी. शहाजीराजे अदिलशाहीत असतांना त्यांच्या सोबत मोहीते बंधूंनीपण पराक्रम गाजवला.त्यांना कर्यात तळबीड व बालाघाटाची देशमुखी मिळाली. संभाजी मोहितेंचे पुत्र हंसाजी उर्फ ब-हाणजी. हंसाजींच्या भगिनी सोयराबाई .ह्या शिवरायांच्या पत्नी झाल्या. हंसाजी आपल्या पराक्रमाने शिवरायांचे पंचहजारी सेनानी झाले. आपल्या पराक्रमाने ते शिवरायां सोबत स्वराज्याच्या विस्तारात आपल योगदान देत होते.

राजाभिषेक जवळ येत असतांनाच सेनापती प्रतापराव गुजर यांचा बहलोलखानाशी लढताना  मृत्यू आला. चिपळूण येथे मुक्कामात महाराजांना नरवीर नेता निवडायचा होता. शौर्य, नेतृत्व ,मर्द‍ाना, चौकस ,धारकरी असा सेनापती त्यांना हवा होता.अस एक नाव त्यांच्या समोर होत व ज्यांच घराण स्वराज्यसेवेत  जुळलेल होत ते म्हणजे ‘हंसाजी मोहीते ‘.

‘दुध आणि पाणी वेगळ करणा-या हंसाच नाव सार्थ करणा-या हंसाजीना आम्ही आज हंबीरराव हा किताब देत आहोत.तर सरसेनापती हंबीररावांनी अधिक हंबीरी अर्थात पराक्रम करून आपली किताबत सार्थ करावी आणि तुम्ही शूरवीरांनी राजाभिषेकासाठी रायगडी चलाव.’असा आदेश दिला . येथूनच पुढे हंसाजी मोहिते हे हंबीरराव  म्हणून ओळखू जाऊ लागले.

सेनापती या नात्यान ते अष्टप्रधानात ते समाविष्ट झाले. सेनापती झाल्यावर राजाभिषेकाला जाण्याअगोदर एखादा गडकोटाचा आहेर महाराजांना दिल्या शिवाय त्यांच्या समोर कस जायच म्हणत त्यांनी बेसावध असलेल्या केंजळगडावर हल्ला करून तो जिंकून महाराजांच्या स्वराज्यात आणल. तर राजाभिषेकाला मोघलांनी नजराणा दिला नाही म्हणून त्याची वसूली करण्यासाठी बहाद्दूरखानची छावणी लुटून अपार संपत्ती स्वराज्यात आणली.

आनेक पराक्रमावर पराक्रम करित असतांना महाराजांच्या मृत्यू नंतर रायगडावर झालेला  कटकारस्थान उधळूण लावत आपली निष्टा संभाजीराजें सोबत वाहिली. संभाजीराजांनी  सेनापतिपद हंबीररावांकडेच ठेवल. मोघलांच्या ब-हाणपूरवर व ओरंगाबाद वर छापा घालत प्रचंड संपत्ती स्वाराज्यात आणली. १६८३ मध्ये कल्याण  भिवंडी काबीज केले.

रायगडावर असतांना सर्जाखान वाईप्रांती घुसू पाहत होता. त्याचा बंदोबस्त हंबीररावांना करायचा होता. रायगडावरील कलहात दोन दिवस जात नाहीतर सर्जाखान वाईत घुसला . सेनापती हंबीररावांना हे समजतात त्यांनी दौड घेतली .त्यांनी जबरदस्त मुसळी मारत सर्जाखानला माघार घ्यावी लावली यात सर्जाखानचे फार नुकसान झाले.य‍ा रणधुमाळीत अचानक शत्रूपक्षाची एक तोफ धडाडली.आणि अचानक तोफेचा एक गोळा सेनापतींच्या छातीवर बसला त्यात त्यांचा मृत्यू झाला.

आत्ता पर्यंत प्रत्येक लढाईत विजय विजय मिळवून देणा-या हंबीररावांना  या अंतीमक्षणीही मृत्यूने रणांगणात विजयाची माळ घातली होती. आपल्या आयुष्याची अवधी झाल्यावर हंबीरराव गेले पण जाताना औरंगजेबला संपवायचा वसा पुढच्या पिढीकडे देऊन गेले. संताजी धनाजी सारखे  भविष्यातील महापराक्रमी सेनापती घडवून गेले. आशा सेनापतींची हंबीरराव मोहितेंची समाधी कराड तालुक्यातील वसंतगडाच्या पायथ्याशी तळबीड गावात आहे.

समाधी भव्य चौथ-याच्या रुपात असून त्यावर हत्ती व मोर कोरले आहेत. चौथ-याला दगडी तोरणची रचना केली आहे. परिसर जिर्णोद्धार झाला असून सेनापतींचा इतिहास येथे लिहला आहे. परिसर सुशोभिकरण केला असल्याने व योग्य रितीने राखल्याने येथील पवित्रता जपली जाते. आशा सेनापतींसमोर नतमस्तक  होण्यासाठी या समाधीच्या दर्शनासाठी  नक्की यावे.

श्री मंछिवमाहानुभाव सेनाधीश l हंबीरराव ll

संदर्भग्रंथ : मराठ्यांची धारातीर्थे.

रणभाग्य.

संतोष मुरलीधर चंदने. चिंचवड, पुणे.

Leave a Comment