महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,767

सिद्धिविनायक सिद्धटेक

By Discover Maharashtra Views: 3649 3 Min Read

अष्टविनायक मधील सिद्धिविनायक सिद्धटेक….

सिध्दटेक दुसरा गणपती आहे श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक सिद्धटेक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे गणपती मूर्ती हि शांत व कोमल जाणवते…

मंदिर पेशवेकालीन असल्याने कोरीव दगडाचा वापर केला आहे मंदिरासमोर दगडी दीपमाळा आहे तसेच मंदिराची वेस भव्य दिव्य आहे.. वेसींवरती (बाहेरील बाजू) ताकदीचे प्रतीक व्हाळ व वर्तुळाचे शिल्प कोरले आहे तर आतील बाजूवर्ती मल्लांची कुस्तीचे शिल्प आहे… पेशवेकालीन महत्त्व लाभलेला सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा गणपती आहे हे गणेश मंदिर १५ फूट उंच व १० फूट लांब आहे तसेच या प्राचीन मंदिराचा गाभारा अहिल्याबाई होळकर यांनी बांधला आहे…
या छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या मंदिराचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी बनवला आहे..
तसेच नदीकिनारी जो भव्य दिव्य असा ताशीव दगडाचा घाट आहे याची निर्मितीही अहिल्यादेवी यांनी केली आहे..

मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती हि स्वयंभू असून तीन फूट उंच व अडीच फूट रुंद अशी आहे… मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी अशी आहे.. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या आहेत तसेच मध्यभागी नागाची आकुर्ती आहे…
देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे अत्यंत नाजूक कोरीव काम मखरेवर आहे..

सिद्धटेकचा परिसर हा ऐतिहासिक व निसर्गरम्य आहे नादिलगत असल्याने हिरवीगार चादर ओढल्यासारखा हा परिसर जाणवतो.. नदीचा दुसऱ्या टोकाला पेडगावचा यादवकालीन ऐतिहासिक किल्ला धर्मवीरगड दिसतो.

सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती.
पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विश्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.
छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले.
हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.
मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.

Cr – Unknown

बाजींद कांदबरी

Leave a comment