शिवराई भाग २०

शिवराई भाग २०

शिवराई भाग २०…

आज ३ शिवराई पाहुया
मागील ९ दिवस आपण विविध सन अंकित असलेल्या शिवराई पहिल्या. १२३०, १२३१, १२३२, १२३३, १२३४, १२३९ आणि १२४०.
या नाण्यांचे उपप्रकार देखील उपलब्ध आहेत, जसे ‘१२३० श्री’, ‘१२३२ श्री’ आणि ‘१२३४ श्री’ हि तीन नाणी आज पाहुयात. या नाण्यांवर ‘श्री १२३०’ ऐवजी उलटे म्हणजे ‘१२३० श्री’ याप्रमाणे लेख आलेला आहे.
१२३० श्री मधील ३० श्री, १२३२ मधील २ श्री, १२३४ श्री मधील ३४ श्री प्रस्तुत नाण्यांवर आल्याचे आपल्याला दिसते.
या तारखा अंकित शिवराई नेमक्या कोणाच्या हा प्रश्न आहेच. १२३१ पासून १२३४ अंकित शिवराई वर खाली तिसऱ्या ओळीत काही वेळा ‘शाउ’ अंकित असल्याचे पाहायला मिळालेले आहे. तर १२४० अंकित शिवराई वर तिसऱ्या ओळीत असल्याचे पाहायला मिळते.

मराठेकालीन नाणी या पुस्तकात श्री. बलसेकर सर १२३१ पासून १२३४ पर्यंत अंकीत नाणी शाहू महाराजांची असल्याचे सांगतात. तारखा असलेली हि नाणी एक दांडी नसून दुदण्डी आहेत त्यामुळे हि नाणी पहिल्या शाहूंची नसावीत तर त्यानंतरच्या शाहूंची असावीत असा अंदाज आहे.तर काहींच्या मते हि नाणी छत्रपतींच्या नावाने ब्रिटिशांनी पाडलेली आहेत. याबद्दल ठोस असा पुरावा उपलब्ध नाणी.
आपल्याला या सर्व तारखा अंकित शिवराई आवडल्या असतील अशी आशा. आता पुढील १० दिवस आपण पाहणार आहोत विविध चिन्ह अंकित शिवराई.

Shivrai-20

 

 

 

आता भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here