शिवराई भाग १८

शिवराई भाग १८

शिवराई भाग १८…

फसली सन अंकित शिवराई नाण्यांमधील एक कमी मिळणारे नाणे आपणास दाखवतोय. ते म्हणजे ‘१२३९’ अंकित नाणे. शिवराईवरील फसली सन अंकित बाकी नाण्यांपेक्षा हे नाणे कमी मिळते. काल तुम्हाला श्री १२३४ अंकित नाणे दाखवले. शिवराई वर फसली सन १२३४ नंतर १२३५, १२३६, १२३७, १२३८ अंकित नाणी सापडत नाहीत, मी तरी अजून पहिले नाही. abbot ने लिहिलेल्या लेखात तो यातील काही शिवराई पहिल्याच उल्लेख करतो पण त्याची छायाचित्र मात्र दाखवत नाही त्यामुळे त्यावर तोवर विश्वास ठेवणे शक्य नाही जोवर हि नाणी आपण प्रत्यक्ष पाहत नाही.

१२३९ अंकित नाण्यांवर राजा नंतर एक फुलासारखे चिन्हही पाहायला मिळते. तर मागील बाजूनी असलेल्या छत्र वर देखील काही चिन्ह आपल्याला दिसतात. या शिवराई चांगल्या स्थितीत मिळवणं जरा कठीणच जात. नाण्याच वजन, आकार हा सर्वसाधारण दुदांडी शिवराई नाण्याप्रमाणेच आहे.

आता उद्या भेटुयात आणखी एका नव्या शिवराई सोबत….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here