शिवराई भाग १

शिवराई भाग १

शिवराई भाग १

शिवछत्रपतिंच्या शिवराई पासुन सुरुवात करुन 19 व्या शतकापर्यंतच्या शिवराई आपल्याला पुढील 30 दिवसात पहायच्या आहेत. चला तर मग हि शिवराईच्या 250 वर्षांच्या अस्तित्वाची सफर अनुभउया.
त्यातील पहिले नाणे आपल्यासमोर सादर करतोय.

‘स्वराज्याचे चलन’ पुस्तक वाचले असेल तर आपल्याला माहिती असेल कि महाराजांच्या राज्याभिषेकापासून म्हणजेच इ.स. 1674 पासुन त्यांनी ताम्र शिवराई आणि सुवर्ण होन हे चलन सुरु केले असे दिसते. शिवाजी महाराजांनी सुरु केलेले शिवराई नाणे हे तांब्याचे असून त्याचे वजन ११-१३ ग्राम च्या आसपास असते. या नाण्याचे त्याकाळी मूल्य एक पैसा असावे.
११ ते १३ ग्राम वजन आणि नाण्याच्या कडेनी बिंदुमय वर्तुळ (dotted border) असणाऱ्या शिवराईला संग्राहक रायगड शिवराई म्हणजे रायगडच्या टांकसाळीतुन पाड्लेली शिवराई मानतात. या शिवराईवर पुढिल बाजुनी तीन ओळीत- ‘श्री/राजा /शिव’ आणि मागील बाजुनी- ‘छत्र/पति’ असे दोन ओळीत लिहीलेले असते. बिंदुमय वर्तुळ असणाऱ्या शिवराई सुबक असुन पुढील व मागील बाजु व्यवस्थित जुळविलेल्या असतात, पण सद्ध्याच्या परिस्थितीत या शिवराई मिळवणं खुप कठिण झालेलं आहे. खाली दाखवलेली शिवराई याच प्रकारची आहे.

‘स्वराज्याचे चलन शिवराई’ नाण्यांबद्दलची अधिक माहीती तुम्हाला ‘स्वराज्याचे चलन’ या पुस्तकात मिळेल. वाचले नसेल तर खाली लिंक देतोय. जा, विकत घ्या, वाचा आणि अभिप्राय कळवा.

स्वराज्याचे चलन- https://bit.ly/2tx7TC4

आपलाच
आशुतोष पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here