महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,74,803

सरदार यशवंतराव पवार | धार संस्थानचे दुसरे अधिपती

By Discover Maharashtra Views: 1308 1 Min Read

सरदार यशवंतराव आनंदराव पवार –

पानिपतात विरगती प्राप्त झालेले सेनापती, धार संस्थानचे दुसरे अधिपती सरदार यशवंतराव आनंदराव पवार. माळव्या तील मराठी राज्याविस्तारात यांचा सहभाग होता.सन १७३४-३५ ची माळव्याची मोहिम,सन १७३६ मध्ये चिमाजी अप्पांसोबत वसईच्या मोहिमेतही ते आघाडीवर होते.त्याच साली आनंदरावांच्या निधनानंतर यशवंतरावांना सरंजामाची वस्त्रे देण्यात आली.

पुढेही पेशव्यांच्या अनेक मोहिमांत ते सहभागी होते. पानिपताच्या लढाईत ते आपल्या पंचवीस हजाराच्या फौजेसह विश्वासरावांकडच्या बाजूस होते.प्रत्यक्ष लढाईला सुरूवात होताच यशवंतरावांच्या तुकडीने अताईत खानाच्या सैन्यावर हल्ला चढवला.

यशवंतरावांनी हत्तीच्या अंबारीतून तिरंदाजी करणाऱ्या अताईत खानावरच हल्ला करीत,त्याच्या हत्तीवर चढून त्याचं मस्तक धडावेगळं केलं.हा महाभारतीचा रणवीर तेव्हा रुधिराभिषिक्त भैरवंच भासत असावा. पुढे याच चकमकीत हे रणवीर धारातिर्थी पडले.

वंशपरंपरेनंच मिळालेला शौर्याचा वारसा यथोचित सांभाळत आपल्या यशवंत या नावाला साजेसाच पराक्रम गाजवला हेही तितकंच खरं.

Leave a comment