महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,98,929

बाजीरावपुत्र समशेर बहाद्दर

By Discover Maharashtra Views: 3834 2 Min Read

बाजीरावपुत्र समशेर बहाद्दर

‘श्री बल्लाल चेरणी तत्पर | समशेर बहाद्दर निरंतर’

इ.स.1734 मधे बाजीराव-मस्तानी यांच्या पोटी समशेर चा जन्म झाला.जन्म झाल्याच्या काही काळानंतर बाजीरावांचा मृत्यु झाला आणि त्यामुळे मस्तानी ने आत्महत्या केली.लहान वयातच अजानतेपनी पोरकेपन आले.परंतु बाजीरावांच्या नंतर गादीवर आलेले नानासाहेब पेशवे यांनी समशेर ला संभाळले.त्याचे शिक्षण,लग्ने करुण दिले.समशेर वयात येताच एक ख़ासा सरदार आणि पेशवे घरन्याचा आप्त म्हणून ओळखला जाऊ लागला.त्याने अनेक मोहिमा मधे आपला सहभाग नोंदवलाच पण पराक्रमाची चुनुक दाखवली.मराठे आणि निजाम यांच्यात झालेल्या भालकी येथील लढाइमधे त्याने पराक्रम गाजवला.
नानासाहेब यांनी इंग्रजांशी संगनमत करुण तुळाजी आंग्रे यांच्या विरोधात मोहीम उघडली.याचे नेतृत्व खुद्द समशेर ने केले.पावसाळ्यात तब्बल 2 महीने वेढा देऊन त्याने रत्नागिरी चा किल्ला जिंकून घेतला आणि आंग्रेनचा पराभव केला.तसेच ग्वाल्हेर,कुम्भेरि या मोहिमे मधेसुद्धा त्याची उपस्थिती वर्णनीय होती.त्याने स्वतः बुंदेलखंड येथे स्वतंत्र मोहीम काढली आणि पाउन कोटींचा मुलुख मराठा साम्राज्याला जोडला.

मारवाडचा राजा बिजेसिंग याने धोक्याने राणोजीपुत्र जयप्पा शिंदे यांचा खून केला.तेव्हा समशेर शिन्द्यांच्या मदतीला गेला.समशेर आणि शिंदे यांनी मिळून मारवाड,जयपुर चा सारा प्रदेश उध्वस्त केला आणि बिजेसिंग ला शरण आणले.

जेव्हा दिल्ली वर अहमदशाह अब्दालीचे आक्रमण झाले,तेव्हा मराठे उत्तरेत दिल्लीच्या संरक्षणासाठी गेले.परंतु,पानिपत येथे झालेल्या युद्धात अहमदशाह अब्दाली विजयी ठरला.पेशव्यांच्या हुजूरातीच्या फौजेमधे समावेश असणार्या समशेर बहाद्दर या पराभव आणि सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांच्या मृत्यूनंतर सूरजमल जाट कडे गेला.परंतु,आंगावर असणार्या प्रानांकित जखमांमुळे काही दिवसातच त्याचा भरतपुर येथे मृत्यु झाला. रूपवान,पराक्रमी अशा समशेर बहाद्दर चे लग्न मेहराम बाई सोबत झाले होते.आणि बांदा चे ‘ पाहिले नवाब’ होण्याचाही मान मिळवला होता..आपल्या पराक्रमाने….
अशा ‘समशेर बहाद्दर’ योद्धयाविषयी आपल्याला विसर पडने,ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

Leave a Comment