संभाजी महाराजांचे राजमंडळ

संभाजी महाराजांचे राजमंडळ

संभाजी महाराजांचे राजमंडळ…

राजमंडळ विषयी डॉ . व्ही. टी . गुणे लिहितात , ” शिवाजी महाराजांनी नव्यानेच राजमंडळ स्थापन केले आहे .
‘रख्तखाना’ या संस्थेपेक्षा राजमंडळाचे स्वरूप वेगळे होते . राजमंडळ हि संस्था
” सप्तांगम् राज्यम् ” ह्या धर्तीवर महाराजांनी उभी केली . छत्रपतींचे अधिकार सार्वभौम असले तरी राजमंडळाच्या सहकार्याने , प्रसंगी सल्लामसलतीने , राज्यकारभार करण्याची पद्धती शिवाजी महाराजांनी स्वीकारली होती . संभाजी महाराजांनी पण याच पद्धतीचा अवलंब करण्याचा कसोशीने प्रयत्न केला .संभाजी राजीयांच्या कारकिर्दीत राजमंडळाच्या सभेत राजकीय बाबींवर निर्णय घेतल्याचा पुरावा अजून सापडला नाही पण कदाचित पुरावा सापडेल हे वाटतंय.

पुढे महाराणी ताराबाईंच्या कारकिर्दीत राजमंडळाच्या सभेत निर्णय घेतल्याचा एक पुरावा उपलब्ध आहे . त्या वरून डॉ पी. एस. जोशी सर निष्कर्ष काढतात कि संभाजी महाराजांच्या हि कारकिर्दीत हि पद्धती अस्तित्वात असली पाहिजे हे निश्चित आहे . सन १६८२ पासून ते सन १७०७ पर्यंत मराठ्यांनी औरंजेबविरुद्ध जो अभूतपूर्व लढा दिला त्या लढाईचे रहस्यच राजमंडळाच्या कामकाजपद्धतीत दडलेले आहे. राजमंडळाच्या सभेला महत्वाचे न्यायनिवाडे करण्याचाही अधिकार असे . राजमंडळातील शाख्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या नेमणुका स्वतः छत्रपती करत असत. राजमंडळाचे प्रधान सर्व राजकीय हुकुमांवर आपली निशाणी करत व संमती देत. राजाचे खाजगी दरकदार हे राजमंडळाचेहि दरकदार म्हणून काम करीत आणि याशिवाय सभासद म्हणून सल्लागारांचीही समावेश राजमंडळात अस्तित्वात असे.

Ref : डॉ . जयसिंगराव पवार ,छत्रपती संभाजी राजा

ह्या पूर्ण घटनेचे साक्ष देणारे संभाजी राजीयांचे छत्रपतिपदाची ताकद अनुभवण्यास १६ जानेवारी,२०२० रायगडी आतुरतेने यावे लोकहो.

Be a part of the Grand Coronation Ceremony on fort Raigad , on 16 January ,2020 The Capital Of Marathas.

राजा शंभु छत्रपति जयते

संकलन – अमित राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here