धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०३

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०३

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०३ –

हरजीराजे कर्नाटकात घुसलेल्या मोगली फौजांचा चांगला समाचार घेत होते. त्यांच्या आज्ञेने संताजी वीस हजार फौजबळाने कांजीवरमला उतरले. मद्रासजवळ आलेल्या मोगली फौजांची हरजींच्या सरदारांशी जागोजाग गाठ पडत होती. वांदीवाशला तर मोठी लढाई जुंपली होती, दुसऱ्यांदा दोन्ही सैन्यांची. भागानगरहून निघालेल्या आझमने बेळगावचा भुईकोट विजापूरकराकडून कब्ज केला. जंग-जंग केले होते, तो राखण्यासाठी हंबीररावांनी.

औरंगची चाल साफ प्रकट झाली. स्वत: विजापूर गोवळकोंड्यात फिरत राहून आपल्या मातब्बर फौजा त्याने कर्नाटकात उतरविल्या. मराठी मुलखात आझम पेरून फोडाफोडीसाठी विसावर खान फेकले.

गांगोलीला जायला कुलेशांसह राजे गड उतरले. राया-अंताला वाटले होते नेहमीसारखे आपणाला बरोबर घेतले जाईल. पण त्यांना मागेच राहण्याची आज्ञा करून खासगी सेवेसाठी खिदमतगार पुरुषा घेण्यात आला. त्याच्याबरोबर कुलेशांच्या वाड्याकडचे निवडक वीस-एक सेवकही होते. पाचाड सोडण्यापूर्वी थोरल्या आऊंच्या छत्रीचे दर्शन घेतलेले महाराज पाचाडवाड्याच्या सदरेवर आले. तिथल्या रिवाजी घाटेला नेहमीसारखा आतील टोल न दिसल्यामुळे त्यांनी वाड्याच्या निगराणीच्या हिरोजी इंदुलकरांना विचारले, “हिरोजी, घाट रिकामी ठेवल्येय ती?”

हिरोजी घाटेकडे बघत जाबाचे म्हणाले, “जी… तडा गेलाय घाटेच्या घेराला अंग धरून! दिसत न्हाई त्यो वरवरनं म्हून टोल उतरून ठिवलाय!”

राजे आणि कुलेश ती लोंबकळती रिकामी घाट बघतच राहिले. राजांच्या मनी थोरल्या आऊंच्या कैक आठवणी घणघणूत गेल्या. पाचाडच्या मंडळींचा निरोप घेऊन ते कुलेशांसह वेशीबाहेर पडले. गडावर निलोपंत, येसाजी, मोरेश्वर, खंडोजी सर्वांना त्यांनी त्यांच्या-त्यांच्या खात्यांचा सर्व सूचना दिल्या होत्या. आपण कुठे जातो आहोत, हे मात्र ते कुणालाच बोलले नाहीत. येसूबाईंनासुद्धा! चांगोजी काटकरामार्फत गांगोलीच्या सुभेदारांना आपण येत असल्याचा स्वार त्यांनी पाठवला होता. कुलेशांनीही तसाच स्वार शंगारपूरला ला शिवयोग्यांना पाठवून कळविले होते की, निरोप मिळताच शिष्यगणांसह गोली जवळ करावी. स्वाराबरोबर दिलेल्या पत्रात ‘कठोरउपासने’चा संकल्प कळविला होता. गांगोली नजरटप्प्यात आले. बाळ शिवाजीराजांच्या जन्माचे, येसूबाईंचे प्यारे असे हे गावठाण, राजे येणार ह्या वर्दीने येथील खास वाडा चाकरांनी बयाजीने नेटका लावला होता. कुलेशांच्या आज्ञेप्रमाणे पूर्वीच येऊन पोहोचलेले शिवयोगी शिष्यगणांसह छत्रपतींना सामोरे आले. त्यांनी वाड्याच्या माजघरी दालनात रणचंडीची मूर्ती आणून पुर्वामिमुख ठेवली होती. तिच्यासमोर यज्ञकुंड सिद्ध केले होते. जागजागी व्याभ्रचर्म कारभारी, शिवयोगी, शिष्य, कुलेश यांच्यासह राजे वाड्यात प्रवेशले. सदरेवर अंथरलेल्या खास बैठकीवर विसावले. शिवयोग्यांनी त्यांना चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, देवरूख अशा भागातून खास बोलावून घेतलेल्या पंथाच्या निवडक तांत्रिकांचा परिचय करून दिला. सूर्य मेघांनी घेरला.

“हां-हू हम म्हणत राजे कुलेशांना, शिवयोग्यांना दाद देत होते. पण त्यांच्या मनी फिरत होता औरंग. मध्येच त्यात येसूबाई-धाराऊंच्या बाबतचे विचार मिसळत होते. धाराऊचे बोल तर काल ऐकल्यासारखे जसेन्तसे कानात घुमू लागले. “ल्हान हाईस. जाऊ द्ये मला होळाकडं. ज्या जागेला कूस उजावली त्या जागेला ध्याई ठेवण्यासारं सार्थिक न्हाई जल्माचं.”

वाड्याच्या कारभाऱ्यांनी शिवयोग्यांच्या सूचनेप्रमाणे उपासनेची सगळी तयारी करून ठेवली होती. पुऱ्या वाड्याला नंग्या तेगींच्या निवडक धारकऱ्यांचे कडे त्याने टाकले होते. शिवयोगी मुहूर्त काढतील, त्या ‘शुभयोगा’बर कठोर उपासनेला सुरुवात होणार मध्येच मलकापूरहून कुलेशांचा कारभारी त्यांना भेटायला गांगोलीला आला. त्याने मलकापूरच्या तुळाजी देसाईविरुद्ध दिवाणी बाकीबद्दल तक्रार आणली होती. देसायाला द्यायचे ताकीदपत्र सिद्ध करून कुलेशांनी कारभाऱ्याला वाटेस लावले.

“कमी पडलंय ते आशीर्वादाचं बळ,’ कसल्या रूपात ‘रणचंडी’ राजांना देणार म्हणून दूर टप्प्यावरून तुळजापूरची जगदंबा गांगोलीकडे डोळे लावून बसली होती!

क॒डक उनतापीचे दिवस सुरू झाले. गांगोलीच्या माळावर उपष्म्याच्या लहलहत्या झळा उसळू लागल्या. आंबा, वडाच्या घेरांखाली तान्हेली गुरेढोरे ल्हापत सावली जवळ करू लागली.

शिवयोग्यांनी काढलेल्या मुहूर्तावर वाड्यातल्या देवीसमोर पंथाचे “शक्ती’ला आवाहन करणारे अनुष्ठान बसले. ही उपासना कठोर तर होतीच, पण ती एकांती असल्याने वाडा बंदिस्त झाला होता. प्रलयंकर शिवाला शक्तीच्या रूपात या अनुष्ठानाने पाचारण करायचे होते. पंथाच्या तंत्राप्रमाणे शक्तीला बळी होते. मंत्रोच्चारात यज्ञातील अग्नीला हवी आणि समिधा अर्पण करायच्या होत्या.

राजांना आपण “राजे’ आहोत, हे परते ठेवून शक्तीचा “उपासक’ म्हणून तिला निकोप मनाने सादवायचे होते. ही उपासना धनदौलत, स्थावर, गडकोट, कब्जात आहे ते राखावे का वाढवावे, यासाठी नव्हती. होती निर्णायकी अवुडातील अंतिम विजयाच्या प्राप्तीसाठी – फत्तेसाठी. जे-जे नागसर्पासारखे सळसळते आहे ते- ते विधिपूर्वक देवीला अर्पण करायचे होते!

या उपासनेसाठी राजांनी अंगचा राजपेहराव उतरून तबकात ठेवला. अंगी भगवी वस्त्रे धारण केली. डुईचा टोप उतरून केसावळ मुक्त सोडली. दर्पषणात आपले ते रूप बघताना त्यांना त्रिमलांसोबत मथुरेहून निघताना अशीच भगवी छाटी घातलेले आपलेच बालरूप याद झाले. ‘केवढा काळ मागे हटला! त्या वेळी औरंगच्या आग्ऱ्याच्या कोठीतून सलामत मुलखात पोहोचण्यासाठी अशी भगवी छाटीच पांघरावी लागली होती आम्हास. आता तोच औरंग, तीच भगवी वस्त्रे!!’

राजे अनुष्ठानाला बसले. शिवयोग्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी सर्व विधी संपन्न केले. होय! तीर्थ म्हणून न दिले, ते मद्यही घेतले. रोज वेगवेगळे विधी वाड्यावर मंत्रोन्ञारात पार पाडले जात होते उपासनेचा काळ संपताच संध्याकाळी कुलेश, शिवयोग्यांसह राजे होडकक्‍्यात बसून शिवे जवळच्या डोहात पाणफेर घेत होते.

या कडक उपासनेमुळे राजे रोजानाच्या असामींपासून तुटल्यासारखे झाले होते. स्वत: कुलेश त्यांना वाड्यावर कुणालाही भेटू देत नव्हते. त्यात त्यांचा कोणताही हेतू नसताना भोवतीच्या कैकांना वाटले, राजे कुलेशांच्या आहारी गेले. त्यातच शिवयोग्याबरोबर आलेले शिष्य शृंगारपुरात परतल्यावर राजांच्या उपासनेबद्दल इथे-तिथे बोलत होते. धावत्या वाऱ्यावर स्वार होऊन ते गणोजी शिर्क्यांच्या कानावर येत होते.

दुर्वांच्या मुळ्यांसारख्याच भुमकाच भुमका जिकडे तिकडे पसरल्या – “कब्जी कलुशानं राजा मुठीत घ्येतला! …राजं लई पेत्यात! कुणाची गाठभ्येट पडू देत न्हाई त्येंची बामन!”

वळिवाच्या वावटळी उठून गेल्या. वळिवाचे एक-दोन पाऊस पडले. अशाच एका पावसानंतर मातीचा मत्त दरवळता गंध पसरला. गांगोलीच्या वाड्यात, सदरेलगत बांधलेल्या चोपाळ्यावर बसलेल्या राजांना तो जाणवला. शेजारीच सुरुदार खांबाजवळ उभ्या असलेल्या कुलेशांना त्यांनी विचारले, “कविराज, किती वळीव पडून गेले असतील या धरतीवर, तिच्या जन्मापासून! माती का तावते? वळीव का कोसळतो तिच्यावर? जीव उमलून टाकणारा गंध कसा सुटतो तिच्यातून? हे आभाळ आणि धरती याशिवाय कुणाला कसे सांगता येईल? ज्या शक्तीची आपण उपासना करतो आहोत ती पावेल? सुटेल कधी जीवनाच्या मातीला सुगंध?”

कवी होते तरी कुलेश ते राजबोल ऐकतच राहिले. काही जाब न सुचल्याने विषय पालटत म्हणाले, “हम सुनते है स्वामी, हमारे और आपके बारेमें कुछ शक सा पैदा हुआ है लोगोंमें। रिआया कहती है, आपको… हमने मुठ्ठीमें कब्ज किया है।”

चोपाळ्याचा घेतला झोल राजांनी गपकन थांबवला. डोळे रोखले गेले त्यांचे कुलेशांवर. तुटकसे राजांनी झटकन कुलेशांना विचारले, “खुद्द तुम्हास काय वाटतं? आहे तुमची मूठ एवढी समर्थ?”

“क्या बोलते है, आप स्वामी?”

“तुम्हा-आम्हाबद्दल असे म्हणणाऱ्यांची कीव वाटते. एवढ्या थोर मुठीचे आबासाहेब पण – मनाच्या उमाळीसरसे तीही फोडून गेलो आम्ही एका काळ्या क्षणी. एवढा पुरंदर मुठीत पकडणारा दिलेर! पण त्यालाही नाही ठेवता आले मुठीत आम्हाला! यांचा वकूब तुमच्यात आहे, असे म्हणणाऱ्यांना हसावं की रडावं? कुलेश, समुद्रमंथनातून आलेले विष ओठांआड करणारा शंकर जगाला “नीलकंठ’ म्हणून कधी दिसलाच नाही. त्याच्याही जिंदगीत एक ‘पार्वती’ असते, हे पटत नाही चटकन लोकांस.”

येसूबाईंच्या आठवणीने महाराज चोपाळ्याचा थांबलेला झोल पुन्हा घेऊ लागले.

मृगाने धार धरली. एरवी कुठेही असले तरी पाऊसकाळ तोंडावर आला की, राजे रायगड जवळ करीत असत. या वर्षी ते अजून घडले नाही. साहजिकच रायगडावर येसूबाई, निळोपंत, येसाजी कंक, खंडोजी चिंतेने राजांची वाट बघू लागले. गांगोलीत सदरेवर याद घेतल्या कुलेशांनी जोखीम आणि कर्तव्य म्हणून राजांच्या कानी घातले, “बारिश शुरू हुई है। रायगढ लौटना चाहिये। स्वामी, सब लोग राह देखते

“कविराज, माणसं नसली तरी हा पाऊसकाळ पाठीशी उभा राहील आमच्या. खिळवून ठेवील तो औरंगच्या फौजा जागच्या जागी. तुम्ही उपासनेसाठी याहून सबल दुसरे ठिकाण शोधा.” खरे सांगायचे तर राजांना रायगडी परतावेसेच वाटत नव्हते. घडी- घडी वाटत होते त्यांना की, असे तो फौजफाटा एकजाग करून थेट औरंगच्या छावणीवर चालून जावे.

राजांचा विचार ऐकून कुलेशच चक्रावले. कुठून आपण कठोर उपासनेचे व्रत बोलून गेलो असे त्यांना झाले. पण कशालाच काही इलाज नव्हता. राजांची इच्छा म्हणजे ती राजाज्ञाच होती. कुलेशांनी आपल्या दिमतीची निवडक माणसे संगमेश्वराला पाठवली. त्यांनी संगमेश्वराच्या देसायांचा वाडा योग्य असल्याची खबर आणली.

राजाज्ञेने कुलेश आणि शिवयोगी यांनी संगमेश्वराला जाऊन तिथेही पंथाच्या आणखी एका ठिकाणाची स्थापना केली. आता राजांचे मुक्काम भर पावसात गांगोली आणि संगमेश्वर असे पडू लागले. शृंगारपूर ब शिर्काण भागात १ तर आवईच उठवली की, “कलुशा औरंगजेबाचा हस्तक आहे! राजांच्या जवळ राहून तो बादशहाच्यावतीनं फितुरी करतो आहे!”

स्वत: कुलेश आता पेचात सापडल्यागत झाले होते. राजे आपणच एकले होत चालले होते. पंथाचे सर्व विधी ते काटेकोर करत होते. तीर्थ म्हणून मद्य घेत होते. त्या सुन्न करणाऱ्या काळात त्यांना पाहिजे ते एकलेपण गवसत होते. अनेक क्षणचित्रे त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोरून सरकत जात होती. कुणालाच काय; पण कुलेशांनाही ते आपल्या समोर फार वेळ थांबू देत नव्हते. बाहेर पावसाने जागोजागच्या नद्या तुडुंब भरून बाहत होत्या. आडवळणी असलेल्या गांगोली-संगमेश्वराचा रायगडाशी जसा संबंधच तुटला होता. गडावर महाराणी व पेशवे यांच्या आज्ञेवर, कौलावर दफ्तराचे, निवाड्याचे काम चालले होते.

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग २०३.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here