महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,34,714

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२८

By Discover Maharashtra Views: 1309 9 Min Read

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२८ –

संभाजीराजांनी पुढे होत राणूअक्कांचे पाय शिवले. त्यांना काहीच दाद न देता अक्कांनी तोंड फिरविले. त्यांनी ओठभर लपेटून घेतलेल्या पदराआडून थरकते शब्द उमटले, “गड जिंकून आलात. तुमची आरती कशी उतरावी उमगत नाही आम्हास!”

संभाजीराजे सुन्न झाले. स्वत:च्या शरमेने त्यांची भरदार चर्या काळवंडली. गर्दन झुकली. “अक्कासाहेब, आमचं ऐकावं….”

“काय ऐकाबंश तुम्ही दौलतीचा गड पाडलात हे ऐकून आबांना काय वाटेल? यासाठी ही वाट धरलीत? माहुलीवर आम्हाला पेचात टाकलंत. भूपाळगडावर फिरंगोजींना पेचात घातलंत! शुंगारपुरात येसूबाईंना हे ऐकून काय वाटत असेल? रायगडी आबासाहेबांची काय गत झाली असेल? आम्ही तुमच्यावर जीव लावला. त्याचा मतलब तुम्ही मनमाने वागण्यास मुखत्यार व्हावं असा नाही! बाळमहाराज, आम्हाला हे मानवणार नाही!”

“चुकलं आमचं.” संभाजीराजांना दालनात उभे राहवेना. ते बाहेर पडले.

आभाळ दाटून आले. पावसाने झड धरली. तबिबांनी जख्मी, बीमार घोडे उपचारासाठी ताब्यात घेतले. पावसाचा माग धरून मराठी फौजांनी आदिलशाही मुलखातून हटत आपल्या सीमांवर तळ टाकले. पडत्या पावसात दिलेरच्या मनी एक बडा मनसुबा घर करू लागला. तशात औरंगाबादेहन शहाआलमचा त्याला फर्मानी खलिता आला. दिलेरने खलबतासाठी साथीदारांची बैठक बोलावली. सर्जाखान, संभाजीराजे, इखलासखान, खैरतखान, इरजखान यांची बहादूरगडाच्या सदरी महालात बैठक बसली.

“औरंगाबादसे शाहजादेका संदेसा आया है।” दिलेरने खलबताला तोंड फोडले.

“किले पन्हालेपर चाल रखनेका हुक्‍्म है, इस बारीशमें!” बैठकीचा अंदाज घेत खान थांबला. सर्जाखान आणि संभाजीराजे यांनी एकमेकांना नजर दिली.

“ये निरा पागलपन है सालार. मरहट्टोंने अपनी रसदें बंद कर दी हे।” सर्जाखान स्पष्ट बोलला. त्याला सिद्दी मसुद या विजापुरी वजिराचा हिसाब पावता करण्यासाठी विजापूरची मोहीम पाहिजे होती.

संभाजीराजांनी सर्जाखानाची मसलत आपल्या मतलबाने उचलून धरली. “यापुढे मराठी मुलखावर चाल घेणे आम्हास जमणार नाही. पाहिजे तर हत्यार आणि मनसबीची वस्त्रे उतरून ठेवण्यास आम्ही तयार आहोत.”

“लेकिन ये शाही हुक्‍्म है। उसे बगलमें कैसे रख सकते हे?” दिलेर दोन- दोन शक्तींना टाळू शकत नव्हता. जमून आलेला किस्मतीचा शतरंज उधळू शकत नव्हता. “सालार, औरंगाबादको थैला भेज दो। लिख दो विजापूर कमजोर हे। चाल उसपर जारी रखना मतलब की बात है। शाहजादेका जवाब आनेसे पहलेही हम निकलेंगे। ” सर्जाखानाने आपला हेत उघड केला.

सावध दिलेरने पारखले की ताणावर पडली, तर ही बैठक आता तुटणार. त्याने विजापूर स्वारीचा निर्णय घेतला. बैठकीला निरोपाचे विडे देण्यात आले. पावसाचा गुमान न धरता संभाजीराजे, दिलेर, सर्जाखान यांच्या फौजा जिने कसून तयार झाल्या. निरोप घ्यावा म्हणून संभाजीराजे राणूअक्कांच्या भेटीस आले. पण अक्कांनी आता मागे न राहण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्धाराने संभाजीराजांना म्हणाल्या, “आम्ही आता स्वारीशिकारी असली तरी तुमच्यासोबतच राहण्याचं ठाणलं आहे. भावनेपोटी तुम्ही काहीतरी करून बसता. नंतर ते निपटणं नाही साधत. आम्ही तुमच्यासंगती येणार.”

“जशी आज्ञा.” संभाजीराजांना बोलायला वावच उरला नव्हता. घोलगडाजवळ नौकांतून भिवरा नदी पार करून सैन्याने धूळखेडला तळ टाकला. दिवस श्रावणाचे असल्याने उन्ह-पावसाची सफेद-काळी पाठशिवणी रंगाला पडली.

“पंडित, तुम्ही एवढी धीराची म्हणणारी माणसं हातपाय गळून स्वस्थ आहात मग आम्ही काय करावं? जे कानी पडतं ते सोसवेना म्हणून तुम्हाला याद फर्मावलं आहे. आमची तर पापणीला पापणी भिडेना.” येसूबाईंच्या मनाची कोंडी शब्दलोटाने उमळून येत होती. शृंगारपूरच्या पिलाजींच्या वाड्यातील जनानीदालनात कवी कुलेश, केशव पडित, उमाजी पंडित, परशराम, रायाजी, अंतोजी सारे गर्दना पाडून युवराज्ञीसमोर खडे ब ढ येसूबाईंचे शब्द ठिणग्या होऊन साऱ्यांच्या कानांवर कोसळले. एवढे थोर तत्त्वज्ञ, पण सारे आतून पिळवटून निघाले. “आमी जिवाची आण लावू, पर धन्यास्री घेतल्याबगार न्हाई परतणार इथं.” अंतोजीने येसूबाईंना धीर दिला.

“कसं साधणार ते अंतोजी?”

“काय वाट्टुंल त्ये हुंद्या. आम्ही खानाच्या गोटात घुसनार.” रायाजीने निर्धार सांगितला.

“आणि तुम्हीही आम्हाला पारखे होणार!” येसूबाई उसासल्या.

“युवराज्ञी, महाराजांनी हरप्रकारचे यत्न केलेत युवराजांचा समज पाडण्यासाठी. यश येत नाही. आम्ही खलिता सिद्ध करतो आहोत. आपण स्वदस्तुराची मोहर त्यावर करावी. झाला पालट तर भावेश्वरीची कृपा!” परशरामपंतांनी मसलत दिली.

“नाही झाला तर आम्हाला पालटावं लागेल. जनावरावर मांड घेऊन स्वारीला शोधण्यासाठी आम्हाला निघावं लागेल! साफ लिहा हे.” मनच्या कढाने हात उठवीत येसूबाई म्हणाल्या आणि त्यांनी साऱ्यांना निरोप दिला. एक-एक पाऊल हलले. दालन रिकामे झाले. क्षणभर येसूबाईना आपण पुरत्या निराधार, रित्या झालो आहोत, पोरक्या आहोत असेच वाटले.

रायगडावर आघाडी मनोऱ्यालगत असलेल्या दगडबंद खलबतखान्यात छत्रपतींची मसलतही अशीच कुचमली होती. चिंताक्रांत चर्येचे महाराज गिर्दीला रेलून बैठकीवर बसले होते. भोवती हंबीरराव, मोरोपंत, अण्णाजी, आनंदराव, प्रल्हादपंत अशी मंडळी होती. छत्रपतींचा चेहरा ओढल्यागत सुमार दिसत होता. कानशिलावरच्या कल्लेदार जुल्फात पांढऱ्या केसांच्या चुकार तारा डोकावत होत्या.

“दिलेर विजापूरच्या रोखानं कूच झालाय हंबीरराव. विजापूर तेवढं गिळून मारावं, असं त्यांच्या मनी फार जुनं आहे. त्यास खीळ घालणे आहे.” महाराज थांबले. त्यांना वाटले की – पूर्वी त्याला आमचा घात करायचा होता. ते साधलं नाही. आमच्या युवराजांना दास्तानी लावून मात्र त्यानं तो साधला आहे.’ पण हे बोलणे त्यांनी निकराने मनातच मुरविले.

“जी. त्येचा झेंडू एकडाव फुटाय पायजेच. धाकल्यार्ती पंखाखाली घेऊनच त्यो दौडतोय.’ हंबीररावांनी आडवाटेने संभाजीराजांची चिंता प्रकट केली.

“त्यात त्याची काय चूक आहे सरलष्कर? आम्ही त्याच्या जागी असतो, तर हेच केलं असतं. खोललं कवाड बघून कुडाण्यात घुसला नाही, तर तो राजकारणी कसला?”

“पर हे कवाड कुठंतरी वढून घ्याय पायजे.” हंबीररावांनी चिकाटी सोडली नाही. “त्याची काही तड लागणार नाही, हंबीरराव. आम्ही हरकोशिस राबविली आहे युवराजांसाठी. यश येत नाही. आमच्या समजावणीनं युवराजांचे डोळे उघडणार नाहीत. उघडले तर ते खानाकडून खाल्लेल्या ठोकरीनंच उघडतील. आम्हाला युवराजांचं भय वाटत नाही. वाटते आहे ती चिंता निराळीच!”

“आम्ही न्हाई समाजलो.”

“हुंबीरराव, युवराज दिलेरच्या पंजाखाली आहेत, तोपर्यंत ते सुखरूप आहेत. कुठल्याही मिषानं औरंगजेबानं त्यांना बोलावलं, तर मात्र त्यांची खैर नाही! आमच्या नेताजींचं काय झालं? खुद्द आमचं काय होणार होतं?” छत्रपती पुरते अस्वस्थ झाले.

राणूबाई यांच्या आठवणीने नाकगड्डा चिमटीत पकडीत त्यांनी डोळे मिटते घेतले. त्या मिटत्या डोळ्यांसमोर क्षणातच वृद्ध जिजाऊ उभ्या ठाकल्या. त्यांच्या थरथरत्या ओठांतून बोल उमटले, “भोसल्यांच्या कबिल्याला पदरी निखारे घेऊनच मळवट भरावा लागतो!”

एक सावळे पान फडफडत आले. त्याची फडफड उठली –

“तपकला जीव पदरी घातला. आता स्वारीच यांचे आबा आणि आऊ!” मान डुलबीत छत्रपतींनी डोळे उघडले. मनची घालमेल बगलेला सारीत ते निश्चयाने बोलले,

“मोरोपंत, तुम्ही फौजबंदीनं विजापूरच्या रोखानं कूच व्हा! बारा हजार स्वार दिमतीला घ्या. तुम्ही बरंदाघाटाची मोगलाई टापांखाली जरबेत ठेवा. प्रल्हादपंत सिद्दी मसूदला लिहा – इदलशाही राखणं, ते आमचं कर्तव्यच आहे.” समोरच्या तबकातील विडे छत्रपतींनी साऱ्या मानकऱ्यांना दिले. खलबत उठले. हंबीररावांनी पुढे होत तलवारीच्या मुठीचा ठोका आतून दारावरच्या धोंडेला दिला. धोंड हटली. मानकरी बाहेर पडले. न राहवून मागे रेंगाळलेले हंबीरराव महाराजांना कळवळून म्हणाले,

“महाराज, एक बोलावं वाटतं.”

“बोला.”

“धन्याची तब्येत सुमार दिसत्येय. गडावर आराम करावा. आम्ही हाव दिलेरचा देठ मोडाय.”

“आराम! हंबीरराव, आता आम्हाला आराम एकदाच मिळणार! अखेरचा.” तापल्या शिसाच्या रसासारखे बोल हंबीररावांच्या कानी पडले.

खलबतातून बाहेर पडलेल्या अण्णाजींची पावले सातमहालाकडे वळली. महाराणी सोयराबाईंच्या समोर पेश होत त्यांनी तपशील दिला, “स्वामी युवराजांच्यासाठी जातीनं आदिलशाहीत उतरताहेत!”

ते ऐकून सोयराबाई कडवटपणे बोलून गेल्या – “अजून स्वारींचा मायेचा कढ उतू जातोय म्हणायचा तर! ते मुसलमान झाले, तरी गडावर आणून त्यांचंही शुद्धीकरण पालकरांच्यासारखं करायला कमी व्हायचं नाही!”

संभाजीराजांचा तळ दिलेरसह धूळखेडहून हलला. आदिलशाहीचे मंगळवेढे मारून विजापूरकडे सरकू लागला. हलसंगी या गावी येऊन ठाण झाला. याच वेळी मोरोपंतांच्या निसबतीने बारा हुजार मावळा आदिलशाहीत उतरला. विजापूरची ‘कुमक’ करण्यासाठी मराठ्यांनी फळी धरली. पाठोपाठ खुद्द शिवाजीराजे हंबीरराव आणि आनंदराव यांना साथीला घेऊन सोळा हजारांच्या दिमतीने आदिलशाहीत उतरले.

धास्त खाऊन सिद्दी मसूदने दिलेरशी लावलेली बोलणी फिसकटली. विजापूर गिळण्यासाठी पेटलेले लेर आणि सर्जाखान हलसंगीहून निघून बहमनहळ्ळीला ठाण झाले. मागे राहिलेल्या संभाजीराजांवर दिलेरने रसद पोचविण्याची जोखीम टाकली होती.

मजलांनी घोडे फेकीत छत्रपती महाराज थेट विजापुराजवळ शिवापूर या गावी पोहोचले होते. आपले वकील मसूदकडे धाडून, “सैन्यासह आपणाला विजापूरच्या किल्ल्यांत घ्यावे’, असा निरोप छत्रपतींनी मसूदला दिला. मसूदच्या सल्लागारांनी त्याला सावध केले – “पठाण बाजू रहेगा। मरहठ्रेही किला कब्ज कर वैठेंगे!” मसूदने शिवाखराजांना परतीचा निरोप दिला – “आप चार पाँचसौ हशम लेकर विजापूर आ सकते है!”

क्रमशःधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्रगाथा भाग १२८.

संदर्भ – छावा कांदबरी – शिवाजी सावंत.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment