रयतेचा राजा शिवाजी महाराज

मराठी भाषेचा इतिहास आणि जैन धर्म

रयतेचा राजा शिवाजी महाराज –

सदर पत्र रयतेचा राजा शिवाजी महराजांनी रोहीडखोऱ्यातील सर्जेराव जेधे देशमुख यांना लिहिले असून स्वराज्यातील मोगली आक्रमणावेळी रयतेच्या सुरक्षिततेविषयी असणारी काळजी सदर पत्राद्वारे दिसून येते. त्यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यास त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणारे हे पत्र

शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला त्याने स्वराज्यातील मुलुख मोगल अमलाखाली आणण्यास सुरवात केली . चाकणचा किल्ला हस्तगत करून पुण्यात मुक्कामास आला. मोगलीसैन्य स्वराज्यात स्वाऱ्या करून जनतेवर जुलूम करू लागले. गुप्तहेरानी शत्रूच्या गोठ्यातून खात्रीशीर बातमी आणली. सदर बातमीनुसार सुरक्षिततेचा उपाय म्हणून सदर पत्र लिहिले गेले. याप्रसंगी स्वराज्यातील रयतेस सुरक्षित जागी हलवावे व त्यांची काळजी घ्यावी. गनीम त्यांच्यापर्यंत पोहचणार नाही याची काळजी घेऊन त्यांना सुरक्षित स्थळी घाटाखाली पाठवून स्वतः सावधगिरीने राहावे. याकामी हयगय न करणे. एका क्षणाचीहि दिरंगाई न करणे.

रात्रीचा दिवस करून गावा गावात हिंडून रयतेस सुरक्षित ठिकाणी पाठविणे. सूचनेप्रमाणे न वागल्यास रयतेस मुगलांच्या कैदेत जावे लागलयास त्याचे पातक तुमच्या माथी असेल. गावात शेत व घरांच्या रक्षणासाठी जे लोक राहतील त्यास ताकीद देणे कि गनीम दिसताच सुरक्षितत स्थळी पळून जाणे.

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी) लेखांक २७६

१५८४ कार्तिक वद्य ७

मा। अनाम सर्जाराऊ जेधे देसमुख ता। रोहिडखोरे राजश्री सीवाजि राजे सु॥ सलास सिर्तन अलफ मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती ह्मणौन जासुदानी समाचार आणिला आहे तरी तुह्मास रोखा अहडता च तुह्मी तमाम आपले तपियात गावाचा गाव ताकिदी करून माणसे लेकरेबाळे समत तमाम रयेति लोकास घाटाखाले बाकाजागा असेल तेथे पाठवणे जेथे गनिमाचा आजार पहुचेना ऐशा जागीयासि त्यासि पाठवणे ये कामास हैगै न करणे रोखा अहडता च सदरहू लिहिलेप्रमाणे अमल करणे ऐसियासि तुह्मापासून अतर पडिलियावरि मोगल जे बाद धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बैसेल ऐसे समजोन गावाचा गाव हिंडोनु रातीचा दिवस करून लोकाची माणसे घाटाखाले जागा असेल तेथे पाठवणे या कामास एक घडिचा दिरग न करणे तुह्मी आपले जागा हुशार असणे गावगना हि सडेकडिल सेतपोत जतन करावया जे असतील त्यास हि तुह्मी सागणे की डोगरवर असिरा कुबल जागा आसरे ऐस त्यासि सागणे व गनीम दुरून नजरेस पडता च त्याचे धावणीची वाट चुकउनु पलोन जाणे तुह्मी आपले जागा हुशार असणे मोर्तब सूद

रुजु सुरनिवीस
सुरु सूद
तेरीख २० माहे रबिलोवल
रबिलावल

Nagesh Sawant

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here