महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,71,582

रामेश्वर मंदिर गुंडेगाव, ता. नगर

By Discover Maharashtra Views: 1355 3 Min Read

रामेश्वर मंदिर गुंडेगाव, ता. नगर –

अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहरापासून ३० किमी अंतरावर असणारे गुंडेगाव हे एक ऐतिहासिक गाव. गुंड ऋषींची तपोभूमी असल्याने गावाला गुंडेगाव नाव पडल्याची आख्यायिका गावकरी सांगतात. गावात गेल्या गेल्या उजव्या बाजूला पुरातन असे मरगळ नाथ महादेवाचे मंदिर आपल्या नजरेस पडते.(रामेश्वर मंदिर गुंडेगाव)

मरगळ नाथ मंदिरा पासून काही अंतरावर असणाऱ्या गावाच्या वेशी जवळ दुर्मिळ अशी गद्धेगळ, वीरगळ, स्मृतीशिळा, अनेक शिल्पं व भग्नावस्थेतील मुर्त्या विखुरलेल्या आपल्याला दिसून येतात. वेशीच्या आत मध्ये गेल्यावर रामेश्वराचे जीर्णोद्धार केलेले पुरातन मंदिर आहे.

मंदिर पूर्वाभिमुख असून नंदीमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आपल्याला दिसून येते. श्री रामाने स्थापित केलेले शिवलिंग येथे पूर्वी होते परंतु यवनांच्या आक्रमणात ते भंग करण्यात आले असे गावातील लोक सांगतात. आता स्थापित केलेले शिवलिंग नवीन आहे, या मंदिराच्या परिसरात असंख्य वीरगळी आणि देव देवतांची शिल्पे विखुरलेली आहेत. गावात अनेको ऐतिहासिक आणि पौराणिक खाणाखुणा जागोजागी दिसतात, ज्या जतन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Rohan Gadekar

गुंड ऋषींची तपोभूमी असल्याने गावाला गुंडेगाव असे नाव पडले, गावात अनेको ऐतिहासिक आणि पौराणिक खाणाखुणा जागोजागी दिसतात, ज्या जतन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावात गेल्या गेल्या मरगळ नाथाचे महादेवाचे मंदिर नजरेस पडते, मंदिर हेमाडपंती शैलीची असून त्यावर रंगरंगोटी केल्यामुळे त्याचे मूळ पण नष्ट झाले आहे.

गावाच्या वेशी समोर हनुमानाचे देऊळ आहे तिथे हनुमंताच्या 2 मूर्ती दिसतात, वेशीच्या खाली विष्णूच्या भग्नावस्थेतील मुर्त्या दिसून येतात. वेशीच्या अलीकडे श्रीरामाचे कर्नाटकी पद्धतीचे मूर्ती असलेले मंदिर आहे या मंदिरातील मूर्ती दक्षिण भारतात आढळणाऱ्या मुर्तीप्रमाणे आहे याच मंदिरासमोर अनेक शिवलिंग आणि शिल्पे विखुरलेले दिसतात.

वेशीच्या आत मध्ये गेल्यावर रामेश्वराचे जीर्णोद्धार केलेले पुरातन हेमाडपंती शैली मधील मंदिर आहे, रामाने स्थापित केलेले शिवलिंग येथे पूर्वी होते परंतु यवनांच्या आक्रमणात ते भंग करण्यात आले आता स्थापित केलेले शिवलिंग नवीन आहे, या मंदिराच्या परिसरात असंख्य वीरगळी आणि देव देवतांची शिल्पे विखुरलेली आहेत.

गावात जाताना भैरवनाथाचे एक मंदिर आहे या मंदिरासमोर पंचलिंग असणारी दुर्मीळ शिवलिंग दिसून येते. गावातून पुढे बाहेर पडताना काशी तीर्थ तसेच गावातून वाहणारी शुढळा नामक नदीचे उगमस्थान आहे.

पुढे गावाला लागून असणारी वन देव डोंगररांग चालू होते, याला काही लोक पंच टेकडी देखील म्हणतात, याच रांगेतील एका टेकडीवर राजधानीच्या खंडोबाचे निवासस्थान आणि गोसावी बाबा यांची समाधी आहे.

खंडोबाचे किर्तीमुख असलेले यादवकालीन मंदिर असून गेल्या काही वर्षात त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे, जीर्णोद्धार होत असताना मंदिराचे मूळ पण घालवले आहे, मंदिराच्या समोरच पेशव्यांच्या काळातले एक छोटेसे हनुमानाचे मंदिर आहे, ज्या दगडाने ते बांधले आहे तो दगड या परिसरात कुठेच सापडत नाही, बहुदा हनुमानाचे मंदिर देखील वाटत नाही तेथे कोण्या सिद्ध पुरुषाची समाधी असल्याचा आभास होतो, टेकडीवरील एका मंदिराच्या भिंतीवर देवानगरी भाषेत शिलालेख कोरलेला आहे.

टेकडीवर जाताना मध्ये जमिनीच्या खाली तीन खड्डे आहेत त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, तसेच वाघजाई  मंदिर आणि लंगर ए शाहवाली दर्गा आहे.

Ganesh s Nagarkar 

Leave a Comment