रामदरा शिवालय, लोणी काळभोर

रामदरा शिवालय, लोणी काळभोर

रामदरा शिवालय, लोणी काळभोर –

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावाच्या दक्षिणेला श्रीक्षेत्र रामदरा शिवालय हे दवस्थान आहे. सुमारे पन्नास वर्षा पूर्वी आयोध्येतील बाबा श्री१००८ देवपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा यांना या ठिकाणी रामाचे जागृत स्थान असल्याचा  साक्षात्कार झाला. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना शिवलिंग आढळले.

सुरवातीला हे स्थान जंगलात व डोंगराच्या जवळ असल्याने या भागात कुणी जायचे नाही. धुंदीबाबांच्या वास्तव्याने यथे भाविकांचे येणेजाणे चालू झाले. धुंदीबाबा यांनी भाविकांच्या मदतीने व देणगीतून घडीव दगडांचे मंदिर बांधले. या मंदिरात शिवलिंग व श्रीरामाची स्थापना केली. ट्रस्टची स्थापना करून देवस्थानच्या नावावर ३५ एकर शेती घेउन येथे शेतीच उत्पन्न  घेउन भाविकांच्या नित्य प्रसाद‍ाची सोय केली आहे.

नंदीमंडप , २४ खांबांच सभामंडप व गाभारा अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात आनेक शिल्पचित्र , यज्ञकुंड व धुंदीबाबांची संगमरवरी मुर्ती आहे. गाभा-यात शिवलिंग , राम लक्ष्मण व सिता यांच्या मुर्ती आहेत व दत्त महाराजांची स्थापना केली आहे.

मंदिराभवती सुंदर तळ असल्याने  परिसर विलोभनीय झाला आहे.

एकंदर हा परिसर एवढा सुंदर व शांत आहे की तुमच्या मनाला अध्यात्मिक शांती मिळते. थेउरच्या गणपतीला जाताना किवा येताना  रामदरा या ठिकाणाला भेट देता येते.

संतोष मु चंदने.  चिंचवड ,पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here