महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 94,39,256

गोंदियाचा प्रतापगड | Pratapgad, Gondia

Views: 1
3 Min Read

गोंदियाचा प्रतापगड | Pratapgad, Gondia –

विदर्भामध्ये काही उल्लेखनीय किल्ले आहेत यातील काही डोंगरी किल्ले असून आजही परिसरातील जंगलांमुळे कसेबसे तग धरून आहेत. विदर्भातील प्रतापगड हा सुद्धा एक वनदुर्ग आहे. गोंदियाचा प्रतापगड | Pratapgad, Gondia.

● भौगोलिक स्थान :
विदर्भामध्ये गोंदिया जिल्ह्यात दक्षिण भागात अर्जुनी मोरगाव हा तालुका आहे. गोंदिया रेल्वे मार्गानी जोडलेले आहे. गोंदिया-सडक अर्जुनी-अर्जुनी मोरगाव असा गाडी रस्ता आहे. हा गाडी रस्ता नवेगाव बांध या गावाजवळून जातो. नवेगाव बांध अभयारण्य प्रसिद्धच ओह. नवेगाव बांधपासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गोठणगावाकडे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. अर्जुनी मोरगाव कडूनही १६ कि.मी. अंतरावर गोठणगाव आहे. गोठणगाव तिबेटी लोकाच्या वसाहतीमुळे या भागात प्रसिद्ध आहे.

● जाण्यासाठी मार्ग :
नवेगाव बांधच्या अभयारण्यामधून एक डोंगररांग दक्षिणेकडे गेलेली आहे. ही रांग प्रतापगड किल्ल्याला जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग हा पूर्वेकडून आहे. पूर्व पायथ्यापर्यंत गाडीमार्गाने पोहोचता येते. प्रतापगडाच्या पूर्व पायथ्याच्या पठारावर दर्गा आहे.दर्ग्याजवळूनच गडावर जाण्याचा मार्ग आहे. दर्ग्याजवळच किल्ल्याच्या बांधकामाचे अवशेष पहायला मिळतात. येथील मार्ग हा दोन्हीकडून तटबंदीने बंदिस्त केलेला दिसतो. ही तटबंदी रचीव दगडांची आहे. या मार्गावर सर्वत्र पडापड झालेली आहे. त्यामुळे गडावर जाण्यासाठी या मार्गाच्या उजवीकडून दगडधोंड्यामधून एक नवी वाट तयार झाली आहे.

● घडण व पहाण्यासारखी ठिकाणे :
किल्याची चढाई पायथ्यापासून २०० मीटर आहे. या जंगलात किलोमिटरभर चालत कड्याच्या पायर्थ्याला येता येते. या कड्यावर मधमाश्यांची असंख्य पोळी लटकलेली दिसतात. या कड्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर उजवीकडे चढाई सुरु करावी. जुना मार्ग दगड धोंडे पडून नष्ट झालेला आहे. डावीकडे कडे ठेवीत आपण १५ मिनिटांत तटबंदीमध्ये प्रवेश करतो. हा एका माचीचाच भाग असून तो रचिव तटबंदीने सरंक्षीत केलेलो आहे. गड आणि परीसरामध्ये घनदाट जंगल आहे. या भागात अस्वले खूप आहेत. अस्वल हा जंगलातील अतिशय धोकादायक प्राणी आहे. या माचीपासून थोडे वर आल्यावर उजवीकडील बुरुजावर एक कबर आहे. तेथे झेंडे लावलेले दिसतात. डाव्या बाजूला तटबंदी आहे. येथून एक वाट बालेकिल्ल्यामागील भल्या मोठ्या माचीकडे जाते. या माचीवर घनदाट जंगल आहे. ही गडाची पश्चिम बाजू असून ती तटबंदीने पूर्णत: वेढलेली आहे. या जंगलात पाण्याचा तलावाचे अनेक अवशेष दिसतात.

या कबरीपासून डावीकडील तटबंदीकडे पायऱ्या गेलेल्या आहेत. बुरुजाच्या बाजूने पडक्या तटबंदीमधून गडप्रवेश करावा लागतो. डावीकडील वाटेने मोठ्या तलावाजवळून गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे जाता येत.माथ्यावर काही चौथरे पडलेले असून ते एका तटबंदीने वढलेले आहेत. पश्चिम कड्यावरुन दूरपर्यंतचा परिसर पहाता येतो. इटियाडोह प्रकल्पही येथून दिसतो. पश्चिमेकडील माचीचे उत्तम दर्शन येथून होते. कड्याच्या कडेकडेने उत्तर बाजूच्या कड्यावर येता येते.

येथे अनेक नैसर्गिक गुहा असून वन्य श्वापदांचा वावरही आढळतो. येथे खाली तळघर आहे. येथून एक वाट खालच्या पश्चिम माचीवर जाते. गडाची नैसर्गिक अभेद्यता येथून दृष्टीस पडते. देवगडाच्या गौंड राजांच्या अखत्यारीतील हा दुर्गम किल्ला आज तरी बेसाऊ झालेला आहे.

(Photo – Sachin Meshram)

Vidarbha Darshan Facebook Page

Leave a Comment