महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,75,534

कचरगड गुफा, दारेकसा, गोंदिया

By Discover Maharashtra Views: 2611 2 Min Read

कचरगड गुफा, दारेकसा, गोंदिया –

कचरगड गुफा ही आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक आणि अपरीचित गुफा आहे. ही गुहा गोंदियाहून ५५ किलोमीटर आत वसलेली आहे. जवळपास २५,००० वर्षापूर्वीची ही अतिप्राचीन गुफा नैसर्गिक आहे. ही गुफा आशियातील सर्वात मोठी नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा महाराष्ट्र आणि छत्तिसगड सीमेवर असून हा भाग नक्षलग्रस्त भाग ओळखला जातो म्हणून भितीपोटी येथे सहसा पर्यटक येत नाहीत, त्यामुळे ही गुफा अपरीचितच राहीली.

ही गुफा जमिनीपासून ५१८ मीटर उंचीवर स्थित असून गुफेची उंची ९४ फुट आहे. गुफेच्या सुरवातीला १० फुट उंच, १२ फुट रुंद आणि २० फुट लांबीची छोटी गुफा आहे. तिच्या उजव्या बाजूला नजरेत पडते एक महाकाय गुफा. जिचे प्रवेशद्वार जवळपास ४० फुट उंचीचे आहे. बाहेरून या गुफेचा अंदाज लागत नाही. आत गेल्यावर या गुफेचा विस्तार कळतो. आतून ही गुफा २५ फुट उंच, ६० फुट रुंद आणि १०० फुट लांबीची आहे. गुफेच्या एका ठीकाणी वरच्या बाजूला मोठे छिद्र आहे. ज्यातून सतत सुर्यप्रकाश आत येत असतो. आत निर्मळ पाण्याचे झरे आणि पावसाळ्यात छोटे धबधबे सुद्धा बघायला मिळतात. पारीकोपर लिंगो यांनी येथे गोंड धर्माची स्थापना केली होती.

पुराणवास्तूशास्त्रज्ञांना येथे प्राचीन काळी मानवाकडून वापरली जाणारी दगडी हत्यारे सापडली आहेत. या विभागातील आदिवासी गौंड जमातीचे हे पूजास्थान आहे आणि येथील घनदाट जंगलामुळे गिर्यारोहकांसाठी जणू स्वर्गच आहे.घनदाट जंगलामुळे गिर्यारोहकांसाठी जणू स्वर्गच आहे.

Vidarbha Darshan

Leave a comment