महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,34,492

पहीने धबधबा

By Discover Maharashtra Views: 3671 1 Min Read

पहीने धबधबा…

नागमोडी वळणे घेत जाणारा घाटातील रस्ता, सर्वत्र पसरलेलं दाट धुकं, रिमझिम बरसणारा पाऊस, आल्हाददायक मनमोहून टाकणारी हिरवळ आणि कोसळणारे धबधबे.

वर्षां ऋतूमध्ये बाहेर पडावं, भन्नाट वारा अनुभवावा, पावसात चिंब भिजावं आणि आंतरबाह्य़ ओलंचिंब होऊन जावं यासारखं दुसरं सुख नाही.

सह्य़ाद्री ही महाराष्ट्राला मिळालेली एक अभूतपूर्व अशी देणगीच आहे. कुठल्याही ऋतूमध्ये मनाला भावणारा सह्य़ाद्री ऐन पावसाळ्यात तर फारच रांगडा, सुंदर आणि मोहक भासतो. सर्वत्र हिरवागार रंग आणि त्यामध्ये फुललेली असंख्य रानफुले, डोक्यावर पावसाळी ढग, आजूबाजूला डोंगरावरून कोसळणारे धबधबे आणि खाचरांमध्ये बळीराजाने केलेली पेरणी असे सर्वत्र आल्हाददायी वातावरण असते.

सुदैवाने सह्य़ाद्रीचा सहवास आपल्याला लाभलेला असल्यामुळे अनेक सुंदर, आगळीवेगळी अशी भटकण्यासाठी मुबलक ठिकाणं आहेत. असेच एक ठिकाण म्हणजे पहीने गावं. हे गावं नाशिक जिल्ह्यामध्ये त्रंबकेश्वर पासून १० किमी अंतरावर त्रंबकेश्वर-घोटी रोडवर आहे.

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti

Leave a comment