नाना फडणवीस वाडा, मेणवली (वाई)

नाना फडणवीस वाडा, मेणवली (वाई)

नाना फडणवीस वाडा

माधुरी दीक्षित च्या ‘मुत्युदंड’ चित्रपटाचे चित्रीकरण नाना फडणवीस वाडा याच वाड्यात आणि येथील मंदिर परिसरात झाले आहे. मेणवली येथील नाना फडणवीस वाडा सुस्थितीत असलेली मध्ययुगीन मराठा वाडावास्तुशैलीतीत प्रशस्त हवेली आहे. वाडय़ाच्या दारात दुर्मिळ असलेला डेरेदार गोरख चिंचेचा वृक्ष आहे. वाडय़ात पेशवेकालीन चित्रे, कारंजे आहे. सध्या वाड्याचा बराच भाग बंदिस्त आहे.

नाना फडवणीस यांना वाईच्या पश्चिमेकडील हा भाग इनाम मिळाला. तिथे नानांनी मेणवली हा टुमदार गाव वसविला आणि त्या ठिकाणी कृष्णा नदीकाठी चारसोपी पूर्वाभिमुख भव्य वाडा इ.स१७७० मध्ये बांधला.या वाड्याच्या मागे नाना फडवणीसांनी चंद्रकोरीच्या आकाराचा घाट बांधला आणि मेणवलेश्वर मंदिर बांधले.

या दुमजली व पोटमाळा असलेल्या भव्य वाड्याच्या भोवती दगडी भक्कम भिंत असून पूर्वेस मुख्य प्रवेशद्वारावर नौबतखाना (नगारखाना) आहे. त्याच्या आतील बाजूस उघड्या सोप्यासमोर कारंजे असून आतील उजव्या बाजूस सुरेख वर्तुळाकार चिरेबंदी पत्थरांत बांधलेली मोठी विहीर आहे.

चौकांच्या योजनेमुळे भरपूर प्रकाश व हवा आपातत: वरच्या मजल्यापर्यंत खेळती राहते. तसेच भिंतीचा गिलावा मातीत गवत कुजवून केलेला असल्यामुळे त्यावर बारीकसा चुन्याचा थर दिल्यामुळे आज सुमारे दोन-अडीचशे वर्षे झाली, तरी त्याला चिरा पडलेल्या नाहीत किंवा पोपडे पडत नाहीत.

वाड्यातील स्त्री-वर्गाला घाटावर स्नानासाठी जाण्यासाठी मागील बाजूस स्वतंत्र व्यवस्था केली आहे. नाना फडणीसांनी त्याच्याकडे असलेल्या काही मौल्यवान वस्तू, कागदपत्रे अखेरच्या दिवसांत इथे सूरक्षितत्तेच्या दृष्टिकोनातून आणून ठेवली होती. कृष्णाकाठी असलेला वाडा पूर्वाभिमुख असून त्याच्या पश्चिमेकडे म्हणजेच वाडय़ाच्या मागील बाजूने कृष्णेत उतरण्यासाठी घाट आहे.

येथे जाण्याचे मार्ग : पुणे – खेड शिवापूर – शिरवळ – खंबाटकी घाट – सुरुर – वाई – मेणवली.
अथवा
पुणे – खेड शिवापूर – भोर – मांढरदेवी घाट – वाई – मेणवली.

माहिती साभार – माझी भटकंती / Maazi Bhatkanti

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here