नागाव बीच आणि काशिद बीच

नागाव बीच

नागाव बीच आणि काशिद बीच

नागाव बीच :
पुणे ते नागाव बीच अंतर १५० किमी आहे (मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे मार्गे). नागाव गावात असलेल्या नारळी-पोफळीच्या बागा आणि त्या बागांच्या मधून जाणारा रस्ता आपल्याला नागांव समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जातो. येथील समुद्रकिनारा सुरक्षित असल्यामुळे पर्यटकांची नागांव समुद्रकिनाऱ्याला पहिली पसंती असते. येथील वैशिष्टय म्हणजे किनार्यायवरील एका रांगेत असणारी डौलदारपणे डुलणारी सुरूची झाडे व रूपेरी वाळूचा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा त्यावर फेसाळणार्याा अथांग समुद्राच्या पांढर्याेशुभ्र लाटा पर्यटकांना फारच मोहीत करतात. येथे पर्यटकांसाठी नाष्टा जेवण तसेच निवासाच्या भरपूर सोयी आहेत.

काशिद बीच :
पुण्यापासून १७० किमी वर अलिबाग – मुरूड रस्त्यावर वसलेले काशिद हे अलिबाग पासून ३० कि.मी. अंतरावर असून आपल्या निळाशार किनारा, चमचमणारी पांढरी वाळू आणि आजुबाजूला असणाऱया निसर्गासाठी प्रसिद्ध आहे. समुद्रकिनारी छोटया स्टॉलपासून परिपूर्ण सुविधा असणारी हॉटेल्स रिसॉर्टस् यामुळे काशिद बीच पर्यटकांचे मोठे आकर्षण बनला आहे. तसेच या बीच वर असलेले वॉटर स्पोर्ट्स पर्यटकांना आकर्षित करतात.

माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here