शिवछत्रपती आणि शंभु छत्रपती यांची पत्रे!

शिवछत्रपती आणि शंभु छत्रपती यांची पत्रे

शिवछत्रपती आणि शंभु छत्रपती यांची पत्रे!

इतिहास हा नेहमीच संदर्भ ग्रंथावर अभ्यासला जातो.

मागील लेखात मी आपणास शिवछत्रपती ,शंभु छत्रपती ते अगदी तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांच्या विषयी असलेल्या संधर्भासाहित साधनांची माहिती दिली.आजच्या या लेखात आपण शिवछत्रपती आणि शंभु छत्रपती यांची पत्रे, अस्सल पत्रांची माहिती घेणार आहोत.

इतिहास हा नेहमीच अस्सल साधने वापरून त्यातील माहिती प्रकाशित करून अभ्यासला जातो. आताच्या काळात उपलब्ध झालेले एखादे अस्सल पत्र आता पर्यंत असलेली सर्व माहिती ही खोडून काढू शकतो.इतकी प्रचंड ताकद या साधनांमध्ये असते.

शिवछत्रपती यांची अस्सल पत्रे, त्यांनी दिलेली बक्षिसे, दान पत्रे यांची माहिती असलेले आणि आता उपलब्ध असलेले संदर्भ ग्रंथ म्हणजेच ,डॉ. सौ. अनुराधा कुलकर्णी यांनी दोन खंडात लिहिलेले, तब्बल ४०० हून अधिक पत्रे असलेला “शिवछत्रपतींची पत्रे” हा असामान्य ग्रंथ आहे. त्यांनी या ग्रंथासाठी अपार मेहनत घेतलेली आहे.यात  बारा मावळ ते मुघल, इंग्रज यांना लिहिलेल्या पत्रांची उत्तम अभ्यासपूर्ण माहिती आहे.

तसेच छत्रपती शंभु महाराज यांची अस्सल पत्रे, दाने, बक्षिसे यांची दोन पुस्तके उपलब्ध आहेत.

पहिले म्हणजे भारत इतिहास संशोधन मंडळ यांनी प्रकाशित केलेले “संभाजीकालीन पत्रासारसंग्रह”.

दुसरे  डॉ सदाशिव शिवदे सर यांनी लिहिलेले “छत्रपती संभाजी महाराज्यांची पत्रे”.यात ही तब्बल ३५० हून अधिक पत्रे उपलब्ध आहेत.

यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभु महाराज यांची विचारसरणी, परकीय धोरण, प्रजेविषयी असलेली जबाबदारी दिसून येते.

एक बाजूला मोडी पत्र आणि त्याचे भाषांतर हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य!! त्यामुळे ज्यांना मोडी येत नसेल त्यांनाही ही पुस्तके अभ्यासायला सोपी जातात.

असेच संधर्भग्रंथांचा अभ्यास केल्याने आपल्याला इतिहासात असलेली योग्य माहिती ही मिळते आणि ती लोकांपर्यंत पोहचवता ही येते.

आपणही वाचन करीत राहावे आणि ऐतिहासिक माहिती, तसेच संदर्भ  मिळवीत राहावे .हीच या पोस्ट मागील प्रामाणिक भावना!

बहुत काय लिहिणे. अगत्य असू द्यावे!!

जय भवानी ! जय शिवराय!!

@ किरण शेलार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here