श्री कृष्णामाई वेण्णामाई मंदिर, संगम माहूली

श्री कृष्णामाई वेण्णामाई मंदिर, संगम माहूली

श्री कृष्णामाई वेण्णामाई मंदिर, संगम माहूली, सातारा –

महाबळेश्वर पंचगंगा मंदिरात ज्या पाच नद्या उगम पावल्या त्यातील दोन नद्या म्हणजे वेण्णा नदी व कृष्णा नदी. या दोन नद्यांचा संगम झाला ते ठिकाण म्हणजे संगम माहूलीक्षेत्र माहूली. जेथे नद्यांचा संगम होतो ती जागा तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द होते. या संगमावर जवळ जवळ १४ मंदिर आहेत. या मंदिरांमधील महत्वाच मंदिर म्हणजे कृष्णा वेण्णा च श्री कृष्णामाई वेण्णामाई मंदिर.

पौराणिक कथेनुसार वेण्णाही शिवाच्या शरीरातून तर कृष्णा ही विष्णुच्या शरीरातून उत्पन्न झाल्या. मंदिरातील कृष्णा व वेण्णाच्या मूर्ती स्त्री रुपातील असून कृष्णामाईच्या हातात त्रिशूल व डमरु आहे.पाया खाली वाहन नंदी आहे तर वेण्णाच्या हातात शंख चक्र गद‍ा व पद्म आहे. पाया जवळ वाहन गरुड कोरला आहे.

मंदिर दगडी बांधकामात असून गाभा-याच्या प्रवेशद्वारावर गणपती व किर्तीमुख कोरले आहे. मूर्तींची स्थापना शिवपूरीचे गजानन महाराज यांच्या हास्ते झाली. कृष्णामाईचा उत्सव येथे माघ शुध्द एकादशी ते पोर्णिमा केला जातो. येथे कृष्णामाई दक्षिणवाहिनी झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची आग्राहून सुटका होण्यासाठी वाईच्या शेंडे गुरुजींनी केलेला हा नवस म्हणजे कृष्णामाई चा घाटावर केलेला उत्सव. वाईत सात घाटावर तर सातारा मध्ये संगम माहूली व क्षेत्र माहूली येथे केला जातो. येथे उत्सवात रथ‍ात /पालखीत उत्सवमूर्ती ठेऊन मिरवणूक काढली जाते.

येथील संगम‍वर स्नान केल्याने मुक्ती मिळते असे मानले जाते. सर्मथ र‌ामदासांनी कृष्णामाईवर आरती रचलेली आहे. मंदिराच्या आवरात भव्य वटवृक्ष असून ते प्रय‍ाग करून अणून शिवनामे घराण्यातील पुर्वजांनी ह्याची स्थापना केली.

या संगमावर संगमेश्वर ,विश्वेश्वर व रामेश्वर चे भव्य मंदिर आहेत.तर सावकार अनगळांनी बांधलेला घाट व छत्रपती घराण्यांचा समाधींचा राजघाट या   संगमावर  आहे. संगमावरील हे महत्वाच मंदिर.

संतोष चंदने, चिंचवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here