महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,68,749

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १४ | फैजपूर काॅंग्रेस अधिवेशन

By Discover Maharashtra Views: 2434 5 Min Read
चित्रकार प्रकाश तांबटकर, ललितकला भवन, खिरोदा

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १४ | फैजपूर काॅंग्रेस अधिवेशन –

खेड्यात भरवायचे हे गांधीजींच्या मताला पसंती असली तरी हे अशा प्रकारचे  अधिवेशन पहिलेच होते आणि हा प्रयोग पहिल्यांदाच होत होता. त्यामुळे समोर ढीगभर डोंगराच्या एवढ्या अडचणी आल्या. जितक्या स्वाभाविक तितक्याच कठीणही होत्या. अधिवेशनाच्या ठिकाण ठरवण्यात बऱ्याच अडचणी आल्या त्यात महाराष्ट्रात १८८५ पासून काँग्रेस भरली नव्हती त्यामुळे शंकरराव देव यांनी आग्रह धरला त्यामुळं गुजरात ची मागणी सरदार पटेलांनी केलेली मताधिक्याने आणि वायव्य सीमा प्रांत तसेच तामिळनाडू यांच्या मागण्या फेटाळण्यात आल्या. यात शंकरराव देवांना काँग्रेसचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन महाराष्ट्रात आणण्याचे श्रेय जाते.(खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १४)

ही खेड्यात व्हावी म्हणून ठराव झालेला नव्हता किंबहुना जेष्ठ नेत्यांचा खेड्यास विरोधच होता. पहिली मागणी पुणे बाबत झाली. मात्र गांधीजींच्या काँग्रेस खेड्यातच भरवावी असे अखिल भारतीय ग्रामोद्योग मंडळाच्या स्थापनेपासून १९३४ पासून प्रतिपादन करत होते. या पार्श्वभूमीवर शंकरराव देव यांनी गांधीजींचे मार्गदर्शन घेतले आणि पुणेची मागणी फेटाळली. सोलापूर येथील विभुते यांनी सोलापूर शहराचा आग्रह केला पण ते खेडे नसल्याने आपोआप रद्द करण्यात आले. नंतर पुणे जवळील खेड्यात घ्यावे असे ठरले पण शंकरराव देव यांनी ती मागणी फेटाळून लावली आणि तीन जिल्हा काँग्रेस समीती उरल्या त्यात मतदान झाले आणि अहमदनगर यास कमी मते मिळाली आणि पुर्व खानदेश व सातारा यांस सारखी मते पडली.

शंकरराव देव यांनी खानदेशास पसंती दर्शवली.देवांनी धनाजी नाना चौधरी यांना पुण्यात बोलावून घेतले आणि पुढच्या जबाबदारी साठी तयार राहण्यास सांगितले.

पुणे बैठकीत ठरले की खिरोदा येथे अधिवेशन घ्यायचे तरीही काही प्रांतिक नेते जळगाव येथे भरवण्याचा प्रचार चालविला होता. भुसावळचे वकिल आपली मागणी भुसावळ येथे भरवण्यास पुढे करीत होते पण गांधीजींच्या खेड्याबाबतच्या ​आग्रहापुढे ते चालले नाही. फुलगावला घ्यायचे अशी मागणी पुढे आली, कारण खिरोदा येथे रस्ते आणि सुविधांवर अनावश्यक खर्च होईल म्हणून न.वि. गाडगीळ व केशवराव जेधेंचा खिरोद्यास प्रारंभी विरोध होता.परंतु धनाजी नाना चौधरी यांनी शंभर एकर जमीन व वीस हजार रुपये गोळा करण्यासाठी मोहीम सुरू केली.

खिरोदा आश्रमातील रचनात्मक कार्य विनोबा भावे आणि शंकरराव देव यांनी पाहिले होते. तसेच गांधीजी, जमुनालाल बजाज सरदार पटेल, जयरामदास दौलतराम यांचे मत खिरोदा येथे भरवावे असेच होते.

शेवटी रचनात्मक कारणास्तव खिरोदा येथे झालेल्या विरोध लक्षात घेऊन प्रांतिक काँग्रेसने फैजपूर ही जागा निश्चित केली.

काँग्रेसच्या अधिवेशन भरवण्यासाठी भारत सरकारचा विरोध नव्हता पण जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक,यावल रावेर येथील मामलेदार व शासकीय अधिकारी तसेच सावदा फैजपूर नगरपालिका आणि राजनिष्ठ धनिकांनी अधिवेशनास विविध कारणांमुळे विरोध केला.

सावदा येथील एका राजनिष्ठ धनिकांनी अधिवेशनास विविध कारणांमुळे विरोध केला. या व्यक्तीने विधीमंडळाच्या आगामी निवडणुकीसाठी आपली उमेदवारी घोषित केली होती. काँग्रेसचे अधिवेशन फैजपूर येथे भरल्यास आतापर्यंत सरकारशी निष्ठा बाळगून असलेले स्थानिक लोक विशेषतः लेवा पाटीदार काँग्रेसच्या प्रभावाखाली येऊन सरकार विरोधात जातील आणि निवडणूकीवर विपरीत परिणाम होईल, या कारणांमुळे हितसंबंधीयांनी जोरदार विरोधी पवित्रा घेतला. काँग्रेसच्या प्रभावक्षेत्र या भागात वाढू न देण्यासाठी आपण अधिवेशन घेण्यास विरोध करत आहोत, असे त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सांगितल्याची नोंद गुप्त कागदपत्रांत आढळते. शिवाय अधिवेशनात वापरली जाणारी सधन जमीन खराब होईल आणि सावदा रेल्वे स्थानकापासून फैजपूरला येणारा रस्ता अरुंद आहे आणि सावदा गावातून जातांना अपघात होतील, अशी करणे पुढे केली आणि खरे तर काँग्रेस उमेदवार निवडून न येण्यासाठी हा प्रयत्न चालविले होते. तसेच अधिवेशनासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांवर दडपण आणून जमीनी परत मागण्यासाठी प्रयत्न चालू होते. (संदर्भ: जिल्हा पोलिस अधीक्षक,पुर्व खानदेश यांचे डी.आय.जी.पी. पुणे यास २० जुलै १९३६ रोजी लिहीलेले पत्र, होम स्पेशल ब्रॅंच फाईल क्र. ८००(१०९), १९३६)

हा प्रचार तत्कालीन भारतातील अगदी प्रातिनिधिक उदाहरण आहे.

शिवाय खेड्यातील वास्तव परिस्थिती दर्शवते. तसेच अनास्था सुध्दा आणि गांधीजी का खेड्यासाठी आग्रही भूमिका घेत होते ते समजून येते.

अपुरा आणि दुषीत पाणीपुरवठा, रस्त्यांचा अभाव, आरोग्य सुविधा आणि शौचगृहांचा अभाव, जनमानसावर होणारा प्रतिकुल परिणाम अशी विविध कारणे आणि असा प्रचार करून अधिवेशन होऊच नये म्हणून मोहिम उघडली. स्थानिक वृत्तपत्रांनी अधिवेशनास फारसा पाठिंबा दिला नव्हता. अशा परिस्थितीत धनाजी नाना चौधरी यांनी स्वयंसेवकांची सेना उभारली आणि अधिवेशनाचे आव्हान स्वीकारले.

संदर्भ: महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा १९९४.

माहिती संकलन  –

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १५

Leave a comment