महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,91,246

कवी कलश

By Discover Maharashtra Views: 1906 3 Min Read

कवी कलश –

निपचित पडलेल्या कवी कलश यांच्या थरथरत्या अंगावर रक्ताचे थेंब अगदी सकाळ होताच कमळ पुष्पाच्या प्रत्येक पाखळी वर येणाऱ्या दवबिंदू प्रमाणे उमटले होते. कोणी तरी हशमांनी येऊन कवी कलश यांना आणि शंभुराजांना धरले आणि  पुढे घेऊन जात होते….।

“एकदा आपल्या मित्राला शेवटचा मुजरा करण्यासाठी…. ते सोललेले शरीर धडपडत होते….!!”

आपल्या ह्रदयाच्या…..प्रत्येक धडधडणार्या ठोक्यातून…आपल्या मित्राला सांगत होते…”

आग्रा मे बचपन मे मित्रता हुई थी महाराज…..  संगमेश्वर पर हुई कैद के बाद औरंगजेब के कहने पर हम अगर छोड़ देते आपका साथ तो ? नहीं कभी नहीं…. ये औरंगजेब क्या खुद्द भगवान तक आके कोशिश करते फिर भी हमारी मित्रता को तोड नहीं पाते….महाराज !!…..देखिए हमे लेने कोई आ रहा है !!  हमारे शरीर को खेचते हुए स्वर्ग की ओर ले जाने के लिए…..!! अब इस शरीर मे प्राण तो है…. पर वो सिर्फ आपके चरणों में अर्पण करने के लिए….!! अब दर्द नहीं हो रहा महाराज….!!”

“बस्स शोर सुनाई दे रहा है !!…शायद स्वर्ग के रास्ते हमारा स्वागत खुद देवता कर रहे हैं !! महाराज….. आपको सुनाई दे रहा है ना ?…..”

आणि कवी कलश यांनी एक शेवटची हाक आपल्या जबान नसलेल्या तोंडाने शरीरातील अवघे बळ एकटवुन दिली….

” ऑ…..ऑ……”

आपल्या मित्राच्या हाकेने तेवढे भानावर आलेल्या शंभुराजेंनी सुद्धा आपल्या प्राण बळाला धरून हाक दिली…

” ऑ…..”

कलशांच्या चेहऱ्यावर आज कुठे तरी स्मित उजाडला होता…. पण रक्ताने माखलेल्या , डोळे आणि जीभ नसलेल्या चेहऱ्यावर तो कुठेच दिसत नव्हता…..

“आपल्या राजासाठी बलिदान देण्यासाठी आतुर झालेले हे शरीर शेवटच्या क्षणी आपल्या शंभुराजेंचे स्वरूप मनोमन आठवत होते…..!!”

“मैत्री या शब्दाची परिपूर्ण व्याख्या या कवी कलश आणि शंभुराजे या दोन नावाने सुरू झाली आणि इथेच आता संपत होती…..”

एकदा शेवटचा मुजरा म्हणून…कलशांनी जोर्याने हाक मारली….

“ऑ…..ऑ….”

आणि सप्प…. वढू कोरेगाव च्या बाजारात…. काफरांना मारणार्या तलवारी चा आवाज घुमला…. रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या…… कवीराज कलशांचे मस्तक उडवल्या गेले…..

उडणार्या रक्ताचे काही गरम थेंब शंभुराजेंच्या पायावर जाऊन पडले….

“आपल्या मित्राच्या , आपल्या राजाच्या सोबतीला… सारखे सोबत राहणारे कवी कलश आज आपला मित्र धर्म पुर्ण करून निजधामास गेले…..”…..

त्या उडलेल्या रक्ताच्या थेंबाचा एक थेंब जाऊन शंभुराजेंच्या मस्तकावर पडला…कलशांनी आपला मैत्री चा एक छंद आपल्या मावळत्या जिवनज्योती सह शंभुराजेंच्या चरणी अर्पण केला….

” देवताओं ने रची रचनाओ की सबसे बडी कल्पना आपहो…

इस कवी का जिवन शिवप्रभु….और अंत समय का निजधाम आप हो….”

” . युवराज !! आपके साथ हम विलीन हो जायेंगे पंचमहाभूतों मे….!! पर अब जाना होगा परंतु अगले जन्म मे मिलेंगे वही मथुरा के कृष्णधाम मे…हम सुदामा बनकर… !!

अक्षय चंदेल

Leave a Comment