महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

कंटकतिर्थ, काटा, वाशीम

By Discover Maharashtra Views: 2446 4 Min Read

कंटकतिर्थ (काटा) वाशीम –

वत्सगुल्म (वाशीम-विदर्भ) प्रदेशावर पुर्वी “वासुकी” या नागवंशी राजाचे अधिपत्य असे ‘वत्सगुल्म महात्म्य’ या ग्रंथावरून अनुमान करता येते.या अरण्यात वत्स ऋषी तपश्चर्या करीत होते म्हणून यास “वत्सारण्य’ नाव पडले. एकदा  वत्यऋषी शिव मंत्राचा जप करत कठोर तपश्चर्या करत असताना सांगाडा तेवढा शिल्लक राहला होता.त्यावर प्रसन्न होऊन त्यांना शिवपार्वती भेटायला आले आपल्या भक्तांची क्रूश झालेली दशा पाहून शिवाच्या डोळ्यातून अश्रू वाहु लागले. त्यातुनच करुणा तिर्थ व करुणा नदी (काटेपुर्णा) निर्माण झाली अशी आख्यायिका सांगितली जाते.कंटकतिर्थ.

काटा(वाशिम)यादवकालीन शिलालेख…

वत्सगुल्म (वाशिम)च्या पंचक्रोशीत  ऊत्तरेस काटा हे गाव आहे. करूणेश्वरापासुन  (वाशिम)गुप्त झालेली करुणा नदी ‘काटा’ येथील ब्रम्हकुंडातुन परत प्रगट होते.काटे गावातून ऊगम पावलेली ‘काटेपुर्णा’ पुढे विदर्भात वाहती होते…

गाव खूप प्राचीन आहे आताही काही सुव्यवस्थित कोरीव लाकडी काम असलेले भव्य दुमजली मोठे वाडे,जिर्ण वाड्याचे भग्णावेष,पांढऱ्या मातीच्या घरे,चिरेकोट आपल लक्ष वेधून घेतात. कंठेश्वर महादेव मंदिर गावाच्या दुसर्या टोकावर म्हणजे काटेपुर्णा च्या पलीकडच्या तीरावर आहे.मंदिर नेहमीप्रमाणे हेमाडपंथी(यादव कालिन)शैलीचे म्हटल्या जाते.काळ्या पाषाणातील या मंदिरात महादेवाची मोठी पिंड आहे पण गर्भगृहाच्या एका देवकोष्टात१/३ ऊमा-महेश्वरांची मोहक,सुबक मुर्ती असल्याचे आठवते.

या मुर्तीच्या आसनामध्ये बैठकीवर हा यादव कालीन मराठी शिलालेख आहे. शिलालेखाचा मजकूर तो पुढील प्रमाणे आहे-

शके १२२७ मध्ये यादव रामचंद्र देवराय हा राज्य करीत असता रामदेव नावाच्या एका भक्ताने एक मंडप तयार करविला व त्याचा कारागीर अरूआर(पंडित) कावदेवाचा (नातलग) नारदेव हा होता.”

शिलालेखाचे वाचन झालेले आहे विदर्भ संशोधन मंडळ च्या पत्रिकेत त्यासंबंधी लेख ही प्रसिद्ध झाला आहे. काटा शिलालेख यादवकाळाच्या राजवटीचा ऐतिहासिक द्रुष्टीने फारसा महत्त्वाचा नसावा पण वाशिम जिल्हाच्या ऐतिहासिक परंपरेला नक्कीच भुषवणारा ,मोलाची भर घालणारा आहे.

मंदिराचे स्थापत्य- प्रा.रवि बाविस्कर सरांनी मंदिराबदल पुढील माहिती दिली की या तीर्थाचा उल्लेख वत्सगुल्म महात्म्य यातील 108 तिर्थांमध्ये येतो. यापैकी काटा येथील मंदिर प्राचीन असून हेमाडपंथी आहे. हे मंदिर गावाच्या पश्चिमेस काटेपूर्णा नदीच्या प्रवाहा जवळ आहे. हे मंदिर राजा रामदेवराव यादव याच्या काळातील आहे. हे मंदिर मंडप, अंतराल आणि गर्भगृह यात विभागलेले आहे.

मंडपास तीन द्वार आहेत. मंडपात नक्षीदार स्तंभ आहेत. त्याचे तळखडे चौरसाकृती आहेत. स्तंभभाग अष्टकोणी आहे. मधल्या चौरस भागावर नाजूक नक्षीकाम असलेला हार कोरलेला आहे. गोलाकार पटावर कुंभ प्रतीक कोरलेले आहे. करणरेषांवर सुंदर वामन मूर्ती व कीचक आहेत. त्यांनी सभामंडपाचे छत तोलून धरले आहे.

गर्भगृहाचे प्रवेशद्वार-

गर्भगृहाच्या द्वारावर बरेच सुबक नक्षीकाम कोरलेले आहे. प्रवेश द्वारला उंबरा असून मध्यभागी पुढे आलेला मंदारक आहे. त्यावर किर्तीमुख कोरलेले आहे. त्याच्या दोन्ही बाजूला पुष्पांची नक्षी आहे. मध्यभागी चंद्र शिळा आहे. ललाटबिंबामावर गणेश मुर्ती कोरलेली आहे. ललाट पट्टीच्या वर पाच स्वतंत्र देव कोष्टकामध्ये मूर्ती कोरलेल्या असाव्यात पण त्या झिजून त्यामध्ये सिमेंट भरलेले आहे.

प्रवेशद्वार पाच द्वार शाखांचे आहे. त्यावर पत्र शाखा गंधर्व शाखा स्तंभ शाखा  व्याल शाखा  आणि स्वल्प शाखा दिसतात. अशा या पंच शाखायुक्त प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस गंगा, यमुना, चामर धरणी आणि मध्यभागी विष्णूमूर्ती कोरलेल्या दिसतात.

गर्भगृह-

गर्भगृह खोल असून चौकोनी आकाराचे आहे. मध्यभागी पंचमुखी शिवलिंग आहे. जवळच देवीचे मंदिर असल्याने या स्थळाला शिवशक्ती असे म्हटले जाते. हे यादवकालीन मंदिर असून येथे शिलालेख आहे.कंटकतिर्थ.

साभार. प्रा.रवि बाविस्कर सर आणि फोटो साभार -सचिन कुळकर्णी.

Leave a comment