कल्लोळ, येडेश्वरी माता, धाराशिव

कल्लोळ, येडेश्वरी माता, धाराशिव

कल्लोळ, येडेश्वरी माता, धाराशिव –

पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी देवीची पालखी येरामाळा गावातील चुन्याच्या रानात येते. भाविकानांसाठी चुना वेचण्याचे खूप महत्व आहे. पालखी चुन्याच्या रानात आल्यावर भाविक चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर टाकतात. तिथुन पालखी अंबाराईत जाऊन बसते तिथे पालखिचा पाच दीवस मुक्काम असतो. यात्रेच्या पाच दिवसा नंतर पालखी पुन्हा मंदिरावर जाते. यात्रेच्या या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्रच्या बाहेरून  लाखो भाविक यात्रेला येतात. त्याच प्रमाणे दर मंगळावर, शुक्रवार व पौर्णिमा या दिवशी हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. नारळी पौर्णिमा, दसरा व दिवळीतही मोट्या प्रमाणात यात्रा भरते. असे हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले येडेश्वरी देवीचे देवस्थान हे महाराष्ट्रातील अत्यंत जागृत देवस्थान आहे .कल्लोळ.

सदर कल्लोळ हे श्री दत्तांनी देवीच्या स्नानासाठी निर्माण केले असे सांगीतले जाते. या कल्लोळात स्नान केल्याने भाविकांची ईडा पिडा कमी होते. सदर पालखी या कल्लोळाच्या जवळ आली की येथे असलेल्या चिखलातून पालखी मार्गस्थ झाली की तेथील चिखल भाविक अंगास फासून या कल्लोळात स्नान करतात. सदर चिखल अंगास लावलाकी त्वचेचे आजार बरे होतात असे बोलले जाते.

( सदर माहिती स्थानिक पौराणीक व दंत कथेवर आधारीत.)

संतोष चंदने, चिंचवड,पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here