होळकर तिर्थ

होळकर तिर्थ
होळकर तिर्थ

होळकर तिर्थ…

होळकर तिर्थ म्हणजेच शिवालय तिर्थ हे वेरुळ येथील तिर्थस्थानामधील एक महत्वाचे स्थान आहे. याच्या चारही बाजूस चार दरवाजे असुन याचे संपुर्ण बांधकाम हे लाल पाषाणात केलेले आहे तसेच चारही बाजूस ५६-५६ पायऱ्या आहेत. या पायऱ्यामधील ४१ व्या पायरीवर गाईचे खुर व विष्णुपद आहे. या शिवालय तीर्थामध्ये आठ दिशांना आठ अष्टतीर्थांच्या देवांची सुबक आणि सुंदर अशी देवालये बांधलेली आहेत. स्थानिक कथेप्रमाणे एलराजाने येथे तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले.ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन अष्टतीर्थाना एकत्र करून हे शिवालय तिर्थ निर्माण केले.याचाच अर्थ असा कि हे तीर्थ प्राचीन असावे.येथे असलेल्या शिलालेखानुसार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इ.स.१७६९ मध्ये या शिवालय तीर्थाचा जीर्णोद्धार केला व हे तीर्थालय नव्याने बांधले.तसेच त्यांनी आपले कुळदैवत श्री खंडोबा याचेही मंदिर येथे बांधले. घृष्णेश्वरास येणाऱ्या भाविकाने प्रथम येथे स्नान करून, श्री लक्षविनायकाचे दर्शन घेऊन नंतर श्री घृष्णेश्वराचे दर्शन घ्यावे अशी प्रथा होती.महाशिवरात्रीस प्रत्यक्ष घृष्णेश्वराची पालखी येथे स्नानासाठी येते.या तीर्थालायास अहिल्याबाई होळकर बारव असे देखील म्हणतात. औरंगाबाद ते घृष्णेश्वर हे अंतर ३१ कि.मी. आहे तर होळकर तिर्थ घृष्णेश्वरापासून ६ मिनिटे चालत अंतरावर आहे.अशी हि ऐतिहासिक बारव पाहायला एकदा तरी जायला हवे !!!!!


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
खांदेरीचा रणसंग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here