हेगडी प्रधान, जेजुरीगड

हेगडी प्रधान, जेजुरीगड

हेगडी प्रधान, जेजुरीगड –

हेगडी प्रधान श्री खंडोबारायाचे प्रधानमंत्री!

मणीसूर व मल्लासूर या दैत्यांच्या युद्धावेळी मार्तंड भैरवाने विष्णुना आपले प्रधान म्हणून नेमले होते. मणीसूर दैत्य धारातीर्थी पडल्यानंतर  मार्तंड भैरवाने मल्लासुराकडे  श्री विष्णुंना  शिष्टाई करण्यासाठी पाठविले होते. विष्णूनी केलेल्या शिष्टाईला यश आले नाही. पुढे युद्धामध्ये मार्तंड भैरवाचे हातून मल्लासूराचा वध झाला.

हेगडी प्रधानाचे मंदिर जेजुरगडावरील पायरी मार्गाच्या मध्यावर लागते.मंदिर साध्या बांधणीचे विना कळसाचे दगडामध्ये बांधलेले आहे. या मंदिरामध्ये विष्णूंच्या दोन मूर्ती आहेत .त्यावरून अनेकांना वाटते हेगडे व प्रधान दोन स्वतंत्र असावेत परंतु  प्रधान या शब्दाचे कानडी रूप म्हणजे हेगडे होय.  एकत्रीकरण करून त्यांचा एकच शब्द  झाला आहे. हेगडी प्रधान हे नाम प्राप्त झाले आहे.

श्रीखंडोबाचे दर्शन घेण्यापूर्वी हेगडी प्रधानाचे दर्शन घेणे महत्वाचे मानले जाते. हेगडेप्रधान हा बाणाईचा भाऊ समजला जातो.

जेजुरी गडावरील परिवारत मल्हारी, म्हाळसा, बाणाई ,हेगडीप्रधान ,श्वान व घोडा यांना महत्वाच स्थान आहे. बाणाईमंदिरा बाजूलाच हे दगडी बांधकाम केलेल सुंदर मंदिर आहे. मंदिरात आत गेल्यानंतर याच बांधकाम दिसत. मुख्यामार्गावरच मंदिर असले तरी भावीक यावर पाठ फिरवतात.

हेगडे प्रधान हा परिवातील घटक असल्याने त्याचे दर्शन महत्वाचे आहे. याला विष्णुच रुप मानले आहे.तो गडाचा प्रधान आहे.

संतोष मु चंदने, चिंचवड, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here