महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

सरसेनापती श्रीमंत हरजीराजे राजेमहाडीक

By Discover Maharashtra Views: 6460 4 Min Read

सरसेनापती श्रीमंत हरजीराजे राजेमहाडीक…

हिंदवी स्वराज्य साकारण्यासाठी सोळाव्या शतकापासून एकवि  साव्या शतकापर्यंत देव,देश आणि धर्मासाठी झुंजलेले आणि राजेभोसले घराण्याशी एकनिष्ठ राहिलेलं एक शूर मराठा सरदार घराणे म्हणजे राजेमहाडीक घराणे. हे श्रीमंत मराठा सरदार घराणे  इतिहासात खूप प्रसिद्ध होते. सोळाव्या शतकात हे महाडला आले  महाड वरून त्यांना राजेमहाडिक असे आडनाव पडले .त्यांचे महापुरुष  कृष्णाजीराजे १६१४ ला युसूफ आदिलशहाच्या लुटालूटीत मरण पावले . त्यांच्याकडे दाभोळची मुकादमकी होती .नंतर शिवाजी महाराजांची स्वराज्य निर्माण करण्याची सुरुवात झाल्यावर कृष्णा जींचे बंधू कान्होजी यांना ही मुकादमकी मिळाली. कान्होजी १६५० ला युद्धात मरण पावले . त्यांचा मुलगा परसोजी हे  शहाजीराजांचे बरोबर कर्नाटकात  मदत करत असताना मरण पावले. त्यांचा मुलगा हरजीराजे राजेमहाडीक यांच्यावर शहाजीराजांचे चांगलेच लक्ष होते. हरजीराजे शिवाजी महाराजांचे  विश्वासू सरदार होते .जी मोहिम छत्रपती देतील ती मोहीम  यशस्वी करूनच हरजीराजे येत होते.छत्रपती शिवरायांनी हरजीराजे यांच्या कर्नाटकातील कामगिरीवर खुश होऊन सोन्याची जेजूरी गडावर हरजीराजांना” राजेशाही ” हा किताब सन्मानार्थ देऊ केला. राज्याच्या महत्त्वाचा जिंजी प्रांत हा मोगलांपासून मुक्त ठेवण्याचे श्रेय हरजीराजे महाडिक यांना आहे अशा कर्तबगार राजेमहाडिक घराण्यामुळे त्यांचे  नाव इतिहासात अजरामर झाले आहे.

छत्रपती  संभाजी महाराजांच्या काळात हरजीराजे महाडिक यांनी कर्नाटक सह दक्षिण प्रांत औरंगजेबाच्या झंजावाती आक्रमणापासून वाचवला.  त्यांनी त्यावेळी जिंजी व वेल्लोर,मद्रास ,म्हैसूर ,अर्काट, बंगळूर आधी प्रांत म्हणजे संपूर्ण कर्नाटक व तामिळनाडू हरजीराजे ने जिंजीच्या आधिपत्याखाली आणले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज १६८९ मध्ये जिंजीस आले. तेथे राजधानी घोषित करून तेथूनच काही काळ राज्यकारभार केला.छ. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब हा मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता. मात्र हरजीराजे नेहमी त्याच्या आड आले.

दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या. अशावेळी हरजीराजे यांनी  जिंजी परिसर स्वराज्यात ठेवला ही त्यांची कामगिरी अद्वितीयच म्हणावी लागेल.

त्यांच्या शूरवीरतेच्या गुणामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुलगी अंबिकाबाई यांचा हात  विश्वासाने सन. १६६८ ला श्रीमंत हरजीराजे यांच्या हाती दिला व हा विवाह राजगडावर संपन्न झाला. पुढे शिवरायांच्या मृत्यू झाल्यानंतरही हरजीराजे  छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबर ईमानाने वागले .म्हणूनच दक्षिण भारताची जबाबदारी शिवरायांनी त्यांच्याकडे ठेवली होती.ती संभाजीराजेंनीही परत त्यांच्याकडेच कायम ठेवली .

हरजीराजे त्यांच्या पराक्रमामुळे छत्रपतींचे मन  जिंकून घेतले  व संभाजी राजेंच्या मृत्यु नंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी पराक्रम गाजवले.औरंगजेबाचा सरदार जुल्फिकारखान या सरदाराशी लढता लढता दि.२९ सप्टेंबर १६८९ ला हरजीराजे जिंजी येथे तोफेचा गोळा लागून धारातिर्थी पडले.

पुढे हरजीराजे कांचीवर (कर्नाटक प्रांत) चाल करून गेले त्यांच्या पराक्रमापुढे कांची ही नमली व हरजीराजे महाडिक यांनी कांचीही जिंकून घेतली, संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर छञपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य रक्षणासाठी हरजीराजेंनी जिंजीत शौर्य पराक्रम गाजवले.पुढे हरजीराजे महाडीक यांचे पुत्र शंकराजी  महाडीकांना छत्रपती संभाजी महाराज यांनी आपली मुलगी भवानीबाई यांचे लग्न लावून दिले. १७०९  मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी  भवानीबाई व शंकराजी राजेमहाडिक यांना तारळे महालाअंतर्गत 24 गावे व 72 वाड्यांची पाचही वतनाची  सनद करून दिली. सनदेप्रमाणे भवानीबाई व शंकराजीराजे तारळ्यात आले.त्याच्या आधी मोगलांनी तारळे महालाची वाताहात केली होती .अशावेळी  हनगोजी काटे देशमुख , सिदोजी , विठोजी  साळवे- देशमुख , देशपांडे, मुकादम , कुलकर्णी , शेटे ,महाजन व बलुतेदार मंडळींनी रयतेला संरक्षण देण्याबरोबरच महालाला ऊर्जितावस्था आणण्याचे भवानीबाईना साकडे घातले .त्यानुसार भवानीबाई व शंकराजीराजे यांनी तारळे महालावर आपला अंमल प्रस्तावित करून विस्कटलेली घडी बसवली.

धाकटया शाहूंराजांजवळ दुर्गाजीराजे महाडिक व कुशाबाराजे महाडिक हे सरदार होते.

कान्होजीराजे महाडिक , परसोजी राजेमहाडिक , हरजीराजे महाडिक यांनी मराठेशाहीत आपले  पराक्रम गाजवून आपल्या घराण्याचे नाव अजरामर केले. तारळ्यात या   पराक्रमाच्या अनेक पाऊलखुणा, दस्तऐवज, पत्रव्यवहार उपलब्ध आहेत .आजही राजेमहाडीक बंधूंचे आठ वाडे मोठ्या दिमाखात उभे असून, त्यात आजची राजे महाडिक घराण्यातील पुढची  पिढी नांदते आहे.

स्मृतीदिन – २९ सप्टेंबर १६८९

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a comment