महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,91,360

शोर्यशाली हैबतराव नाईक निंबाळकर

By Discover Maharashtra Views: 2235 7 Min Read

शोर्यशाली हैबतराव नाईक निंबाळकर –

‘वणंगपाळ बारा वजीराचा काळ ‘अशी ज्या घराण्याची ख्याती ते घराणे म्हणजे फलटणचे नाईक निंबाळकर घराणे होय.मराठी मुलखातील प्राचीन घराण्यापैकी नाईक निंबाळकर यांचे हे घराणे आहे.छत्रपती शिवरायांची जशी फलटण ही सासुरवाडी तशीच  शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले हे सुद्धा नाईक निंबाळकरांचे जावई होत. म्हणजे शहाजी राजांचे हे आजोळ घराणे आहे. शहाजी राजांच्या मातोश्री दीपाबाई राणीसाहेब या फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या होत्या.  फलटण हे छत्रपती  शिवरायांची सासुरवाडी म्हणून जसे मराठी मुलखाला ज्ञात आहे तसेच शहाजीराजे यांचे ते आजोळ म्हणूनही मराठी मुलखाला ज्ञात आहे .हैबतराव नाईक निंबाळकर.

अशा या फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील दहिगाव आणि  भाळवणी  या ठिकाणी वास्तव्यास आलेले साबाजी आणि जगदेवराव ही मुधोजी नाईक निंबाळकर यांची दोन मुले . या दोघा भावांची घराणी मराठी इतिहासात पुढील शंभर दीडशे वर्ष आपल्या पराक्रमाने, शौर्याने तळपत राहिली आहेत. या पराक्रमी पुरुषांनी त्यांच्या निष्ठेने,शौर्याने  फार मोठा मान मरातब मिळवला.छत्रपती  शिवाजीराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या हालचाली पुणे, सुपे या त्यांच्या जहागिरीत चालू   झाल्या तरीही हे घराणे आदिलशाही सलतनीशी एकनिष्ठ राहून त्यांची इमाने इतबारे सेवा करत राहिले. दहिगाव आणि भाळवणी येथील नाईक निंबाळकर घराण्यात अनेक वीर पुरुष एकामागून एक निर्माण होऊन आपल्या पराक्रमांनी त्यांनी, ज्यांचे पदरी राहिले त्यांची प्राण पणाला लावून निष्ठेने सेवा बजावली.

भाळवणी शाखेचे मूळ पुरुष जगदेवराव नाईक निंबाळकर ! यांचे पुत्र शिदोजी हे छत्रपती  शिवरायांच्या सेवेत राहून स्वराज्यनिर्मीतीच्या कामी एकनिष्ठपणे राहिलेले दिसून येतात. छत्रपती शिवरायांनी त्यांना पंचहजारी सरदाराचा मान दिला होता. यावरुन छत्रपती शिवरायांच्या दरबारात त्यांचा मानमरातब किती मोठा होता याची प्रचीती येते.

सिधोजी नाईक निंबाळकर भाळवणी शाखा हे छत्रपती शिवाजी राजांच्या बरोबर जालना स्वारीत हजर होते. परतीच्या वाटेवर  सरदार रणमस्तखान  इत्यादींना थोपवून धरण्यासाठी त्यांनी तीन दिवस मोगल सैन्याला लढा दिला व त्यातच त्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या मागाहून त्यांचे पुत्र हणमंतराव  निंबाळकर जहागिरीचा कारभार पाहत होते.

छत्रपतींचा रायगड किल्ला काबीज करणारा हा मोगली सेनापती जिंजीच्या किल्ल्याचे सात वर्षे वेढा घालून किल्ला जिंकणारा हा प्रसिद्ध सेनानी होय. हणमंतराव नाईक निंबाळकर यांनी मोगलांचे खटावचे ठाणे मारून काढले. आवजी आढळ हा खटावचे ठाणे सांभाळून होता. त्यांनी हणमंतराव नाईक निंबाळकर यांना ठार मारले. हणमंतराव नाईक  निंबाळकर यांनी मोगली सैन्याशी लढताना एकामागे एक विजय मिळवले होते. बादशाही सेवेत असलेला भीमसेन सक्सेना म्हणतो हणमंतराव निंबाळकर यांचा मृत्यू झाला. हे बादशहाचे भाग्यच म्हटले पाहिजे. यावरून हणमंतराव निंबाळकर यांच्या पराक्रमाची वेगळी पावती नको असे म्हणावे लागेल.

हैबतराव नाईक निंबाळकर हे हणमंतराव नाईक निंबाळकर यांचे पुत्र इ.स.१७०८ मधे ताराराणी यांची बाजू सोडून ते छत्रपती शाहू छत्रपतीच्या बाजूस आले होते.छत्रपती शाहराजे यांनी त्यांना वडिलांचे सरलष्कर पद दिले.

लवकरच छत्रपतीा शाहू महाराजांच्या दरबारी हरणाचे तंट्याबाबतचे गाजलेले प्रकरण निर्माण झाले. धनाजी जाधव यांचे पुत्र चंद्रसेन जाधव सेनापती बाळाजी विश्वनाथ यांना पकडण्यासाठी त्यांचे सैन्य मागे लागले होते. बाळाजी विश्वनाथ बरोबर त्यांची बायकामुले होती. त्यांचा जमावही लहान होता. चंद्रसेन जाधवांनी त्यांना निरेवर, परिंचे गावी गाठून त्यांचा पराभव केला. तेव्हा नाथाजी धुमाळ, पिलाजी जाधव,आणि  कान्होजी शिर्के छत्रपती शाहू महाराजांचे सासरे यांनी चंद्रसेन जाधवास तोंड देत बाळाजी विश्वनाथ आणि बरोबर असलेल्या आबाजीपंत  पुरंदरे यांचा बचाव केला. खंडोबल्लाळ यांचेमार्फत छत्रपती  शाहू महाराजांच्या कानावर या गोष्टी गेल्या .चंद्रसेन जाधवाने आणि छत्रपती  शाहू महाराज यांना उद्दामपणाची भाषा वापरून बाळाजी विश्वनाथ यास आमच्या हवाली केले नाही तर “आम्हास धन्याचे पाय सुटतील “असे कळविले.

छत्रपती शाहूंराजेंचा पक्ष दुबळा करण्याची कोशीस निजाम आणि ताराराणी दोघेही करीत होते. निजाम जातीने अशा गोष्टींना फुस देऊन मराठे सरदार आपल्या बाजूस वळवून घेण्याची खटपट करीत होते.

चंद्रसेन जाधव सेनापती यांना चांगली अद्दल घडवण्यासाठी हैबतराव नाईक निंबाळकर यांना पाचारण केले गेले.यावेळी सरलष्कर हैबतराव नाईक निंबाळकर  नगरच्या बाजूस होते. चंद्रसेन जाधव पांडव गडाजवळ होते. छत्रपतींच्या आज्ञेप्रमाणे नगर कडील काम सोडून जलद गतीने ते फलटण बाजूस आले. चंद्रसेन जाधव त्यांच्यावर चालून आले उभयतांची गाठ आदर्कीच्या घाटात होऊन मोठे युद्ध झाले.त्यात चंद्रसेन जाधवांचा हैबतराव नाईक निंबाळकर यांनी पूर्ण पराभव केला. चंद्रसेन जाधवांना रहिमतपूर मार्गे पन्हाळ्याकडे पळून जावे लागले. छत्रपती शाहूंचे विरुद्ध ते ताराराणीच्या पक्षात जाऊन मिळाले. चंद्रसेन जाधवांचे पिताजी धनाजी जाधव यांचा मृत्यू झाले नंतर हैबतराव नाईक निंबाळकर यांना छत्रपतींनी दिलेली ही स्वतंत्र कामगिरी होती.

वडिलांच्या मृत्यूनंतर चंद्रसेन जाधव मराठी दौलतीचे सेनापती झाले होते.हैबतराव नाईक  निंबाळकर यांचे वडील हणमंतराव नाईक  निंबाळकर यांनी धनाजी जाधवांच्या मदतीने राजाराम महाराजांना स्वराज्य रक्षणाच्या कामी मोठे योगदान दिले होते. हणमंतराव नाईक  निंबाळकर हे धनाजी जाधवरावांचे सरदार होते .हैबतराव नाईक  निंबाळकर यांचे वडील हणमंतराव निंबाळकर यांनी धनाजी जाधव यांच्या मदतीने छत्रपती  राजाराम महाराजांना स्वराज्य रक्षणासाठी मोठी मदत केली होती. हैबतराव नाईक निंबाळकर हे धनाजी जाधवरावांचे सरदार होते .धनाजी जाधव यांना  संताजी घोरपडे वर चाल करून  पाठवले होते.नंतर त्यांचा पराभव केला होता .त्या धनाजी जाधवांचे पुत्र  चंद्रसेन जाधव यांचा पराभव करण्याची पाळी हैबतरावांवर आली. संताजी व धनाजी हे स्वराज्याचे अग्रणी सेनापती आणि  त्यांच्या पश्चात सेनापतीपद प्राप्त झालेले  चंद्रसेन यांचा पराभव निंबाळकरांच्या हातून व्हावा ही एक लक्षणीय घटना होती .

हनमंतराव निंबाळकरांनी  संताजीचा पराभव केला यावरून अति पराक्रमी सेनापती म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. हैबतराव निंबाळकर यांची शाहू छत्रपती ने केलेल्या पराक्रमाची  नोंद घेऊन हैबतराव यांचे पुढे धनाजी जाधवांचे  पुत्र चंद्रसेन जाधव यांच्यावर चालून जाण्याचा हुकूम दिला.छत्रपती शाहू महाराज यांनी हैबतराव निंबाळकर यांच्या  पराक्रमाची परीक्षा घेतली.  निंबाळकर त्यात पूर्ण यशस्वी झाले.

शाहू  छत्रपती मोगलांच्या कैदेतून परत येत असता  त्यांना प्रथम येऊन सामील होणारे मराठी सरदार परसोजी भोसले .शाहू छत्रपतीनी त्यांना सेनासाहेब सुभा हे पद दिले होते .त्यांचा गौरव केला होता. परसोजी भोसले यांचा काळ १७१० मध्ये झाला होता .त्यांचे चिरंजीव कान्होजी यांना  पद मिळाले. कान्होजी भोसले चांदाच्या बाजूस मोहिमेवर गेले होते .त्यांचे साथीला सरलष्कर हैबतराव निंबाळकर होते. या मोहिमेत एका लढाईत रणांगणावर ५ मे १७१४ रोजी  हैबतराव निंबाळकर यांचा मृत्यू झाला.

हैबतराव नाईक निंबाळकर यांच्याकडे  असलेले सरलष्कर हे पद शाहू छत्रपतीनी त्यांचे चिरंजीव सुलतान जी यांना दिले .हैबतराव निंबाळकर यांच्या  मृत्यूचा सूड घेण्यासाठी सुलतानजी निंबाळकर सरलष्कर त्या भागातील मोगल फौजेवर चालून गेले.

संदर्भ –
सोलापूर जिल्ह्याचा इतिहास – गोपाळराव देशमुख.
मराठी रियासत – गो.स.सरदेसाई.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Comment