घुमटी विहिर अथवा टोप विहिर

घुमटी विहिर अथवा टोप विहिर

राणी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली घुमटी विहिर अथवा टोप विहिर

अहिल्यादेवींची घुमटी विहिर किंवा टोप विहिर, कसारा घाट.
मुंबईहून रस्त्याने नाशिकला जाताना वाटेत कसारा घाट लागतो. या घाटाचे मूळ नाव ‘थळ घाट’ असे आहे. घाट चढताना डाव्या बाजूस दरी व उजव्या बाजूस डोंगर आहे. त्यातल्या एका वळणावर एक अर्धवर्तुळाकार, टोपली उलटी ठेवल्याप्रमाणे दगडी बांधकाम दिसते. असे बांधकाम कधी राहत्या घराचे किंवा मंदिराचे असत नाही. ती एक मोठी, जवळ जवळ चाळीस फूट व्यासाची विहीर असून, त्यात कचरा किंवा जंगली प्राणी पडू नयेत म्हणून दगडी बांधकाम करून टोपलीसारखे छप्पर बांधले आहे. विहिरीत काठोकाठ स्वच्छ पाणी भरलेले होते.

आजदेखील त्या डोंगरात वरच्या बाजूलाअसलेल्या चार वस्त्यांमधील महिला चारही बाजूंना कठडय़ाच्या वर बांधकाम ठेवलेल्या खिडकीवजा खुल्या भागातून पाणी भरतात. ही विहीर आणि हे छप्पर या जंगलामध्ये कुणी बांधले? तर या घाटाची जी पूर्वी पायवाट होती त्या वाटेने चढून प्रवास करणाऱ्या वाटसरूंना आणि यात्रेकरूंना वाटेत विसाव्याचे ठिकाण तयार करण्यासाठी ही विहीर व तिचे हे अर्धवर्तुळाकार घुमटासारखे छप्पर अहिल्याबाई होळकर (१७२५-१७९५) यांनी काळ्या दगडाचे घडीव बांधकाम करून बांधले. दोनशे वप्रे होऊन गेली तरी ही विहीर तिचे पुण्यकर्म इमानेइतबारे करते आहे आणि तिचे घुमटासह बांधकाम अजून मजबूत आहे.

माहिती साभार – मी निसर्गवेडा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here