बंगालमध्ये मराठा माणसाची हवेली बनली पंचतारांकित हाॕटेल…

बंगालमध्ये मराठा माणसाची हवेली बनली पंचतारांकित हाॕटेल...

बंगालमध्ये मराठा माणसाची हवेली बनली पंचतारांकित हाॕटेल…

इ.स. 1742 ते 1751 अशी नऊ वर्षे नागपुरच्या रघोजी भोसलेंच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी बंगाल, बिहार आणि ओडिशा प्रांतावर राञी बेराञी गनिमी काव्याने हल्ले करुन प्रचंड दहशत बसविली.मराठी सैनिकांना बंगाली लोक बाॕर्गी ( बारगीरचा अपभ्रंश ) म्हणत.बंगालमध्ये मराठा माणसाची हवेली.

या बार्गीची एवढी दहशत होती की, लहान मुल झोपत नसेलतर आई त्याला म्हणायची, सो जा बेटा नही तो बाॕर्गी आ जाएगा. बंगालचा नबाब अलवर्दीखानाने भोसल्यांशी करार करुन चौथाई देण्याची कबुली दिली.. दरसाल 12 लाखाची चौथाई देण्याचे कबुल केल्याने मराठ्यांचे अनेक जमिनदार याकरिता बंगाल प्रांतात स्थिरावले.
त्यापैकी एक म्हणजे सफलनारायण कोंडो हे कोलकत्त्याजवळील इटचुना या गावी स्थिरावले.

आपणाला राहण्यासाठी त्यांनी इ.स. 1766 साली अतिशय भव्य असा महाल बांधला. या वास्तुला “इटचुना राजबारी ” म्हटले जाते. विट आणि चुन्यामध्ये बांधल्यामुळे त्याला इटचुना म्हटले गेले. तर राजबारीचा अर्थ होतो महाल. मराठ्यांच्या तहशतीमुळे या महालाला ” बर्गी दंगल” ही म्हटले गेले. 250 वर्षानंतरही हा महाल अतिशय मजबुत असुन त्याच्या ऐतिहासिक बांधणीमुळे या महालाचे महत्वही तेवढेच वाढले. सफलनारायण कोंडोच्या 14 व्या वंशजांनी याला पंचतारांकित हाॕटेल बनविले आहे. लाल आणि पांढरा रंग, प्रशस्त खोल्या, उंच छत, दुर्मिळ फर्निचर, ऐतिहासिक रोषनाई, दिवाणखाना, भटारखाना अशा वेगळ्या शैलीमुळे याच्या वैभवात भर पडते.

इटचुना राजबारी हे गाव कोलकत्त्याजवळील हुगळी जिल्हात मोडत असून कोलकत्त्यापासून 80 किमीवर आहे. जुन्या काळातील बैठक व्यवस्था शाकाहारी आणि मांसाहारी जेवण तेही ऐतिहासिक भांड्यात दिले जाते. जुन्या काळातील खोल्या तसेच गावातील शेणामातीच्या खोल्याही इथं उपलब्ध आहेत. पोहोणे, खेळणे, बागबगिचा यामुळे पर्यटकांची गर्दी होत असते. बंगाली आणि हिंदी सिनेमाच्या शुटींगचे कामही सतत चालुच असते. लुटेरा सिनेमाची शुटींग इथलीच आहे.

मराठा माणूस काही करत नाही, गाव सोडत नाही याला बंगाल परिसर अपवाद आहे. इथं अनेक मराठे 250 वर्षापासून विविध क्षेञात नाव राखून आहेत. इटचुना राजबारी हे मराठा माणसाचे ऐतिहासिक पंचतारांकित हाॕटेल पाहिल्यावर ऊर भरुन येतो. त्यातच याला बर्गी दंगल म्हटल्याने मराठ्यांच्या दहशतीचा अंदाज येतो…

प्रा.डाॕ. सतीश कदम, उस्मानाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here