महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,731

स्वराज्यातील पहिले धरण

By Discover Maharashtra Views: 3828 1 Min Read

स्वराज्यातील पहिले धरण…

छत्रपती शिवरायांनी इसवी सन १६५६ साली खेडशिवापूर येथून वाहणाऱ्या आंबील ओढ्यावर स्वराज्यातील पहिले धरण बांधून प्रजेच्या पिण्याचे व शेतीच्या पाण्याची सोय केली.. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे धरणाच्या दोन्ही बाजूनी पाणी गावात खेळते राहण्यासाठी २ पाट काढले त्यातील उजव्या बाजूचे पाणी खोलेश्वर मंदिरा जवळून खेड शिवापूर येथील शिवाजी महाराजांच्या वाड्याजवळून तसेच पुढे भाऊ नागोजी वाड्याच्या पाठीमागुन जाते व तसेच पुढे केतकाई येथे आंबील ओढ्यास जाउन मिळते.. व डाव्या बाजूच्या पाटाचे पाणी शेतीसाठी पटी या विभागातून पुढे जाऊन खेड शिवापूर चे श्रद्धास्थान असलेल्या आई भवानी मातेच्या हेमाडपंती मंदीरा जवळून जाउन पुन्हा आंबील ओढ्यास मिळते. येथे असलेल्या साळोबा मंदिरा मुळे या धरणास साळोबा चे धरण म्हणतात..
२००५ – २००७ च्या दरम्यान शिवापूर गावावर असलेल्या दुष्काळाच्या दरम्यान गावकऱ्यांना या साळोबाच्या धरणानेच पाणी पुरवले, पाण्याची वानवा संपल्यावर त्यातील एक पाट बंद करण्यात आला, पण आजही शिवापूर गावच्या शेतीसाठी लागणारे हे पाणी साळोबाचे धरण पुरवते……
आम्ही कितीही प्रगत झालो, कंबरेचे काढून डोक्याला गुंडाळून मिरवले तरी आम्हाला शिवकाळाशिवाय आजही पर्याय नाहीच….

छायाचित्रात जांभळी धरण

Leave a comment