सरलष्कर दरेकर वाडा, आंबळे

सरलष्कर दरेकर वाडा, आंबळे

सरलष्कर दरेकर वाडा, आंबळे –

सरदार दरेकर हे मोरे या ९६ कुळाचे उपकुळ होय. मुळ सातारा जिल्हा येथील जावळी भागातील. दारे गावचे ते दरेकर / दर्या खोर्यातील वीर ते दरेकर असे म्हणतात. असो, पण सुलतानशाही, शिवशाही अशा अनेक राजवटीत दरेकर यांनी पराक्रम केलाय. हिरोजी, गणोजी हे पायदळाचे असामी म्हणून छ. शिवरायानजवळ होते. त्यांचे वारस जसे सुभानजी , काह्न्देराव, गोरखोजी, हणमंतराव, यशवंतराव, मानाजी, गौरोजी अशे अनेक वीर यांना सरंजाम, जहागिरी, सर्देश्मुखी अनेक म्हणजे शेकडो गावचे मोकासे होते. दरेकर घराण्याला अनेक इनामे होती. मराठ्यान मधले फार मोठ्या इनाम्दारांत दरेकर अग्रणी आहेत आणि होते.(सरलष्कर दरेकर वाडा)

पानिपत, खर्डा, उदगीर, राक्षसभुवन , वर्हाड, कोंकण, कर्नाटक, खानदेश उत्तर भारत येथील मराठ्यांच्या लढायचे प्रमुख सरदार हे दरेकर होते.. शनिवार वाड्याजवळ अनेक वाडे दरेकरचे होते व आहेत.. मुधोळकर घोरपडे व अनेक ९६ कुली मराठा घराण्यांचे नातेवाईक आहेत दरेकर, जेजुरी खंडोबा मानकरी.. पाटील, इनामदारी, मोकासे, संदपत्रे जहागिरी अठरा पगड अधिकार धारण करणारे दरेकर मोठे घराणे.

आंबले हे गाव छ. शाहुराजेनी सुभानजी दरेकर यांना इनाम दिले लष्कर खर्चासाठी पुढे त्यांच्याजवळ राहिले ..यांचे वंशात सरलष्कर दरेकर खंडेराव झाले त्यांनी माधवराव पेश्वेंचा पिसाळ लेल्या हत्तीपासून जीव वाचवला. हुजुरात व मराठेशाहीच्या प्रमुख मानकरी लोकांत घोरपडे, जाधवराव, भोईटे, निंबाळकर, दरेकर, शितोळे, अशा सरदार घराण्यांचा सहभाग होता… बोलावे तेवढे कमी आहे दरेकर घराण्यबद्दल. वडगाव निंबाळकर व मुढाले गावातील दरेकर आंबलेकर हे आहेत. दरेकर गढीचा पोवाडा मी वाचलंय. अनेक पोवाड्यात दरेकर घराण्यांचा उल्लेख आहे. दरेकर यांच्या लोणी दरेकर, राजेवाडी, अशा अनेक शाखा प्रसिद्ध आहेत.

स्थळ :- आंबळे गाव, सासवड पासुन १० ते १२ किमी, जिल्हा पुणे.

Shankar Havldar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here