स्वतंत्र भारतातील नाणी आणि टपाल तिकिटं

स्वतंत्र भारतातील नाणी आणि टपाल तिकिटं

स्वतंत्र भारतातील नाणी आणि टपाल तिकिटं –

आज आपण स्वतंत्र भारतातील नाणी आणि टपाल तिकिटं याविषयी माहिती देणार आहोत, तर स्वतंत्रपूर्व भारतात ब्रिटिशांची चलन आणि टपाल तिकिटं चालत होती परंतु स्वतंत्र भारताला स्वतः ची अशी नाणी हवी होती जी की प्रतीकं आहेत भारताच्या सार्वभौम व्यवहार आणि देवाणघेवाणीची.

भारताला सन १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले परंतु भारतीय चलनांत ब्रिटीश नाणी वापरली जात होती . स्वातंत्र्य भारतातील चलन हे सन १९५० साली चलनात आले. त्याविषयी विषयीची माहिती घेऊ .

भारतीय रुपया हे भारतीय गणराज्याचे अधिकृत चलन आहे. एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये विभागला जातो.

सन १९५० साली ७ वेगवेगळ्या किमतीची, वजन, परिमाणे, धातू व आकारांची नाणी चलनांत आली *माझ्या संग्रही असलेल्या* १९५० सालातील भारतीय नाण्यांची माहिती खालीलप्रमाणे

(१) एक पैसे ( One Paise )
(२) आधा आणा (Half Anna )
(३) एक आणा ( One Anna )
(४) दोन आणा ( Two Anna )
(५) चार आणा ( १/४ Rupee )
(६) आधा रुपया (१/२Rupee )
(७) एक रुपया ( One Rupee )

१ :- एक पैसे ( One Paise )

वजन ( Weight ) :- ३.८८ ग्राम ,
धातू ( Metal ) :- कांस्य ( Bronze ) ,
व्यास ( Diameter ) :- २१.३३ मिलिमीटर ,
आकार (Shape ) :- गोल ( Circular )
एका बाजूस (छाप = Obverse side) चारही दिशांकडे पाहणारे चार सिंहाचे मानचित्र
दुसऱ्या बाजूस (काटा = Reverse side) नाण्याची किंमत इंग्रजी व देवनागरी लिपीत , अश्वाचे मानचित्र व चलनात आल्याचे वर्ष

२ :- आधा आणा ( Half Anna )

वजन ( Weight ) :- २.९२ ग्राम ,
धातू ( Metal ) :- तांबे – निकेल ( Cropper-Nickel ) ,
व्यास ( Diameter ) :- १९.०८ मिलिमीटर ,
आकार (Shape ) :- Square Round-off
एका बाजूस (छाप = Obverse side) चारही दिशांकडे पाहणारे चार सिंहाचे मानचित्र
दुसऱ्या बाजूस (काटा = Reverse side) नाण्याची किंमत इंग्रजी व देवनागरी लिपीत , वृषभ (बैलाचे ) मानचित्र व चलनात आल्याचे वर्ष

३ :- एक आणा (One Anna )

वजन ( Weight ) :- ३.८८ ग्राम ,
धातू ( Metal ) :- तांबे – निकेल ( Cropper-Nickel ) ,
व्यास ( Diameter ) :- २१.११ मिलिमीटर ,
आकार (Shape ) :- Scalloped
एका बाजूस (छाप = Obverse side) चारही दिशांकडे पाहणारे चार सिंहाचे मानचित्र
दुसऱ्या बाजूस (काटा = Reverse side) नाण्याची किंमत इंग्रजी व देवनागरी लिपीत , वृषभ (बैलाचे ) मानचित्र व चलनात आल्याचे वर्ष

४ :- दोन आणा ( Two Anna )

वजन ( Weight ) :- ५.८३ ग्राम ,
धातू ( Metal ) :- तांबे – निकेल ( Cropper-Nickel ) ,
व्यास ( Diameter ) :- २५.४० मिलिमीटर ,
आकार (Shape ) :- Square Round-off
एका बाजूस (छाप = Obverse side) चारही दिशांकडे पाहणारे चार सिंहाचे मानचित्र
दुसऱ्या बाजूस (काटा = Reverse side) नाण्याची किंमत इंग्रजी व देवनागरी लिपीत , वृषभ (बैलाचे ) मानचित्र व चलनात आल्याचे वर्ष

५ :- चार आणा ( १/४ Rupee )

वजन ( Weight ) :- २.९२ ग्राम ,
धातू ( Metal ) :- निकेल ( Nickel ) ,
व्यास ( Diameter ) :- १९.१० मिलिमीटर ,
आकार (Shape ) :- Circular
एका बाजूस (छाप = Obverse side) चारही दिशांकडे पाहणारे चार सिंहाचे मानचित्र
दुसऱ्या बाजूस (काटा = Reverse side) नाण्याची किंमत इंग्रजी व देवनागरी लिपीत, गव्हाच्या दोन देठांचे मानचित्र व चलनात आल्याचे वर्ष

६ :- आधा रुपया ( १/२ Rupee )

वजन ( Weight ) :- ५.८३ ग्राम ,
धातू ( Metal ) :- निकेल ( Nickel ) ,
व्यास ( Diameter ) :- २४.३० मिलिमीटर ,
आकार (Shape ) :- Circular
एका बाजूस (छाप = Obverse side) चारही दिशांकडे पाहणारे चार सिंहाचे मानचित्र
दुसऱ्या बाजूस (काटा = Reverse side) नाण्याची किंमत इंग्रजी व देवनागरी लिपीत, गव्हाच्या दोन देठांचे मानचित्र व चलनात आल्याचे वर्ष

७ :- एक रुपया ( One Rupee )
वजन ( Weight ) :- ११.६६ ग्राम ,
धातू ( Metal ) :- निकेल ( Nickel ) ,
व्यास ( Diameter ) :- २८.०० मिलिमीटर ,
आकार (Shape ) :- Circular
एका बाजूस (छाप = Obverse side) चारही दिशांकडे पाहणारे चार सिंहाचे मानचित्र
दुसऱ्या बाजूस (काटा = Reverse side) नाण्याची किंमत इंग्रजी व देवनागरी लिपीत, गव्हाच्या दोन देठांचे मानचित्र व चलनात आल्याचे वर्ष

टपाल तिकिटं:

पहिलं टपाल तिकीट जे अनावरण झालं ते 21 नोव्हेंबर 1947 रोजी जे होतं भारताच्या तिरंगी ध्वजाचं. दुसरं आणि तिसरं जे टपाल तिकीट अनावरण झालं ते 15 डिसेंबर 1947 रोजी जे होते ते अनुक्रमे भारताच्या सारनाथ येथील त्रिमुखी सिंहाचे शिल्प आणि दुसऱ्यावर होतं विमान. भारताच्या हवाई सामर्थ्याचंच जणू ते प्रतिक. तर अशी ही स्वतंत्र भारताच्या सार्वभौमत्वाची महत्वाची प्रतीकं आणि त्यांचा इतिहास.

माहिती साभार – श्री. नागेश सावंत
संकलन – Rohit Pere Patil
चित्र : Nagesh Sawant

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here