महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,22,673

जगातला सर्वात श्रीमंत माणूस आणि छत्रपती शिवाजी महाराज

By Discover Maharashtra Views: 1820 3 Min Read

जगातला सर्वात श्रीमंत माणूस आणि छत्रपती शिवाजी महाराज –

शिवरायांनी केलेल्या सुरत लुटीचे सर्वात मुख्य टार्गेट असलेला हा असामी.हा व्यापारी म्हणजे तत्कालीन भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी केंद्रातील सर्वात श्रीमंत माणूस होता. तेव्हाचा बिल गेट्स म्हणा हवं तर. डच रेकॉर्ड्स प्रमाणे हा तत्कालीन जगातील सर्वात श्रीमंत माणूस होता.याची वैयक्तिक संपत्ती ८० लक्ष (तत्कालीन) रुपये होती , तर व्यापारी उलाढाल काही कोटींमध्ये होती. (तेव्हाचे १ कोटी आताचे सुमारे ७५०० कोटी )…. या माणसाचे नाव होते ‘वीरजी व्होरा’ !(जगातला सर्वात श्रीमंत माणूस आणि छत्रपती शिवाजी महाराज)

मराठा साम्राज्याचे तत्कालीन उत्पन्न १५-२० लाखांच्या आसपास होती, यावरून वीरजी व्होरा च्या प्रचंड संपत्तीचा अंदाज येतो. भारतात आग्रा, सुरत, भडोच, कोकण, गोवलकोंडा, म्हैसूर, मद्रास तर सुरतेमधून जाण्यार्‍या एकूण महसुलापैकी लाखो रुपयांचा महसूल केवळ वीरजी व्होरा एकटा भरत असे. सुमारे ७ देशांमध्ये याच्या व्यापारी शाखा होत्या. इस्ट इंडिया कंपनीला याने जवळपास १० लाख रुपये व्यापारासाठी दिले होते, तसेच मोगल, पर्शियन, आर्मेनियन, फ्रेंच, डच, हबशी, पोर्तुगीज, अफगाणी, इराणी व्यापार्यांना याने सावकारी कर्ज दिले होते.

संपूर्ण भारत ४ वर्ष वापरू शकेल इतकी चांदी याच्या गोदामात असते, असे वीरजी व्होरा बद्दल बोलले जाई. शिवरायांनी वीरजी व्होरा आणि अन्य ४ व्यापार्यांनी खंडणी दिली तर सुरत वर हल्ला करणार नाही अशी ग्वाही दिली होती,परंतु वीरजीने हि मागणी मग्रुरीने धूडकावली आणि याचे परिणाम त्याला भोगावे लागले.

सुरत लुटीच्या वेळी मराठ्यांनी त्याची सगळी गोदामे आणि पेढ्या फोडून साफ केल्या. त्या दिवशी सोने, चांदी, मोती, रत्ने वगळून सुमारे ३०० ते ५०० हशम हातात प्रत्येकी २ पोती घेऊन शामियान्यात दाखल झाले होते. वीरजी व्होराच्या घरातून सुमारे ६००० किलो सोने, २८ पोती भरून मोती, हिरे आणि माणके, सुमारे ५० लाख रुपये रोख असा भरमसाठ ऐवज… ऐवज कसला, साक्षात कुबेराचा खजिनाच जणू प्राप्त झाला होता.

सुरत च्या लुटीमध्ये सर्वात मोठे नुकसान वीरजी व्होराचेच झाले,यातून सावरायला काही वर्ष गेली तोच शिवरायांनी सुरत वर दुसर्यांदा हल्ला केला यातून मग वीरजी सावरला नाही आणि अंथरुणाला खिळला. जगातील सर्वात शक्तिशाली मुघल साम्राज्याला कर्ज देणारा हा व्यापारी शिवाजी महाराजांनी दिलेल्या तडाख्यामुळे धुळीस मिळाला आणि याच धक्क्यात १६७५ साली मृत्यू पावला.

संदर्भ – डच रेकॉर्ड्स
इस्ट इंडिया कंपनी रेकॉर्ड्स.

रमेश साहेबराव जाधव Fb wall

Leave a Comment