बुलढाणा

बुलढाणा

बुलढाणा –

बुलढाणा म्हणजे एक समृद्ध गाव आहे.. जिथ प्रदूषण नाही कचकच नाही.. सतत हवा खेळती राहणार शहर.. कधी धुक्यात हरवुन जाणार तर कधी चिंबचिंब पावसात भिजवुन जाणार शहर.. नैसर्गिक सौंदर्यानं अगदी रेखिव अस नटणार शहर म्हणजे बुलढाणा पावसाळयांत खुलणारा तो राजुरचा घाट ते छोटे छोट मनमोहक धबधबे.. त्यात उठुन दिसणार बालाजी मंदिर, तो बुध्द विहार, रंगीबेरंगी फुलांनी फुललेला जिथवर नजर जाईल तिथवरचा तो मनमोहक नजारा.. त्यात कधीतरी दिसणारा तो बिबटया ,हरणे, रानगाई हि झाली घाटांची नवलाई तो चढुनवर आला की मग सुरु होतो.

आनंदमेळा “धंधुकियाची मिठाई”  प्रियंकावरचा डोसा” “दवेचा कडक कडक चहा” “हनुमानदुकानावरची जेलेबी अन भजे”  हिवाळयांत संगमचौकात ते विलायचीच दुध, कृष्णा हॉटेलवरची कॉफी , शर्माकाकांच्या गाडयावरचा समोसा,शेगावची कचोरी,अन चिंचोलेचौकातली मग ती संपूर्ण मेजवानी पावभाजी, पाणीपुरी, कुल्फी, उसाचा रस सगळं सगळं एकदम झकास … जेवायच झाल तर श्रीरामवरची पुरणपोळी एकचनंबर असते आता जिमखानामध्ये देखील उत्तम चिकन मटन असतं बुलढाणा रेसिडेंनसीवर मस्त जेवन असतं… हे झाल खाण्या पुरतचं मर्यादित नाही बुलढाणातर शैक्षणिक हब ,बुलढाणा अर्बनचं उगमस्थान, थंडहवेच ठिकाण, इंग्रजकालीन ईमारतीच शहर,धार्मिक ऐक्य जपणार शहर, सावित्री जिजाऊ जन्मोत्सवाचा सोहळा,शिवजयंतीचा तो कार्यक्रम,१४ एप्रिलच्या आधी असणारी वैचारिक मेजवानी.

गणेशोत्सव खास करुन रुद्र गृपचे नाविण्यपुर्ण उपक्रम, प्रगतीवाचणालयातल्या व्याख्यानमाला, नवरात्रीमधला गरबा,मोठया देवीचा जत्रा सोहळा,रविवारचा तो आठवडी बाजार, साहित्यिक लोकांच शहर,जिथं पहिला स्रीपुरुष समानता दाखवणारा ग्रंथ लिहला गेला ते शहर,ती व्हिक्टेरीयाचा v असणारी मजबुत दगडात बांधली गेलेली जिल्हा परिषद शाळा, कितेक वर्षे जुणे ते चर्च जे आजही दिमाखात उभे आहे. दवाखान्यांची ती गल्ली सगळसगळ डोळयांसमोर येत बुलढाणा नाव जरी ऐकलं तरी थोडक्यात काय आपलं बालपणं ज्या शहरात गेल त्या शहराला आपण कधीच विसरु शकत नाही… बुलढाणा इज love

प्रामुख्याने सरत्या शेवटी हेच सांगाव वाटतं बुलढाणा हे सर्वसामान्य माणसांच शहर आहे एकदम सुखी जिवनशैली असलेलं… फक्त थोडी राजकारणामुळे अराजकता आहे ते द्वेष लवकर थांबो हिच माफक ईच्छा बाकी बुलढाण्याची सर जगात कुठेत नाही..

दिपाली सुसर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here