महान भारतीय क्रांतीकारक धाडसी योद्धा भीमाबाई होळकर

भीमाबाई होळकर

महान भारतीय क्रांतीकारक धाडसी योद्धा भीमाबाई होळकर –

महाराजा यशवंतराव होळकर यांची शुरवीर कन्या भीमाबाई होळकर भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सोनेरी पान आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चां वारसा जोपिसणारी महिला असुन पित्याच्या स्वप्नपुर्तीसाठी दिलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यत लढत राहीली आणि रणांगनावर कामं आली.

भीमाबाई चा विवाह बुळे सरकार यांच्यांशी झाला होता पंरतु काही दिवसातच त्यांना वैधव्य आल्याने त्या आपल्या माहेरी पित्याकडे येवुन राहिल्या याच काळात त्या शस्त्र चालवण्यात व घोडेस्वारीत निपुण झाल्या अंत्यत स्वाभीमानी शुर व धाडसी पराक्रमी पुरुषा सारख्या त्या युद्धकलेत पारगंत होत्या म्हणुन एक कवी त्यांच्याबद्दल लिहतो

” वीर,शेरनी लडणेवाली, रण से हुई सगाई थी ! खुब लडी मर्दानी रन मे, वह तो भीमाबाई थी”

पुरुषांसारखा सैनिकी वेश धारन करीत असल्याने रनचंडीका दिसायच्या इंदौर राज्यातील आणि स्वांतत्र्य संग्रामातील योध्द्यांना त्यांच्या विषयी मोठा आदर होता त्यांचे भाऊ मल्हारराव होळकर अधिक कार्यक्षम होत्या तर भाऊ मल्हारराव त्यांच्या सल्ल्यानुसार राज्यकारभार करायचा दरबारात त्यांच्या शब्दाला मोठी किमत होती याच काळात कंपनी सरकार कुटील नितीने हिंदुस्थानातील एक एक राज्य अंकीत करीत चालले होते सारा हिंदुस्थान आपल्या सत्तेखाली यावा अशी इंग्रजांची महत्वकांक्षा होती म्हनुन न्याय अन्याय निती अनिती चा विचार न करता हिंदुस्थातील एक एक राज्य ते हडप करीत चालले होते.

आधीच गव्हर्नर जनरल लाँर्ड वेलस्लीने अनेक राजांना आपल्या राज्यात तैनाती फौज ठेवायला भाग पाडले होते व त्या प्रत्येक राज्यात आपला एक प्रतिनिधी (रेसिंडेट) कायमचा ठेवुन दिला होता तो रेसिंडेट राज्याच्या कामकाजात हस्तक्षेप करायचा व आपला दबाव त्या राजावर ठेवायचा असाच एक रेसिडेट इंदौर सरकार कडे ठेवण्याचा आग्रह इंग्रजाकडून झाल्याने त्यास महाराजा यशवंतराव होळकर यांनी विरोध केला पंरतु त्यांचा मुलगा मल्हारराव गादीवर बसताच रेसिंडेट ची लुडबूड वाढली होती तेव्हां मल्हाररावानी आपली बहीन भीमाबाईचा सल्ला घेतला यावर भीमाबाईनी त्यास स्पष्टपणे सांगीतले की “आपल्या राज्यकारभारात लुडबुड करण्याचा इंग्रजांना कुठलाही अधिकार नाही म्हणुन त्यांच्यासोबत आपन युध्द करुन त्यांच्या या कारवाया थांबवल्याच पाहीजे” मल्हाररावांना भीमाबाईचे हे विचार पटले आणि दोन्ही भावाबहिनीनी गुप्तपणे युध्दाची तयारी सुरु केली सैन्यभरती करुन नव्या सैनिकांना राज्यात ठिकठिकाणी प्रशिक्षण दिले जावु लागले शस्त्रास्त्रांची खरेदी सुरु केली.

तयारी होताच मल्हाररावांनी युध्दाची घोषणा केली मल्हाररावांच्या सैन्यात दहा हजार पायदळ ,पंधरा हजार घोडेस्वार होते ल शेकडो चांगल्या तोफा होत्या आपले सैन्य घेवुन मल्हाररावांनी भीमाबाईसह महिदपुरला तळ ठोकला स्वत: भीमाबाईनी सैनिकी वेश धारन करुन सैन्याला प्रोत्साहीत होत्या इंग्रज अधिकारी हिस्लॉप आणि हंट यांना हे समजताच ते महिदपुरला आपले सैन्य घेवून आले त्यांच्या सैन्यात थोडे गोरे व देशी सैनिक होते हिस्लॉप व हंट हे दोघेही अनुभवी सेनाधिकारी होते त्यास रनकुशलतेचा गर्व होता गुप्तहेरांनी हंटला सांगीतले की मल्हाररावांची बहीन भीमाबाई ही शुर व पराक्रमी असुन ती नेहमी पुरुष वेशात असते ती अत्यंत धाडसी आणि निडर आहे तिला कुणाचीही भीती वाटत नाही ती युध्दकलेत तरबेज असुन पुरुषवेशात लढण्यासाठी आलेली आहे ते ऐकल्यावर हंट तिला बघण्यासाठी उत्सुक झाला व मल्हाररावांच्या सैन्याकडे त्याने दुर्बिन लावली.

तेवढ्यात भीमाबाई आपल्या घोडेस्वारांच्या तुकडीसह त्याच्यावर चालुन आली हंट चकीत होवुन तिच्याकडे बघतच राहिला तेंव्हा भीमाबाई त्याच्यावर विजेसारखी कडाडली ‘ हे फिरंग्या,बघतोस काय? युध्दाला तयार हो! हंट भानावर आला व त्याने आपल्या घोडेस्वाराच्या तुकडीस भीमाबाईवर चाल करण्याचा हुकुम दिला तुंबळ युध्द सुरु झाले रणभुमीवर रक्ताचा सडा पडु लागला हंट व भीमाबाई आपल्या तलवारीचे पाणी एकमेकांस दाखवु लागले हंट भीमाबाईच्या हातातील तलवार तीच्या हातातुन खाली कशी पडेल याचा प्रयत्न करीत होता तेवढ्यात भीमाबाईनी संधी साधुन हंटच्या खांद्यावर आपल्या समशेर ने वार केला त्याच्या खांद्यातून रक्ताच्या धारा वाहु लागल्या तो चांगलाच घायाळ झाला होता व आपल्या घोड्यावर पडता पडता वाचला

त्यास भीमाबाई म्हणाल्या ‘ हे फिरंगी ! जा आणि आपल्या जखमेवर उपचार घे! त्यानंतर ही हिस्लॉप आपल्या सैन्यासह मल्हाररावावर धावुन आला .मल्हारराव हत्तीवरुन लढत होते आणि पुढं पुढं जात होते तेव्हां जखमी हंटला हिस्लॉप घेवुन गेला आणि युध्द थांबवले आणि मल्हाररावांकडे तहाच्या अटी पाठवल्या पंरतु त्या अटी भीमाबाई आणि मल्हाररावांना मान्य नसल्याने त्यांनी इंग्रजाच्या अटी धुडकावुन लावत मी माझ्या मातृभुमीच्या रक्षणासाठी स्वांतत्र्यासाठी इंग्रजांशी मरेपर्यत लढेल’ तिचे हे उत्तर ऐकुन हिस्लॉप चा दुत परत गेला आणि पुन्हा युध्दाला सुरवात झाली.

भीमाबाई आपल्या सैन्यासह रणमैदानात होती लगेच हंट आपल्या ही आपल्या घोडेस्वारासह भीमाबाई समोर आला त्याला पाहताच म्हणाल्या फिरंग्या घाव भरला का तुझा आणि तलवार चालवायला सुरवात झाली हंट सावधगिरीने लढत होता पुन्हा एकदा हंट भीमाबाईसमोर आला आणि सपासप ऐकमेकावर तलवारीचे वार झाले हंटच्या तलवारीने भीमाबाईला घाव घालण्याचा प्रयत्न केला मात्र तो वार तलवारीवर झेलला गेला पंरतु तलवार हातातुन निसटली त्यावेळेस तो हंट भीमाबाईना म्हणाला

” राणीसाहेब ! आपण शुर आहात तुमच्या शौर्याने माझ्या मनात तुमच्याविषयी श्रध्दा निर्माण झाली आहे. तुम्ही निशस्त्र आहात व निशस्त्र शत्रुवर वार करणे मला योग्य वाटत नाही तुमची तलवार उचलुन तुम्हाला देवु का? आभारी आहे, पंरतु शत्रुने दिलेल्या तलवारीने युध्द करणे हा मी माझा अपमान समजते ” असे बाणेदारपणे राणीने त्यास उत्तर दिले हंट म्हणाला कि मी फक्त ऐकत होतो की हिंदुस्थानी स्त्रिया रण मैदानात उतरुन शत्रुशी युध्द करतात आज मी ते प्रत्यक्ष बघतो आहे तुमच्या शौर्याने मी प्रभावित झालो आहे. मला सांगा मी आपली काय सेवा करु भीमाबाईनी त्यास विचार करुन त्याला लगेच उत्तर दिले. ठिक आहे तुम्ही तर हिंदी राजांना एकमेकात लढवुन त्यांची राज्ये हडप करीत आहात तुम्ही कपटनितीने लोकांना गुलाम बनवित आहात म्हणुन तुम्ही काय आमची सेवा करणार? तेंव्हा हंट बोलला ते जावु द्या मी खरोखरच आपल्यासाठी काही तरी करायला उत्सुक आहे राणीसाहेब सांगुन तर बघा

यावर भीमाबाई म्हणाल्या ‘ चांगली गोष्ट आहे मला तुम्ही वचन द्या की इंग्रजी फौजेची छावणी इंदौरला इथुनपुढे पडणार नाही हंटला हे वचन देणे अवघड होते कारण ते त्याच्या अधिकाराच्या कक्षेत येत नव्हते म्हणुन तो म्हणाला राणीसाहेब मी वचन तर देवु शकत नाही कारण ते माझ्या अधिकारात नाही पण त्यासाठी मी अवश्य प्रयत्न करीन हंटने आपल्या वरिष्ठ सेनाधिकारी हिस्लॉपला भीमाबाईची मागणी सांगीतली पण ते त्याच्या अधिकार कक्षेत नव्हते पण त्याने हंटला आश्वासन दिले की मी याविषयी आपल्या पोलीटीकल एंजटला अवश्य विनंती करेन हिस्लॉपच्या विनंतीला पोलीटीकल एंजटने मान दिला आणि इंग्रजानी आपली छावणी इंदौर ऐवजी महुला केली भीमाबाई होळकर यांनी आपल्या परम पुज्य अहिल्यादेवी चा वारसा कृतितुन जपला होता तर युध्दातुन वडील महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कर्तृत्वाला जिवंत ठेवले होते राज्याला जपले होते त्यांच्या या पराक्रमाला मुत्सदेगिरीला आज त्यांच्या जंयतीनिमीत्त कोटी कोटी प्रमाण.

लेख संदर्भ – श्री स ध झांबरे लिखीत महान भारतीय क्रांतीकारक 1770 ते 1900

Post By: Rambhau Lande

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here