खानदेशातील भिल्ल भाग ४ | तडवी भिल्ल

खानदेशातील भिल्ल भाग २,३,४,५,६,७,८,९,१० | भिल्लांचे प्राचीन संदर्भ | भिल्लांतील पोटजमाती | भिल्लांतील पोटजमाती | तडवी भिल्ल | कोकणातील उत्सव आणि जीवनशैली | राठवा भिल्ल | भिल्लांचा इतिहास

खानदेशातील भिल्ल भाग ४ | तडवी भिल्ल –

हा समुदाय गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सातपुडा डोंगराचा रहिवासी आहे. हे गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांच्या सीमावर्ती भागात आहेत. हा प्रदेश  मध्ययुगीन राज्य असलेल्या फारुकी साम्राज्याचा मूळ भाग होता, या भागाच्या पश्चिमेस भागात तडवी आणि वसाहती  आहे. या प्रदेशातील भिल्ल आणि फारुकी या राज्यातील निकटच्या सहकार्यामुळे त्यातील काही लोकांचे इस्लाम धर्मांतर झाले. त्यांची भाषा धांका आणि भिलोरी देखील आहे, जी इंडो-आर्यन भाषेच्या भिल्ल समूहाशी संबंधित आहेत.  मुख्यत: लहान शेतकरी आहेत.  महाराष्ट्रात त्यांची प्रमुख कुळे सिरसाट, मानकर, धोपी, तडवी, केदार, मासरे, घाटटे, सोळंके आणि वाधे आहेत.(खानदेशातील भिल्ल भाग ४ | तडवी भिल्ल)

वारली हे पावरी प्रमाणे जंगलनिवासी आहे. अक्राणीच्या तीसचाळीस किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत ते राहतात. ते भटके आयुष्य जगतात. कुत्रा, मांजर आणि वाघ सोडून इतर प्राणी खातात. पशुपालन हाच मुख्य व्यवसाय आहे.

मावची किंवा गावित भिल्ल हे तोरणमाळ येथील डोंगराच्या रांगेत आहे. शहादा आणि शिरपूर भागात आहे. नंदुरबार आणि नवापुर भागात आहे. सतत घरे बदलत असतात. बिफ खातात. भुताखेतावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे वृध्द स्त्रियांची हत्या करण्याचे प्रकार वारंवार होतात असा उल्लेख गॉझेटियर मध्ये आहे. पिंपळनेर भागात बैलगाडी बनवण्याचे काम काही करत आहे.

अस्तंभा, गावळी,वाघदेव, आणि परमेश्वर यांची उपासना करतात. एक विचित्र पध्दत आहे ती ही की लग्नानंतर पाच वर्षे मुलीला सासऱ्याची सेवा करावी लागते नंतर करार संपल्यावर ती नवऱ्याबरोबर राहु शकते.

माथवादीस किंवा पानारीस ही नर्मदेच्या खोऱ्यात राहणारी दुसरी जमात गुजराती आणि रंगवीनेमाडी ही प्रादेशिक मिश्रण झालेली भाषा तळोदा भागात आहे लंगोटी आणि फेटा हा पूरूष तर साडी आणि चांदीचे दागिने घालतात.

बारडा आणि ढोरेपीस हे अक्राणी आणि धडगाव परिसरातील डोंगर रांगा मध्ये राहतात.

डांगीस भिल्ल, आणि मिश्र भिल्लांमध्ये भिलाला, हे अर्धे भिल्ल अर्धे राजपूत, आणि तडवी भिल्ल व निर्धी भिल्ल हे अर्धे भिल्ल अर्धे मुस्लिम होय. यातील तडवी मुख्य आशिरगड भागात आहे. त्यांचा अभ्यास हा मोठा आणि वेगळा विषय आहे.

(खानदेशातील भिल्ल भाग ४ | तडवी भिल्ल | खानदेशातील भिल्ल भाग ४ | तडवी भिल्ल)

माहिती संकलन  –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here