महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,19,953

बऱ्याच भटक्यांना माहिती नसलेलं राजगडच वैभव

By Discover Maharashtra Views: 1347 2 Min Read

बऱ्याच भटक्यांना माहिती नसलेलं राजगडच वैभव –

श्रीरामेश्वर मंदिराखाली श्री भागीरथी मंदिर आहे. डुब्यातील उत्तर प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर ह्या मंदिराच्या छोट्याश्या प्रकारात –

1) श्री गणेश घडीव मूर्ती, चार हात, स्थूल काया, उजवा पाय दुमडलेला, डावा जमिनीवर, सोंड डावीकडे, डोईवर मुकुट.
2)श्री गणेशाच्या उजवीकडे देवी. देवी उभी, पायात नुपुर, चुनीदार वस्त्र,चार हात, उजवा दोन्ही हात खंडित, डाव्या वरील हातात चक्, खालील हातात भव्य त्रिशूल, गळ्यात पदक असलेला हार, गळाभर दागिने, कानात भव्य कर्ण भूषणे, डोईवर मुकुट, पायाखाली राक्षस, मूळ खडकात उठावदार कोरलेली.

3)देवीच्या डावीकडे गणपति, खडकात उठावदार कोरलेला, बद्धपद्मासनस्थ, चार हातांचा, उजवीकडील वरील हातात अंकुश, खालील उजवा हात खंडित, डावीकडील वरील हातात परशु, खालील हात खंडित, कान चौकोनी, सोंड डावीकडे, डोक्यावर नागफणी
4)श्री गणेशाच्या डावीकडे स्तंभ, चौकोनी, नक्षीदार, बहुदा, तो नंदादीप असावा.

5)मूळ खडकात कोरलेली उठावदार पुरुषमूर्ती, पायात तोडे, उजव्या हाती दंड, डावा हात कमरेवर, कान मोठे, डोक्यावरील मुकुट उठावदार दुसर्‍या चिर्यावर, गळ्यात पदकाचा हात. हा बहुदा काळभैरव असावा.
6)त्याच प्रकारात एक भव्य शाळुंकेवर पाच लिंग आहेत. ते पंचमुखी शिवायचे प्रतीक असावेत किंवा महाराष्ट्रातील श्रीभीमाशंकर,श्रीनागनाथ, श्रीघृष्णेश्र्वर, श्रीवैजनाथ, श्रीत्र्यंबकेश्वर, ह्या पाच ज्योतिर्लिंगाचे प्रतीक असावे. त्या पंच लिगेश्र्वर देवासमोर एक खंडित नंदी आहेआहे..त्या पंच लिगेश्र्वर देवासमोर एक खंडित नंदी आहेआहे..

किल्ले तुम्ही मन लावून अभ्यास करत असताना किल्ल्याचा एक एक दगड सुद्धा तुम्हाला बोलतो.

भागीरथी मंदिर, राजगड.

Abhijeet Shinde 

Leave a comment