बेलेश्वर मंदिर, वरसोली, अलिबाग

बेलेश्वर मंदिर, वरसोली, अलिबाग

बेलेश्वर मंदिर, वरसोली, अलिबाग –

वरसोली… अष्टागर मधील एक महत्वाच आगर. अलिबाग मधील एक प्रसिध्द गाव. येथील समुद्रकिनारा नेहमी पर्यटकांना साद घालतो. स्वच्छ व सुरक्षित किनारपट्टी असलेला वरसोली बीच ला नेहमी पयर्टकांची पसंती असते. याच वरसोलीच्या समुद्रकिनारावर फिरायला जाताना मुख्य रस्त्यावर  प्रथम लक्ष वेधून घेते ते बेलेश्वराच पुरातन बेलेश्वर मंदिर.

स्वयंभू असे हे शिवाचे स्थान. मंदिराचे वेळोवेळी जिर्णोद्धार झाले असले आतील बाजूने असलेला लाकडी सभामंडप व त्यावरील कोरीवकामाने त्याची पुरातनता स्पस्ट करते. यावरील कोरीवकाम म्हणजे काष्टशिल्पातील अद्भुतता म्हणावी लागेल. मुख्य़ मंदिराच्या बाहेर व-हांडा असून समोर लहानासा नंदीमंडप आहे.

खास कोकणातील मंदिरशैलीला शोभेल असे हे मंदिर आहे. समोर दोन दिपमाळ आसून या बेलेश्वराची पोखरण मात्र अतिशय अस्वच्छ आहे. पाण्यात घाण साठल असून पोखरण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

मंदिराची पुजअर्चा राऊळ घराण्याकडे आहे. वरसोली बिच ला गेलात तर हे मंदिर व सभामंडपातील लाकडावरील जरुर काम जरुर पहा. वरसोली बिच ला गेलात तर हे मंदिर व सभामंडपातील लाकडावरील जरुर काम जरुर पहा.

संतोष मुरलीधर चंदने . चिंचवड, पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here