महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,77,808

बाजींद भाग ४४ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

By Discover Maharashtra Views: 5883 3 Min Read

बाजींद भाग ४४ | बहिर्जी नाईक यांची कहाणी…

बाजींद भाग ४४ बाजीराव कडे गंभीरपणे पाहत तो म्हातारा गृहस्थ बोलला… कोण र तू..?

हिकड मरायला पण कोण फिरकत नाय, आणि तू भर पावसात हित काय करतोय?

बाजीराव या आकस्मित प्रश्नाने भानावर आला..तो बोलू लागला..

मी पलूस चा आहे मामा…बहिर्जी नाईकांच्या समाधीच्या दर्शनाला आलो होतो. मिलिटरी मध्ये असतो देशसेवेसाठी..!

पण तुम्ही कोण…तुम्ही काय करताय इतक्या पावसात इकडे ?

बाजीराव च्या त्या प्रश्नाने तो म्हातारा उत्तरत्रा…
आर मी धनगर हाय…असतो शेळ्या मेंद्या घेऊन डोंगर दर्यात.
किसन नाव माज……

गड्या, लरय नवाल वाटलं…हयात गेली बानुरगडावर येतुय…पण बहिर्जी नाईकांच्या दर्शनाला येणारे लय कमी जण असत्यात..बाकी सगळी टिंगल टवाळकी करणारीच जास्त येत्यात…बर वाटलं….!

बाजीराव बोलू लागला….

मामा…तुम्हाला बहिर्जी नाईक यांच्याबद्दल काय माहिती आहे ?

असेल तर मला सांगाल..?

बाजीराव च्या डोळ्यात बहिर्जीच्या विषयी इतकी भूक त्या किसन धनगराला दिसली आणि तो मोठ्या आनंदाने त्याला बोलू लागला….

गड्या….बहिर्जी अस उभ्या उभी नाय समजायचं तुला, आम्हालाबी एवढ माहित नाय..पर जेवढ हाय तेव्हढ मातुर तुला सांगतो…लय मोठी कहाणी हाय ..

यावर बाजीराव बोलला…

मामा…सारी रात्र इथे थांबायला तयार आहे..काय माहिती असेल तुम्हाला तर सांगा मला……मला खूप तहान आहे त्यांना जाणून घ्यायची.

मोठा श्वास घेऊन किसन धनगर म्हणाला…..चल….त्या दगडावर बसू…

ते दोघेही समोर असलेल्या दगडावर बसले…

मला आजवर ही कहाणी सांग म्हणणारा कोणी भेटला नव्हता पोरा….मला वाटायचं की मी ही कहाणी कोणाला न सांगताच मरतोय की काय ?
पण.डइचारल्या शिवाय पण कोणाला ही कहाणी सांगितली तर त्याचा काय उपयोग नाही…..मला वाटतंय तुला देवानच धाडलय माज्याकड….

पोरा…माज वय ८० च्या वर झालंय…आम्ही मूळ हितल नाय…आमचा मूळ माणूस रायगड च्या डोंगरकपारीत रहात व्हता…..ज्याच्या आयुष्यात बहिर्जी नाईक आले आणि आमच्या कुळीच सोन झाल….

आमची ही १३ वी पिढी हाय…आजवर नाईकांना सोडून आम्ही राहिलो नाय..आजपण या समाधी भवतीच माझा जीव घुटमाळतोय र…..

सखाराम धनगर….आमचा मूळपुरुष …

आमच्या साऱ्या कुळीत ही कथा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत सांगितली जाते….आमची कुळी सोडली तर ही कथा कुणाच्या बा ला सुध्दा ठावी नाय……

पण, आता माझ्या माग रडणार बी कोण उरल नाय..आणि मनातली ही कहाणीसांगायला त्या मापाचा कोण भेटला बी नाय…..

ऐक….मी तुला बहिर्जी नाईक आणि माझ्या मूळवंशज सखाराम च्या
आयुश्यातली ही कथा सांगतोय…

आणि रायगड च्या काळजात वसलेल्या धनगरवाडीच्या सखाराम ची कथा त्याचा १३ वा वंशज किसन धनगर भारतीय गुप्तहेर खात्याचा अधिकारी बाजीराव जाधवला सांगू लागला होता…….

बाजिंद…बाजिंद ….

मामा….सांगा पुढ काय झाल….?

वस्ताद काका व सखाराम सारे जण बाजिंद च्या जंगलात आले होते का ?खंडोजी कुठे गेला यावेळी ?

खंडोजी म्हणून बहिर्जी नाईकांनी सखाराम ला मदत का केली ?

राजे येसाजीराव आणि सावित्री कुठे गेली ?

बाजिंद चे पुढे काय झाले …?

सांगा मामा मला….

किसन धनगर उठला आणि म्हणाला…

चल पोरा….नाईकांच्या समाधीला दिवा लावूया…पुढची कथा दिवेलागणीनंतर सांगतो..उठ…!

क्रमशः बाजींद भाग ४४ | बहिर्जी नाईक यांची कहाणी

संदर्भ : बाजींद कांदबरी – लेखक पै.गणेश मानुगडे

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव

बाजींद कांदबरी

Leave a comment